पुरळ डाग खाज आग ऍलर्जी स्किनच्या समस्या उपाय

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

त्वचारोग म्हणजेच पुरळ येणे, डाग होणे, अंगाला खाज सुटणे, शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होणे, एलर्जी होणे या सर्व समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत नॅचरल आणि सुंदर उपाय घेऊन आलो आहे. हा उपाय केल्याने चर्म रोग्याच्या म्हणजेच स्किनच्या कितीही समस्या असतील तर यामुळे घरच्या घरी सहजतेने सुटका होणार आहे.

तर यासाठी आपल्याला लागणार आहे. हळद परंतु हळद घेताना घरच्या हळद पावडरचा वापर करायचा आहे. किंवा यासाठी आंबे हळद मिळते. आंबे हळदीचा जरी तुम्ही वापर केला तर जास्तीत जास्त आणि फायदेशीर परिणाम होतो. आणि दुसरा पदार्थ म्हणजे तुरटी.

तुरटीमुळे देखील अंगाची खाज लगेच बरी होण्यास मदत होते.
तुरटी कुटून याची पावडर तयार करून घ्या. आणि अर्धा चमचा म्हणून यामध्ये ही तुरटी पावडर मिक्स करा. आणि यामध्ये अजून घटक मिक्स करायचं आहे ते म्हणजे निमतेल. म्हणजेच कडुनिंबाच्या पानांचे तेल यामध्ये टाकायचे आहे.

कडुलिंबाचे तेल हे आ यु र्वे दि क औषधांच्या दुकानात किंवा मेडिकलमध्ये अगदी सहजतेने मिळून जाते. हे चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. हे तयार झालेले मिश्रण कापसाच्या साहाय्याने ज्या ठिकाणी आपल्याला डाग आहेत किंवा पुरळ आले आहे, खाज येत आहे त्या ठिकाणी अलगदपणे लावून घ्यायचे आहे.

याला जास्त मसाज वैगेरे करू नये. अलगद हाताने ही लावून घ्या आणि अर्धा किंवा एका तासानंतर हे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. असे जर तुम्ही केले तर यामुळे कितीही फंगल इन्फेक्शन असेल, कितीही ऍलर्जीचा त्रास होत असेल तरीदेखील हे पूर्णपणे बरे होण्यास मदत होते.

तुरटी पावडर व हळद हे मिश्रण एकत्र करून ठेवून ज्या वेळ आहे त्यावेळेस तुम्ही तेल टाकून याचा वापर करू शकतात. नॉर्मल त्रास असेल तर एका वेळेसच्या वापराने लगेच निघून जाते. परंतु जास्त त्रास असेल,

जास्त फंगल इन्फेक्शन झाले असेल तर हा उपाय किमान 7 दिवस तरी करायचा आहे. म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो. आहे की नाही अगदी साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *