कुलदेवीचा उपवास कधी करावा?…

अध्यात्मिक

 

मित्रांनो, आपली जी कुलदेवता असते तिचा उपवास कसा करावा?, कधी करावा आणि कुलदेवतेचा उपवास करण्याची गरज काय? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. कारण आपल्या कुटुंबासाठी आपली कुलदेवी अत्यंत महत्त्वाचे असते. तीच आपले कुटुंबाचे रक्षण करत असते. कुलदैवतेच्या वारी उपवास करावा. पण कुलदेवतेच्या वारी उपवास करायचा म्हणजे नक्की काय करायचं तो उपवास कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

उपवास कधी करावा? हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर असं आहे की तुमच्या कुलदेवतेच्या वारी तुम्ही उपवास करावा. समजा तुमची कुलदेवता माता महालक्ष्मी आहे किंवा तिचं एखादं रूप आहे तर तुम्हाला शुक्रवारी उपवास करायचा आहे. कारण माता लक्ष्मीचा वार हा शुक्रवार आहे. जर तुमची कुलदेवता तुळजाभवानी असेल किंवा माता पार्वतीचा एखादा रूप असेल तर तुम्ही मंगळवारी उपवास करायचा आहे. तुमच्या कुलदेवता कुणाचे रूप आहे त्याप्रमाणे तिचा एक वार ठरलेला असतो.

पण मग आता हा उपवास करायचा कसा? उपवासाचे दोन प्रकार आहेत. एक निराहार आणि दुसरा हा उपवास करताना त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत आणि निर्जल. या उपवासांमध्ये बऱ्याचदा गोंधळ होतो पण लक्षात घ्या निराहार म्हणजे काहीही न खाता केलेला उपवास. पण त्यातही जर तुम्ही त्यामध्ये पाणी घेत असाल तर तो सजल उपवास झाला आणि दिवसभर पाणी सुद्धा न पिता उपवास करत असाल तर तो निर्जल रूपात झाला. त्याचबरोबर दुसरा उपवासाचा प्रकार आहे फलाहार. यामध्ये फळ, दूध अशा काही गोष्टी उपवासाला चालतात.

फळ खाऊन आणि दूध घेऊन केलेला कुठल्या प्रकारचा उपवास तुम्हाला करायचा आहे. कुलदेवतेच्या वारी उपवास करत चला. जर तुमचे शारीरिक क्षमता फार कमकुवत असेल, उपवास करण्याची क्षमता नसेल तर शरीराला यातना मात्र देऊ नये. अशा वेळी तुम्ही राजगिरा, रताळ अशा प्रकारच्या वस्तू उपवासाच्या दिवशी खाऊ शकता. पण साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याच वडे, बटाट्याचे वेगवेगळे प्रकार या सगळ्या गोष्टी खाऊन केल्या जाणाऱ्या उपवासाला धार्मिक दृष्ट्या, आयुर्वेदिक दृष्ट्या आणि शरीराच्या दृष्टीने सुद्धा काहीही अर्थ नसतो. त्यामुळे तुम्हाला जर उपवास करायचा असेल तर तुम्ही तो योग्य पद्धतीने करा आणि दिवसभर उपवास करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की, उपवास तुम्ही कुलदेवतेसाठी करतात.

त्यामुळे तिच्या एखाद्या मंत्राचा जप तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तरी करा. तिचा एखादा स्तोत्र तुम्हाला येत असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी तरी नक्की म्हणा. कुलदेवतेसाठी केला जाणारा उपवास तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सोडू शकतात. सूर्यास्तापूर्वी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. हे मात्र लक्षात घ्या तुमची शारीरिक प्रकृती उपवास तुम्हाला कितपत झेपेल या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच उपवास करा. शरीराला कुठल्याही प्रकारच्या यातना होतील असं काहीही करू नका. उपवास केलेल्या दिवशी तुम्हाला उत्साह आला पाहिजे, उपवासाने पचनसंस्थेला आराम मिळतो आणि त्यातून आपल्या शरीराची शुद्धी होते. हे आयुर्वेदिक कारण सुद्धा त्यामागे आहेत. म्हणूनच आठवड्यातून एकदा तरी कुलदेवतेसाठी उपवास नक्की करा.

त्यामुळे माता कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते. त्याच बरोबर आपली तपसाधना वाढते, आपली निग्रह शक्ती वाढते आणि आपली संकल्प शक्ती सुद्धा वाढते. तिथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की जर तुम्ही गरोदर असाल तर असा कुठल्याही प्रकारचा उपवास करू नका. दुसरी गोष्ट तुम्ही आजारी असाल, तुमची शारीरिक क्षमता कमी असेल तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारचा उपवास करू नका किंवा तुमचं वय जास्त असेल तरीसुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही उपवास करण्याच्या भानगडी तुम्ही पडू नका. तुम्ही जास्तीत जास्त जप करा. ती साधना सुद्धा देवापर्यंत पोहोचते.उपवास हा आरोग्यदायी व्यक्तीनेच करायचा असतो.

आपल्या संसारात बऱ्याच अडचणी येत असतात आणि त्या का येतात हे आपल्याला लक्षात घ्या की आपल्या संसारातल्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सगळ्यात आधी कुलदैवते कडेच धाव घेतली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही आजारी पडतात तेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांकडेच आधी जाता बरोबर आणि मग ते तिथून तुम्हाला सांगतात की हा आजार त्यांच्याकडून बरा होणार आहे की नाही किंवा कुठल्या स्पेशल दाखवायचं बरोबर ना हे अगदी तसंच आहे. आपल्या कुळाची देवता ही आपल्या कुळाचे रक्षण करत असते. म्हणून आपण नियमित तिची उपासना करायला हवी.

बऱ्याचदा घरात लग्न ठरत नाहीत, कर्ज खूप होऊन जातं किंवा सतत कोणीतरी आजारी पडतं. घरात सतत समस्यांचा डोंगर उभा राहतो, अशा वेळी आपण कुलदेवतेकडे धाव घ्यायला हवी. पुढचा मार्ग कुलदेवताच दाखवते. जर तुम्हाला आणखीन कुठल्या देवतेची उपासना त्या समस्येसाठी करणं आवश्यक असेल तर ती बुद्धी सुद्धा तुम्हाला कुलदेवताच देते. कुलदेवता तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते. म्हणून कुलदेवतेच्या नावाचा जप होणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे कुलदेवतेचा उपवास का करावा कधी करावा याबद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *