कापूर जाळल्यानं फक्त देव प्रसन्न होत नाही तर नियमित आयुष्यात होतात हे फायदे

अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते आणि प्रत्येक जण हा आपल्या देवघरांमध्ये देवांची अगदी मनोभावे श्रद्धेने पूजा करीत असतात. आरती करीत असतात. तसेच गोडधोड पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवीत असतात. मित्रांनो आपण देवघराची अगदी विधीवत पूजा देखील करीत असतो.

देवपूजा केल्यानंतर आपण देवी देवतांची आरती देखील करतो. या आरतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सामग्री वापरतो. आपण दिवा लावतो. उदबत्ती, धूप, कापूर या वस्तू आपण देवपूजेमध्ये वापरतो. तर मित्रांनो या देवपूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या कापूर याचे महत्त्व आज आपण जाणून घेणार आहे. म्हणजेच आपण देवपूजेमध्ये कापूर जाळतो. कापूर जाळल्याने नेमके आपल्या आयुष्यामध्ये काय फायदे होतात चला तर जाणून घेऊयात.

हिंदू धर्मामध्ये पूजेवेळी कापूर वापरण्याला खूपच महत्त्व आहे. प्रत्येक जण हा पूजेनंतर आरती व हवन करताना कापराचा वापर करतात. देवाला प्रसन्न करण्यासाठी कापूर हा खूपच महत्त्वाचा आहे. आपल्या घरांमध्ये असणाऱ्या अनेक नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी कापूर वापरणे गरजेचे आहे.

तसंच कापराच्या ज्वलनामुळे वातावरणातील बारीक रोगजंतूंदेखील नाहीसे होतात. कापराच्या ज्वलनामुळे देवाची कृपा तर होतेच सोबतच घरामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवेश होतो. तसेच जर तुम्ही आपल्या आरती मध्ये कापराचा वापर केला तर यामुळे दुष्ट ग्रहांचा प्रभाव कमी होतो आणि व्यक्तींच्या जीवनामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी होण्यास सुरुवात होते.

ज्योतिष शास्त्रानुसार आपण जर आरतीमध्ये कापराचा वापर केला तरी यामुळे आपली पूजा ही देवी देवतांपर्यंत पोहोचली जाते आणि देवी देवता या आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच आरतीमुळे वातावरण हे शुद्ध होतं. तसेच नियमित घरामध्ये कापराने आरती केलात तर यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते.

वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी कापूर खूपच महत्त्वाचा मानला जातो. कापरामुळे घरातील वास्तू दोषदेखील नाहीसा होतो. घरातील वास्तूदोष नाहीसा झाल्यानंतर घरात सुख-समृद्धी भरभराट येते. आपल्यापैकी बरेच जण हे कापराचे काही उपाय देखील करीत असतात.

ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये पितृदोष किंवा राहू दोष असेल तर त्यांनी रोज सकाळी सायंकाळ कापूर जाळावा. तसेच तुमच्या घरात लहान बाळे असतील तर त्यांच्याभोवती वाईट शक्ती फिरत असतात. यामुळे रोज सायंकाळी कापूर पेटवून त्याचा धूर करावा. यामुळे वाईट शक्ती आपल्या घरामध्ये राहत नाहीत.

तसेच आपल्यापैकी बऱ्याच जणांना संध्याकाळी वाईट स्वप्न पडतात. त्यांनी आपल्या बेडरूम मध्ये कापूर जाळावा त्यामुळे तुमची वाईट स्वप्ने पडणे बंद होतात. तर वरील प्रमाणे हे कापराचे खूप सारे फायदे आपल्याला होत असतात. त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये कापूर अवश्य जाळायला हवा. कापराचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचा आपण पुरेपूर लाभ घ्यायला हवा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *