मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच. तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असावा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर हवा असावा असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी आपण बरेच जण अनेक उपवास वगैरे करीत राहतो. तर मित्रांनो आता सगळीकडेच दिवाळीचे वातावरण आहे.
हिंदू धर्मामध्ये दिवाळीचा सण हा खूपच मोठा सण आहे. या दिवशी आपण नवीन वस्तूंची खरेदी करतो. अनेक जण सोने-चांदी खरेदी करीत असतात. नवीन कपड्यांची देखील खरेदी या दिवाळीच्या सणावर भरपूर प्रमाणात होते. तसेच मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये फराळाचा सुगंध देखील प्रत्येकाच्या घरात दरवळत असतो.
आपापसातील सर्व वादविवाद, भांडण, मतभेद विसरून सर्वजण एकोप्याने हा सण साजरा करतात. तर असा हा दिवाळीचा सण लक्ष्मी मातेला तसेच श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. या दिवशी आपण माता लक्ष्मीची अगदी भक्तीभावाने व मनोभावे पूजा करीत असतो. आपले घर हे मंगलमय तसेच प्रसन्नतेचे राहावे याकडे सर्वांचाच कल असतो.
तर मित्रांनो या दिवाळीच्या सणा दिवशी कोणत्या गोष्टीचे सेवन करायचे नाही याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो सोमवारी 24 ऑक्टोबरला दिवाळी हा सण आलेला आहे आणि मित्रांनो या मंगलमय सणा दिवशी आपल्याला या पदार्थांचे सेवन अजिबात करायचे नाही.
आपल्यापैकी बरेच जण नवसाहारांचे शौकीन आहेत. तसेच बरेच जण मद्यपान करतात. परंतु मित्रांनो दिवाळीच्या या पावन सणाला तुम्ही मांसाहार करणे टाळायचे आहे. तसेच मद्यपान देखील तुम्ही करायचे नाही. कारण ज्या घरात मांसाहार आणि मद्यपान केले जाते त्या घरांमध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही.
त्यांचा कृपा आशीर्वाद ही त्या देत नाहीत. ज्या घरांमध्ये सात्विक आहार केला जातो तसेच घर हे शांततेचे व प्रसन्नतेचे असते अशा घरांमध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते. तर मित्रांनो या दिवाळीच्या सणाला म्हणजेच या पावन सणाला तुम्ही मांसाहार आणि मद्यपानचे सेवन अजिबात करायचे नाही.
जेणेकरून माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. कोणत्याही संकटांचा आपणाला सामना देखील करावा लागणार नाही. या दिवाळीच्या पावन सणाला आपले घर हे वैकुंठ कसे बनेल याकडेच आपण सर्वांनी लक्ष देणे खूपच गरजेचे आहे. जिथे वैकुंठ असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मी नक्कीच प्रवेश करेल.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.