मित्रांनो, हिंदू दैवतांची संख्या मोठी असली आणि प्रत्येकाचे उपास्य दैवत वेगवेगळे असले, तरी देवघरात देवांची संख्या मर्यादित असावी, असे शास्त्र सांगते. कालांतराने देवघरात देवांची संख्या इतकी वाढते की सर्वांची पूजा करणेही कठीण होते. देवतांच्या मूर्ती जिथे ठेवणार असू तेथील शुचिर्भूतता महत्त्वाची असते. देवाच्या विलोभनीय मूर्ती, तसबिरी विकत श्रीमख अ घ्याव्याशा वाटणे स्वाभाविक आहे.
पण त्या सगळ्याच देव्हाऱ्यात ठेवून गर्दी करू नये. अशा तसबिरी, मूर्ती शोभेच्या किंवा सजावटीच्या मूर्ती म्हणून ठेवाव्यात. त्या मूर्तीजवळ किंवा आसपास चपलांचे जोड ठेवू नये. जेवणाचे ताट आणि ती मूर्ती, तसबीर एका जागी असू नये. ती देव्हाऱ्यात ठेवली नाही तरी तिचे पावित्र्य जपावे. मग प्रश्न येतो, देव्हाऱ्यात कोणते देव असावे? याचीच महिती आजच्या या लेखातून आपण जाणुन घेणार आहोत.
देवघर ही घरातील महत्त्वाची जागा आहे. प्रत्येकाच्या घरात देवघर असते, पण त्यामध्ये किती आणि कोणते देव असावे हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसते. काही जण यात्रेला गेल्यावर त्या ठिकाणच्या देवाच्या मूर्ती घेऊन येतात आणि देवघरात ठेवतात. घरातील देव हे एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे पूर्वापार दिले जातात. काही नवीन देव आपण देवघरात ठेवण्यासाठी घेतो.
काहींच्या देवघरात देवांची संख्या जास्त असते. पण, पुढच्या पिढीमध्ये नित्य देवपूजा होण्यासाठी आवश्यक तेवढ्या मूर्ती असणे गरजेचे आहॆ. मूर्तींची, देवांची संख्या ही मर्यादित असावी असे शास्त्र सांगते. हिंदू धर्म शास्त्राचा विचार जर केला तर देवघरामध्ये दोन शिवलिंग, दोन शंख, दोन शाळीग्राम, तीन देवी, तीन गणपती यांचे पूजन करू नये, अशी माहिती धर्मसिंधू या ग्रंथात दिल्याचं जोशी यांनी सांगितलं.
देवघरात मोजकेच देव ठेवले पाहिजेत. गणपतीची मूर्ती मात्र अवश्य असावी. प्रत्येक घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी आपल्याबरोबर अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आणते. त्यांचे स्थान अढळ आहे. कुलदेवतांचे फोटो व मूर्ती आणि त्यांच्या जोडीला आपल्या इष्ट देवतेची किंवा एखाद्या संत पुरुषाची तसबीर वा मूर्ती ठेवावी. अनेक घरांमध्ये यंत्र, शाळीग्राम, दोन शिवलिंग, दोन शंख अशाही गोष्टी आढळतात. तसे करणे योग्य नाही. देव्हारा सुटसुटीत असावा.
अशा प्रकारे देवघरात कोणत्या मूर्ती असाव्याच याची माहिती आपण जाणुन घेतली आहे.