मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण अनेक देवी देवतांचे व्रत, उपवास करीत असतात. मनोभावे पूजा देखील करीत असतात. मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत. अगदी मनोभावे व श्रद्धेने श्री स्वामींची सेवा करीत असतात. आपल्याला प्रत्येक संकटातून स्वामी बाहेर काढतील असा विश्वास प्रत्येक भक्ताला असतो.
मित्रांनो आपल्यापैकी हे बरेच जण स्वामींच्या मठामध्ये जाऊन स्वामींची सेवा करीत असतात. जेणेकरून आपले सर्व संकट दूर होईल. तर मित्रांनो काहींना स्वामींच्या मठामध्ये किंवा मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर अशा लोकांनी घरात बसून हे एक काम केले तर स्वामींचा कृपा आशीर्वाद त्यांना मिळू शकतो. हे नेमके काम कोणते आहे आज आपण जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो आपल्याला देवघराजवळ जाऊन तिथे बसून राहायचे आहे. तुमच्या देवघरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या मूर्तीला आपण मुजरा करायचा आहे. नमस्कार करून आपण त्या ठिकाणी बसून राहायचे आहे.
आपण मंदिरात गेल्यानंतर देवदर्शन करतो आणि थोडा वेळ आपण मंदिराच्या गाभाऱ्यात बसतो. अगदी तसेच आपण आपल्या देवघरासमोर बसायचे आहे. स्वामींच्या मूर्तीकडे आपणाला एक टक लावून बघत बसायचे आहे. एक सलग आपणाला देव्हाऱ्यासमोर शांत बसून स्वामींकडे पाहायचे आहे.
मित्रांनो, तुम्हाला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ तुम्ही बसू शकता. कारण बसण्याला कोणतेही बंधन नाही. तुम्हाला जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ तुम्ही देवघरा समोर बसू शकता आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थांचा जप देखील करायचा आहे. हा जप करण्यासाठी आपल्याकडे जपमाळ असणे खूपच गरजेचे आहे.
आपण हा जप अगदी आपल्या मनातल्या मनात देखील करू शकतो. मित्रांनो हे काम आपण दररोज करणे शक्य नसेल तर एकदिवसाड किंवा तुम्हाला शक्य असेल तेव्हा त्यावेळी आपण हे काम करू शकतो.
तसेच ज्यावेळी आपल्या मनात येईल तेव्हा आपण हे काम करू शकतो किंवा मंदिरात जाणार होतो मात्र काही कारणास्तव आपल्याला जाणे झाले नाही म्हणून मनाला खंत वाटून न घेण्यापेक्षा आपण घराच्या घरी स्वामींची सेवा करू शकता. स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी म्हणून त्यांना प्रार्थना देखील घराच्या घरी करू शकता.
केंद्रात गेल्यानेच स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती होईल असे काहीच नाही. फक्त मनात श्रद्धा ठेवून वरती सांगितल्याप्रमाणे जर आपण हे काम घराच्या घरी केले तर आपल्यावर नक्कीच स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतील. तर मित्रांनो तुम्हाला जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही हे काम करायचे आहे.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.