मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये आपल्याला अशी खूप काही माहिती दिली जाते. त्याची आपणाला माहितीही नसते. म्हणजेच आपल्या जीवनात ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी आपल्या काही चुकांमुळे घडत असतात. हे आपल्याला लक्षात येत नाहीत. मित्रांनो पूर्वीच्या काळी लोक हे आहे त्या परिस्थितीमध्ये अगदी सुखा समाधानाने राहत होते. ते दीर्घायुष्य जगत होते.
परंतु आज कालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये एवढे पैसे कमवून देखील कोणीही शांततेमध्ये जगत नाही. अनेक आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. एकूणच आजचे जीवन हे खूपच व्यस्त आहे आणि त्याबरोबरच खूप अडी अडचणींनी ग्रासलेले आहे.
परंतु मित्रांनो आपल्या जीवनात या अडीअडचणी नेमक्या का येतात हे आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? मित्रांनो आपले आजी आजोबा अनेक गोष्टी बद्दल आपल्याला माहिती देत असत. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण ते आपल्याला पटत नाही. एक अंधश्रद्धा आहे असा पण म्हणतो.
तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी बद्दल माहिती सांगणार आहे. आपल्या घरातील स्त्रियांनी कोणत्या दिवशी केस धुवायचे आहेत आणि कोणत्या दिवशी केस धुवायचे नाही याबद्दल माहिती सांगणार आहे. मित्रांनो आजकाल स्त्रिया या कोणत्याही दिवशी केस धुतात म्हणजे त्यांना जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे केस धुतात.
परंतु मित्रांनो याचा वाईट परिणाम हा आपल्या जीवनावर होत असतो हे आपल्या लक्षात येत नाही. तर मित्रांनो एकादशी, अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील महिलांनी आपले केस धुवायचे नाहीत. कारण हे खूपच अशुभ मानले गेलेले आहे. कारण यामुळे आपल्या घरामध्ये भांडण तंटा, वादविवाद खूपच व्हायला सुरुवात होते.
तसेच मित्रांनो सोमवारच्या दिवशी ज्या महिला सोमवारचे व्रत करतात अशा महिलांनी केस धुवायचे नाहीत. जे कोणी सोमवारचे व्रत करत नाही अशा महिलांनी त्या दिवशी केस धुतले तरीही चालते. परंतु जे सोमवारचे व्रत करतात अशा महिलांनी अजिबात सोमवारच्या दिवशी केस धुवायचे नाहीत. यामुळे आपल्या मुलांना प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो किंवा ते वाईट मार्गाकडे वळतात.
तसेच मित्रांनो मंगळवारच्या दिवशी जर घरातील महिलांनी केस धुतले तर घरातील लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणजेच घरामध्ये आर्थिक चणचण भासते. महिलांनी बुधवारच्या दिवशी केस धुतले तर खूपच उत्तम आहे. यामुळे घरामध्ये प्रसन्नतेचे वातावरण कायम राहील.
तसेच गुरुवारच्या दिवशी जर महिलांनी केस धुतले तर अनेक संकटांना सामोरे जावे लागते. तसेच घरातील महिलांनी शुक्रवारच्या दिवशी केस धुतले तर चालते. परंतु ज्या महिलांना पुत्र प्राप्ती व्हावी असे वाटत असते अशा महिलांनी मात्र शुक्रवारच्या दिवशी अजिबात केस धुवायचे नाहीत.
जर महिलांनी शनिवारच्या दिवशी केस धुतले तर त्यांच्या पतीची प्रगती खुंटते म्हणजेच त्यांच्या जोडीदाराला प्रत्येक कामात अपयश प्राप्त होते. त्यांनी जे काही काम हाती घेतलेले आहे त्या कामात त्यांना यश प्राप्त होत नाही. मित्रांनो महिलांनी रविवारच्या दिवशी केस धुणे कधीही शुभ समजले जाते.
तर मित्रांनो ही पद्धत खूपच पूर्वीपासून चालत आलेली आहे. परंतु आजकाल या पद्धतीचा सगळ्यांनाच विसर पडलेला आहे. आपले पूर्वज या गोष्टी अगदी कटाक्षाने पाळत होते. त्यामुळेच त्यांचे जीवन हे खूपच समाधानी होते. या गोष्टी पाळणे न पाळणे हे प्रत्येकाच्या मनावर अवलंबून आहे. परंतु मित्रांनो या गोष्टी आपल्या जीवनामध्ये खूपच उपयोगी आहेत आणि याचा अवलंब जरूर एक वेळ नक्की करून पहा. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फरक झालेला नक्कीच जाणवेल.
मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला