आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी विचार

जरा हटके

नमस्कार मित्रांनो,

तुमच्यामुळे कोणाची बहीण किवा मुलगी जर रस्ता बदल असेल तर समजून जा तुमच्यात आणि त्या गल्लीतल्या कुत्र्यात काहीच फरक नाही. प्रेमाने जग जिंकता येतं हो पण प्रेम विकार आणि भंगार मार्गाने आणि नालायकपणाने करू नका. कामासाठी वेळ द्या कारण ती यशाची किंमत आहे. विचार करण्यासाठी वेळ द्या कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे.

खेळण्यासाठी वेळ द्या कारण ते तारुण्याचं गुपित आहे. वाचनासाठी वेळ द्या कारण तो ज्ञानाचा पाया आहे. स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्त्वाचे दुसऱ्यासाठी वेळ द्या. कारण ते नसतील तर आपल्या असण्याचा काहीच अर्थ नाही.

भाऊबंदकीला बदलवणे श्री रामाला जमले नाही, अर्जुनाला जमले, पेशव्यांनाही जमले नाही, आपल्यालाही जमणार नाही. बदल स्वतः केला पाहिजे. धाकटे असाल तर सहन करायला शिका. थोरले असाल तर माफ करायला शिका. कितीही भांडा प्रत्येकाचा शेवटचा प्रवास हा भाऊबंदकीच्या खांद्यावरच होणार आहे. गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे येतील हे सांगता येत नाही.

म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण हसत जगा. नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसं मोठी असतात. म्हणून नाते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका. कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहाण नाही पण आग विजवू शकते. तरुणपणी वाढदिवस म्हातारपणी एक आठ दिवस हे आजच समीकरण आहे. आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या.

रात्री फुलांना सुद्धा माहिती नसत की, सकाळी मंदिरात जायचं की, शमशानात. धडा तर लहान मुलाकडून घेतला पाहिजे जे आपलाच मार खाऊन परत आपल्याकडेच येतात. नाते जपत चला कारण आजचा माणूस एवढा एकटा पडला की, फोटो काढणारा पण नाही.

सेल्फी काढावी लागते ज्याला लोक फॅशन समजतात. आयुष्यात कधीच कोणावर बोलण्यासाठी जबरदस्ती करू नका आणि ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावसं वाटतं त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष करू नका. प्रयत्न कधीच सोडून देऊ नका. कधी कधी चाव्यांच्या झुगड्यात शेवटची चावी त्या कुलपाची असते ज्या कुलपात आपले ध्येय बंद असते.

समाजात आपली दहशत असण्यापेक्षा रिस्पेक्ट असणं खूप महत्वाच आहे. बंद आपुलकीचे असावेत नाते माणुसकीचे असावे. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *