धनु राशीच्या लोकांच्या 14 खास गोष्टी, जाणून घ्या त्यांचा स्वभाव ?

अध्यात्मिक राशिभविष्य

ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ये, यो, भा, भी, भू, ध, फा, ढा, भे पासून सुरु होत असेल त्यांची राशी धनु राहते. या राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. चिन्ह धनुष्यधारी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांच्या खास गोष्टी…

1. ही द्विस्वभाव असलेली राशी असून, या राशीचे चिन्ह धनुष्यधारी आहे. ही राशी दक्षिण दिशेचे द्योतक आहे. तसेच धनू राशीच्या व्यक्ती खूपच खुल्या विचारांच्या असतात. तसेच जीवनाचा अर्थ ते सहज समजून घेतात. इतरांबाबत जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते. या राशीच्या व्यक्तींना रोमांच खूप आवडतो. बेधडक, आत्मविश्वास असलेल्या, महत्त्वाकांक्षी व स्पष्टवक्ते असतात.

यांच्या मतानुसार त्यांनी ज्यांची पारख केलेली असते तेच खरे असते. त्यामुळे त्यांची मित्रसंख्या कमी असते. या राशीच्या व्यक्ती मध्यम अंगकाठीच्या असतात. तसेच यांचे केस भुरकट आणि डोळे मोठे असतात. या व्यक्तींमध्ये धाडस हा गुण कमी प्रमाणात असतो. करिअरसाठी जीवनसाथी वा वैवाहिक जीवनाची उपेक्षा करतात. या राशीच्या मुली इतरांवर विश्वास ठेवताना चारदा विचार करतात.

त्या उंच असतात व इतरांशी सहज मैत्री करत नाहीत. तसेच आपल्या शिक्षण आणि करिअरमुळे जोडीदार आणि वैवाहिक जीवनाची उपेक्षा करतात. धनु राशीच्या मुली सहजरीत्या कोणाशीही मैत्री करत नाहीत. कष्ट करूनच यांना सुख प्राप्त होते. वडिलोपार्जित व्यवसायामध्ये वृद्धी करतात. याचबरोबर, हे एक उत्तम श्रोता असतात आणि यांना खुल्या मनाचे आणि प्रामाणिक व्यवहार करणारे लोक आवडतात.

या राशीच्या स्त्रिया उत्तम गृहणी तसेह करिअरमध्ये यश प्राप्त करण्याची इच्छा बाळगून असतात. यांना जीवनात सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. हे सुखी आणि संपन्न जीवन व्यतीत करतात. या राशीचे लोक द्विधा मनस्थितीमध्ये राहणारे असतात. एकाध निर्णय घेण्यासाठी यांना खूप वेळ लागतो. हा उशीर अनेकवेळा यांना नुकसानदायक ठरतो.

तसेच हे लोक इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ करत नाहीत आणि स्वतःचे काम करण्यातच दंग राहतात. याशिवाय, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, धनू राशीच्या लोकांना अगदी मनापासून तरूण राहायला आवडतं. नेहमी काहीतरी नवं करण्याचा उत्साह या व्यक्तींमध्ये असतो. तसंच आपल्या सीमा ओलांडून यांना काहीतरी करायचं असतं. त्यामुळेच बरेचदा फ्लर्ट करण्यामध्ये या राशीच्या व्यक्ती पुढे असतात.

तसेच या व्यक्तींना सतत हसणे खिदळणे खूपच आवडते. लहान सहान गोष्टीतही या व्यक्ती आनंद शोधतात. तुम्ही या व्यक्तींबरोबर असाल तर तुम्हाला कधीही कंटाळवाणे वाटणार नाही याची नक्की हमी आहे. यांच्या याच स्वभावामुळे मित्रपरिवार जास्त मोठा असतो. तसेच या एखादी गोष्ट न आवडल्यास, ती गोष्ट कधीच स्वीकार करत नाहीत. बरेचदा स्वतःची चूक असूनही मान्य करत नाहीत. त्यामुळे लोकांच्या नजरेत दोषी ठरतात. या व्यक्तींना आपले स्वातंत्र्य खूपच आवडते. अत्यंत उत्साही आणि सतत मजेत राहणाऱ्या या व्यक्ती असतात.

कोणीही यांना आपल्या नियंत्रणात ठेवणे या व्यक्तीना आवडत नाही. कोणत्याही प्रकारची बंधने यांना चालत नाहीत. आपल्या अटी आणि शर्तींवर जगणाऱ्या या व्यक्ती आहेत. स्वभावाने जिद्दी आणि हट्टी असल्याने खूपच फटळत असतात. यांच्या गोष्टी वाईट वाटो वा चांगल्या तोंडावर सरळ सांगून टाकणे हाच यांचा स्वभाव आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत भाग्यशाली असून हुशारही असतात. यांच्यातील प्रतिभा यांना वेगळे दर्शविते

कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्या आयुष्यात साहस या व्यक्ती आणतातच. प्रत्येक वेळी नवा विचार, नव्या रूटीनमुळे यांचे आयुष्य कधीच कंटाळवाणे नसते. त्यामुळे अनेकांना या व्यक्तींचा हेवा वाटतो धनू राशीच्या व्यक्ती आपले प्रेम दर्शविण्यासाठी कधीही समोरून सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर आपल्या कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न करतात.

तुम्हाला जेव्हा या व्यक्ती विशेष वागणूक देत असतील तेव्हा समजून जावे की या व्यक्ती तुमच्या प्रेमात आहेत. पण कायम प्रेम प्रामाणिकपणे आणि खरेपणाने आपल्या जोडीदाराला साथ देतात परफेक्ट मॅचबद्दल सांगायचे झाले तर धनू राशीच्या व्यक्तींसाठी मेष राशीची व्यक्ती ही अत्यंत योग्य आहे. कारण त्यांच्या गोष्टी, स्वभाव आणि विचार एकमेकांशी पटणारे असतात.

दोघांचाही दृष्टीकोन सरळसाधा आणि कोणालाही न जुमानता पुढे जाणारा असतो. तसंच सामाजिक कार्याची दोघांनाही आवड असते. यांच्या लव्हलाईफमध्ये प्रेमापेक्षा मैत्रीला जास्त महत्व असते. त्यामुळेच या दोन्ही व्यक्ती एकमेकांपासून कंटाळत नाहीत. आपल्या वागणुकीने आणि स्वभावाने आयुष्यात सतत मजा करत राहतात.

करिअरमध्ये धनू राशीच्या व्यक्ती नेता म्हणूनच पुढे असतात. बरेचदा राजकारणात या व्यक्ती पुढे दिसून येतात. त्यामुळेच यांचे करिअर हे नेता, राजकारण, चित्रपट, उद्योग यामध्ये अधिक चांगले ठरते. या व्यक्ती जरा जिद्दी आणि आखडू स्वभावाच्या असतात. आपले व्यक्तीत्व लपवून ठेवायची यांना सवय असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *