झोप येणारच ! खव्यासारखा हा पदार्थ खाऊन दूध प्या, निद्रानाश वर घरगुती उपाय.

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

एखाद्या रात्री झोप मोड होऊन झोप न येण्याची समस्या सामान्य स्वरूपाची असते. पण ही समस्या तुम्हाला वारंवार म्हणजे आठवड्यातील 3 किंवा त्यापेक्षा जास्त रात्री जाणवत असेल तर तुम्हाला निद्रानाश नावाचा आजार झाला असे समजून घ्या. अनेक आजारांमध्ये देखील रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही.

पण तुम्ही जर निरोगी असाल आणि तुम्हाला झोप लागत नसेल तर मात्र चिंतेची बाब असू शकते. यासाठी तुम्ही आजचा हा उपाय करण्याबरोबर दिवसा झोपण्याची सवय बंद करायला हवी. वारंवार एखाद्या विषयावर विचार करणे थांबायला होईल किंवा अशा अनेक उपाय करून या समस्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आजचा लेख हा पूर्ण वाचा.

निद्रानाशावर गुणकारी असा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यक आहे अश्वगंधा पावडर. मित्रांनो अश्वगंधा हे नाव तुम्हाला जरी नवीन वाटत असले तरी ही वनस्पती बहुतेक वेळा तुम्ही तुमच्या परिसरात बघितले असेल. ही अश्वगंधा पावडर आयुर्वेदिक मेडिकलमध्ये सहजरीत्या देखील उपलब्ध होते.

दिवसभराच्या कामामुळे आपल्या शरीराला सर्व स्नायूंना थकवा येत असतो. याशिवाय शरीरातील वातदोष वाढून देखील थकवा जाणवतो आणि अशावेळी अश्वगंधा वनस्पतीचे पावडर यावर फार उपयुक्त ठरते. अगदी मेंदूच्या स्नायूंना देखील आराम करण्याचे कार्य ही अश्वगंधा पावडर करते.

जेणेकरून झोप येण्यासाठी आवश्यक असणारे हार्मोन तयार होण्यास सुरुवात होते आणि झोप येण्यास सुरुवात होते. आपण 1 चमचा येवढी अश्वगंधा पावडर 1 वेळच्या उपायासाठी वापरायचे आहे. यानंतर आपल्याला आवश्यक आहे खडीसाखर.

आपण मोठ्या आकाराचे खडीसाखर वापरायचे आहे आणि तिची बारीकशी पावडर बनवायचे आहे. आपण एक ते दोन चमचे एवढी पावडर यामध्ये टाकायचे आहे. शेवटचा घटक म्हणजे तूप. देशी गायीचे तूप वापरल्याने त्याचे अनेक खूप सारे फायदे आपणास मिळतात.

पण तुम्हाला गायीचे तूप उपलब्ध झाले नाही तर तुमच्याकडे उपलब्ध असणारे कोणत्याही ब्रॅडचे तूप तुम्ही वापरू शकता. दोन ते तीन चमचे एवढे तूप घेऊन यामध्ये टाकायचे आहे. हे सर्व पदार्थ व्यवस्थितरित्या मिक्स करायचे आहे.

मित्रांनो निद्रानाशाची समस्या तुम्हाला जाणवत असेल तर सकाळी योगासने केल्याने मनावरील आणि शरीरावरील ताण तणाव कमी होण्यास मदत होते. मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्हीचा मर्यादित वापर आणि चहा, सिगारेटचे सेवन बंद केल्याने देखील तुम्हाला शांत झोप येण्यास मदत होणार आहे.

आता आपण बनवलेले हे मिश्रण झोपण्यापूर्वी खायचे आहे आणि यानंतर एक ग्लास अगदी कोमट केलेले दूध प्यायचे आहे. सलग सात ते आठ दिवस हा उपाय केल्याने तुमची झोप पूर्ण होईल. निद्रनाशाची समस्या मुळापासून नष्ट होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *