नमस्कार मित्रांनो,
सध्या चिकणगुणिया हा मोठ्या प्रमाणात पसरत आहे. तुम्हालाही त्याचा संसर्ग झाला असेल तर तुमचे हात पाय खूप दुखत असतील तसेच बरेच दिवस औषधे घेऊनही हात पाय दुखणे किंवा अंगातील जो त्रास आहे तो कमी होत नसेल तर आजचा हा दुहेरी उपाय करा. तुम्हाला तात्काळ आराम मिळेल.
त्याचप्रमाणे या उपायाने तुमचे गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी तसेच सांध्यातील जर वंगण संपला असेल तर त्या संबंधी जेवढ्या समस्या आहेत त्या समस्या संपूर्ण कमी होतील. मित्रांनो एखाद्या व्यक्तीस अचानक ताप येत असेल, हाडे दुखत असेल, उठता बसता सांध्यांमध्ये खूप त्रास होत असेल, शरीरात ताप येऊन शरीर गरम होत असेल, खूप थकवा जाणवत असेल आणि डोके दुखत असेल तर तुम्हाला देखील चिकनगुणिया असू शकतो.
कारण हे लक्षण चिकनगुणियाची आहेत. यात अहचाल करताना सांध्यात होणारा त्रास हा सर्वात जास्त असतो. चिकनगुणिया हा रोग डासांच्या चावण्यापासून पसरतो. एडीज इजिप्ती किंवा एडीज अल्बोपिक्टस नावाचे डास जेव्हा चावतात तेव्हा त्यांच्या चवण्यातून अल्फा नावाचा विषाणू रक्ततात पसरतो आणि तो या रोगासाठी कारणीभूत असतो. म्हणून आपण डास चावण्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे.
अशा भयंकर त्रास देणाऱ्या चिकणगुणियावर आज 2 उपचार बघणार आहोत. आणि हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. यातील पहिला उपाय आपल्याला रोज सकाळी करायचा आहे. यात काढा बनवायचा आहे. यासाठी आपल्याला 1 वनस्पती लागणार आहे. ती वनस्पती म्हणजे पारिजातक. हे झाड ओळखायचे अगदी सोपे आहे. याला पांढऱ्या रंगांची फुले येतात. याचा देट नारंगी किंवा संत्र्याच्या रंगाचा असतो. ही बागेत तसेच मंदिरासमोर व अनेक व्यक्तींच्या घरी लावलेले असते.
याला इंग्लिशमध्ये नाईट जास्मिन असे म्हणतात. या झाडाची 5 पाने घ्यायची आहेत. जास्त कवळी किंवा जास्त जुनी पाने घेऊ नका. तर मध्यम स्वरूपाची 5 पाने घ्या. यात बेन्झोईक ऍसिड, ऍमोरफस, रेझिम, ऍसओरिक ऍसिड हे घटक असतात. जे सांध्यातील वंगण बनण्यास मदत करतात. आणि वंगण बनून सांधेदुखी पूर्णपणे थांबवतात. काढा बनवणं अगदी सोपं आहे. 1 ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये ही 5 पाने चुरघळून टाका.
हे मिश्रण एक तृतीयांश म्हणजे तिसरा भाग शिल्लक राहिपर्यंत आपल्याला उकळू द्यायचं आहे. नंतर हे गाळून घ्या. हे आपल्याला रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे. हा पहिला उपाय झाला. आता आपल्याला हा उपाय सलग 7 दिवस करायचं आहे. 7 दिवस तुमचा त्रास पूर्णपणे कमी होईल. आपण गुडघेदुखी, सांधेदुखीसाठी हा उपाय सलग 1 ते 2 महिने केला तरी त्याचा परिणाम चांगला आहे. आता आपण दुसरा उपाय बघूया.
तो अगदी सोपा आहे. याचा परिणाम खूप चमत्कारिक आहे. यात आपल्याला पपईच्या कोवळ्या पानांचा रस बनवायचा आहे. यामुळे शरीरातील कमी झालेल्या पेशी तात्काळ नॉर्मलला म्हणजे आहे त्या लेव्हलला येतात. मित्रांनो कोणताही रोग असेल आणि त्यात जर एखाद्या व्यक्तीला ताप आला असेल तर त्याच्या अंगात पांढऱ्या पेशी कमी होतात. तर ही पपई इतकी चमत्कारिक आहे मी, फक्त 3 वेळा हा जर रस घेतला तर तुमच्या शरीरात पांढऱ्या पेशी झपाट्याने वाढतात आणि नॉर्मल लेव्हलला येतात.
असा हा दुसरा उपाय रोज संध्याकाळी जेवणापूर्वी करायचं आहे. तो पण फक्त 5 दिवस करायचं आहे. एक वेळेच्या उपायांसाठी 1 पपईच कोवळं पान घ्यायचं आहे. हे पपईच कोवळं पान बारीक वाटून मिक्सरच्या साहाय्याने याचा रस बनवू शकता. किंवा तुमच्याकडे इतर साधन असेल तर त्यात वाटून तुम्ही त्याचा रस काढू शकता. रस काढण्यासाठी आपल्याला यात थोडं पाणी मिक्स करायचं आहे. तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी मिक्स करून याचा आपल्याला रस काढायचं आहे.
छोट्या मुलांसाठी म्हणजे 3 वर्षांपासून ते 15 वर्षापर्यंत मुलांना तुम्ही 2 चमचा हा रस देऊ शकता. आणि सामान्य व्यक्तीला हा रस अर्धा कप एक वेळेस देऊ शकता. हा उपाय आपल्याला 5 दिवस करायचा आहे. अशा पध्दतीने तुम्ही हे 2 उपाय केले तर तुमचा चिकणगुणिया पूर्णपणे नॉर्मल होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे गुडघेदुखी, सांधेदुखी आणि पाठदुखी किंवा हाडांची ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.