मित्रांनो लग्न म्हटलं की दोन जीवांचे एकत्र येणे होय. मग आपण विवाहाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेस अनेक गोष्टींचा विचार करून विवाह करण्यास तयार होतो. विवाह करताना अनेक कुंडली तसेच किती गुण जमतात तसेच स्वभाव कसा आहे या सर्व गोष्टींची पुरेपूर काळजी घेत असतो.
परंतु काही वेळेस एवढे करूनही बऱ्याच वेळा विवाह मध्ये दुरता झालेली आपल्याला पाहायला मिळते.म्हणजेच काही ना काही कारणामुळे लग्न हे तुटले जाते. म्हणजेच नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. त्यामुळे मित्रांनो आज मी तुम्हाला अशा काही राशीबद्दल सांगणार आहे. या राशींचे लग्न म्हणजे एकमेकांसोबत त्यांचे अजिबात पटत नाही.
म्हणजेच काही ना काही कारणावरून त्यांच्यात नेहमी वादविवाद, भांडणे हे होतच असतात. ज्योतिष शास्त्रानुसार अनेक राशी या एकमेकांसोबत चांगले असतात तर काही राशी एकमेकांसोबत काही क्षण देखील राहू शकत नाहीत. तर अशा या कोणत्या राशी आहेत ज्यांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही. चला तर मग जाणून घेऊयात तर यातील
पहिली राशी आहे मकर आणि मेष
मकर राशीतील लोकांचे विचार तसेच राहणीमान खूपच उत्तम आणि चांगले असते. परंतु त्यांचे मेष राशीसोबत अजिबात पटत नाही. कारण त्यांचे विचार हे मेष राशींबरोबर अजिबात जुळत नाहीत. मेष राशीच्या नियंत्रित स्वभावामुळे मकर राशींना खूपच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे खूपच तणाव त्यांना जाणवतो. त्यामुळे मकर आणि मेष राशीतील लोकांचे अजिबात पटत नाही. त्यांच्यामध्ये सतत काही ना काही वाद हे होतच राहतात.
कुंभ आणि वृषभ
कुंभ राशीतील लोक हे खूपच हट्टी स्वतंत्र विचाराचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचे वृषभ राशीतील लोकांबरोबर सहसा अजिबात पटत नाही. म्हणजेच कुंभ आणि वृषभ राशींच्या लोकांची जोडी असेल तर यांचे कोणत्या ना कोणत्या छोट्या-मोठ्या गोष्टीवरून सतत भांडणे, मारामारी हे होतच राहते. वृषभ राशीचे लोक कुंभ राशीच्या खुल्या विचारांशी अजिबात तडजोड करत नाहीत. त्यामुळे या दोघांचे विचार एकमेकांसोबत अजिबात जुळत नाहीत.
मीन आणि मिथुन
मीन राशीचे लोक उत्स्फूर्त वर्तनाचे असतात. त्यामुळे अनेकदा ते मिथुन राशीच्या लोकांना समजत नाहीत. मिथुन राशीचे लोक फक्त स्वतःबद्दलच विचार करतात तर मीन राशीचे लोक इतरांच्या भावना, इच्छा यांची पूर्ण काळजी घेतात. तसेच मीन राशीच्या लोकांना खूप मदत होते. त्यामुळे दोघांचे वागणे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, त्यामुळे दोघांनाही चांगली जोडी म्हटले जात नाही.
कर्क आणि तूळ
कर्क राशीतील लोक हे खूपच प्रामाणिक आणि संवेदनशील स्वभावाचे असतात. तर तूळ राशीचे लोक हे खूपच चंचल आणि दिखाऊपणा वृत्तीचे असतात. हे दोघेही एकमेकांशी विसंगत असल्यामुळे या दोघांचे अजिबात काहीही पटत नाही. कर्क राशीच्या लोकांना तुळ राशींच्या लोकांसोबत खूपच संयमाने काम करावे लागते आणि जेव्हा हा संयम गमावला जातो तेव्हा त्यांचे संबंध बिघडू शकतात. त्यामुळेच कर्क आणि तुळ राशींचे सहसा पटत नाही.
अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.