या महिन्यात ग्रहाच्या अशा गोचरामुळे ‘विनाशकारी’ योगाची स्थिती

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो गृह नक्षत्रांचा प्रभाव म्हणजे त्यांची बदलत्या स्थितीचा प्रत्येक राशींवर काही ना काही प्रभाव हा घडतच असतो. एप्रिल महिन्यामध्ये देखील काही ग्रहांचा गोचर झाल्यामुळे काही राशींच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी येणार आहेत. म्हणजेच त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

तर एप्रिल महिन्यामध्ये शुक्र, सूर्य, बुध आणि गुरु ग्रह हा गोचर करणार आहे आणि या गोचराचे शुभ अशुभ अशी स्थिती होणार आहे. काही राशींसाठी खूपच त्रासदायक हा गोचर असणार आहे. त्यामुळे त्या राशीतील लोकांनी खूपच सावध राहणे गरजेचे आहे. 14 एप्रिल 2023 रोजी सूर्यदेव तीन वाजून बारा मिनिटांनी मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

त्यानंतर त्यानंतर 21 एप्रिलला बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. गुरु ग्रहही 22 एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यात मेष राशीत राहु ठाण मांडून बसल्याने काही अशुभ योग तयार होणार आहेत. मेष राशीत राहु आणि गुरुच्या युतीमुळे चांडाळ योग तयार होणार आहे. हा योग ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.

त्यानंतर सूर्य आणि राहुच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होत आहे. हा तयार झालेला योग साधारण महिनाभर देखील असणार आहे. त्यामुळे बऱ्याच राशींना या काळामध्ये खूपच सावध राहण्याची गरज आहे. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटे येऊन त्यांच्या जीवनामध्ये अनेक विनाशकारी अशा घटना घडणार आहेत.  तर या राशी नेमक्या कोणत्या आहेत चला तर मग जाणून घेऊया.

पहिली राशी आहे सिंह
सिंह राशीतील लोकांना एप्रिल महिना खूपच संकटांचा जाणार आहे. म्हणजेच यांच्या जीवनामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते आणि याचा परिणाम त्यांच्या आर्थिक स्थितीवर देखील पडणार आहे. आर्थिक खर्च भरपूर वाढल्याने यांना डोकेदुखीचा त्रास होणार आहे. त्यांचे धंद्याकडे विशेष असे लक्ष देखील राहणार नाही. तसेच जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला यामध्ये फटका देखील बसू शकतो. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करतांना योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घेऊनच करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण यामुळे मग तुम्हाला आर्थिक फटका भविष्यामध्ये बसू शकतो.

दुसरी राशी आहे तूळ
या एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या गोचरामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना सहन करावा लागणार आहे. ग्रहांची स्थिती यांच्यासाठी अजिबात अनुकूल नाही. त्यामुळे सावध राहणे खूपच गरजेचे आहे. तसेच वैवाहिक जीवनामध्ये अनेक प्रकारचे कलह होऊ शकतात. तसेच कुटुंबामध्ये देखील विविध कारणावरून भांडणे होऊ शकतात. त्यामुळे विनाकारण वाद करणे तुम्ही या काळामध्ये टाळायचे आहे. जितके शांत तुम्हाला राहता येईल तितके शांत तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये राहायचे आहे.

तिसरी राशी आहे वृश्चिक
एप्रिल महिन्यामध्ये ग्रहमान यांच्यासाठी अनुकूल नसणार आहे. व्यावसायिक जीवनामध्ये त्यांना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी विनाकारण वाद देखील होऊ शकतात. तसेच व्यवहार पैशांचा जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही अगदी विचारपूर्वक करायचा आहे. वैवाहिक जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणींचा सामना तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये करावा लागेल.

यानंतरची राशी आहे धनु
धनु राशीची जरी साडेसाती पासून सुटका झाली असली तरी ग्रहमान त्यांच्या बाजूने नसल्याने अनेक त्रास यांना एप्रिल महिन्यामध्ये सहन करावा लागणार आहे. नोकरीसाठी तुम्हाला खूप जागी फिरावे लागणार आहे. तसेच आरोग्य विषयक अनेक त्रास तुम्हाला संभवतील. तसेच तुम्ही या काळामध्ये उपासना करण्यामध्ये जास्तीत जास्त वेळ खर्च कराल. तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांना खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. कुटुंबामध्ये आर्थिक स्थैर्य नसल्याने वादविवाद होण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *