नमस्कार मित्रांनो,
भारतात सर्वत्र शिवभक्तांकडून महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवशंकराची विशेष पूजा केली जाते. 2022 मध्ये महाशिवरात्री मंगळवारी 1 मार्चला आलेली आहे आणि मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शिवशंकरांचा माता पार्वती यांच्यासोबत विवाह झाला होता.
तसेच एका पौराणिक कथेनुसार एकदा माता पार्वतीने तिच्या कपाळावरचा घाम पुसला आणि त्याचे काही थेंब मंदार पर्वतावर पडले त्यातूनच बेल वृक्षाचा उगम झाला असे म्हणतात. त्यामुळे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्यात येते. पण या महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे दान केलं तर ते जास्त फलदायी ठरते.
या दिवशी मंगळ, शनी, बुध, चंद्र आणि शुक्र मकर राशीत असणार आहेत. अशा स्थितीत यावेळी महाशिवरात्रीला राशीनुसार भगवान शिवशंकरांची पूजा करणे अत्यंत फलदायी ठरते. चला मग जाणून घेऊया की, कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या पद्धतीने भगवान शिवशंकरांची पूजा करायला हवी.
1) मेष राशीच्या लोकांनी गंगेच्या पाण्यात साखर आणि गूळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा याशिवाय शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय यांचा 108 वेळा जप करावा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
2) वृषभ राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गाईचे दूध आणि दही यांने अभिषेक करणे फलदायी ठरेल. असं केल्यामुळे धनाशी संबंधित समस्या दूर होतील आणि नोकरीची समस्या सुद्धा संपुष्टात येईल.
3) महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला उसाच्या रसाने मिथुन राशीच्या लोकांनी अभिषेक करावा. तसेच उजव्या हाताने धतुरा अर्पण करा. असं केल्याने तुम्हाला काही मानसिक समस्या असतील तर त्या सुद्धा दूर होण्यास मदत होते.
4) कर्क राशीच्या लोकांनी दुधात साखर घालुन शिवलिंगाचा अभिषेक करा असं केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील, तसेच तुमचे कुटुंबही आनंदी होईल.
5) सिंह राशीच्या या लोकांनी पाण्यात लाल चंदन घालून शिवलिंगाचा अभिषेक करा असं केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या कौटुंबिक समस्या देखील दूर होतील.
6) कन्या राशी या लोकांनी दुर्वा पाण्यात घालून त्या पाण्याने भगवान शिवशंकरांना अभिषेक केल्यास तुम्ही रोगमुक्त व्हाल.
7) तुळ राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गाईचे तूप आणि गुलाबाच्या अत्तराचा अभिषेक करावा असं केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते आणि आर्थिक प्रश्नही सुटतात.
8) वृश्चिक राशी या शिवरात्रीला पाण्यात साखर आणि मध मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असं केल्यामुळे तुमच्या कुटुंबातील वातावरण नक्कीच आनंद होईल.
9 ) धनु राशीच्या लोकांनी शिवलिंगाला दुधाने अभिषेक करावा. यामुळे त्यांच्या करिअर संबंधित समस्या सुटतील.
10) मकर राशी या लोकांनी शिवलिंगावर तिळाच्या तेलाचा अभिषेक करा. तसेच बेलपत्रावर पांढरे चंदन लावून उजव्या हाताने शिवलिंगाला अर्पण करा. असं केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. त्याचबरोबर तुमच्या शारीरिक वेदनाही दूर होतील.
11) कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करावा त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना बेलपत्राची माळही अर्पण करावी. त्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल.
12) मीन राशी या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी हळदीने अभिषेक करावा. असं केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि कुटुंबातही आनंद येईल.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.