मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती, फोटो आपल्या देवघरांमध्ये असतात. अनेक प्रकारचे व्रत, उपवास पूजाविधी आपण करीत असतो. जेणेकरून आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. मित्रांनो देवपूजेमध्ये नारळाला विशेष असे महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे.
आपण कोणत्याही मंदिरात किंवा देवदर्शनाला गेलो की आपण तेथे नारळ हा फोडतोच. आपण आपल्या कुलदेवतेला गेलो की तिथे आपण नारळ हा फोडतच असतो. परंतु मित्रांनो तुम्ही लक्ष दिले आहे का की हा नारळ फक्त पुरुषच फोडत असतात. स्त्रिया नारळ कधी फोडलेले तुम्ही पाहिले आहे का? तर मित्रांनो स्त्रिया नारळ का फोडत नाहीत. यामागचे नेमके कारण काय आहे याविषयीची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला म्हणजे श्रीफळाला खूप असे महत्त्व आहे. कोणतीही आपण पूजा करीत असताना आपण त्या पूजेमध्ये नारळ हा ठेवीतच असतो किंवा फोडतच असतो. नारळाशिवाय कोणतीही पूजा अपुरीच मांडली जाते.
मित्रांनो शास्त्रानुसार स्त्रियांनी नारळ फोडणे हे खूपच अशुभ मानले गेलेले आहे. नारळ फोडण्यासाठी स्त्रीला वंचित ठेवण्यात आलेले आहे. या मागची एक कथा खूपच प्रचलित आहे. ही कथा अशी आहे की, जे ब्रम्हरुपी विश्वामित्र होते त्यांनी या विश्वाची निर्मिती केली. मात्र हे विश्व निर्माण करण्यापूर्वी ब्रम्हरुपी विश्वमित्र यांनी नारळाची निर्मिती केली होती. म्हणूनच या नारळाला मानवच प्रतीक मानले जाते.
नारळ हे बीजरुपी असल्यामुळे ते प्रजलन क्षमतेशी जुळलेले असतात. म्हणजेच आपली जी प्रजलन क्षमता असते आपण प्रजलन करून जी उत्पत्ती करतो अगदी त्याचाही आपला संबंध आहे.
आपल्या सर्वांना माहीत असेल की, स्त्रिया या बीज रूपातच बाळाला जन्माला घालतात आणि म्हणूनच हिंदू धर्म शास्त्राने स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही. तर तुम्हाला आता कळलेच असेल की नारळ फक्त पुरुषच का फोडतात.
तर मित्रांनो नारळ हे बीजरुपी आहे आणि स्त्रिया देखील या बीजरुपी असल्यामुळे नारळ फोडण्यास हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे मित्रांनो आपणाला आपल्या आसपास कुठेही मंदिरात किंवा एखाद्या पूजेमध्ये आपण पाहतो की, पूजेमधे फक्त पुरुषच नारळ फोडतात. स्त्रिया अजिबात नारळ फोडत नाहीत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.