या दिवशी का तोडू नयेत तुळशीची पानं? यामागचे कारण नक्की जाणून घ्या

वास्तूशास्त्र

मित्रांनो, तुळस ही आपल्या घरची लक्ष्मी असते. तुळशीला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तुळस ही पूजनीय मानली गेलेली आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये आपल्याला तुळशी संबंधीच्या अनेक कथा देखील वाचण्यास मिळतात. प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस ही असते आणि प्रत्येकाच्या घरातील महिला या तुळशीची अगदी मनोभावे पूजा देखील करीत असतात.

परंतु मित्रांनो तुळशीची पानं या दिवशी अजिबात तोडायची नाहीत असे आपण ऐकलेच असेल. परंतु मित्रांनो नेमके या दिवशी तुळशीची पानं तोडल्याने काय परिणाम होतात आणि नेमकी पाने या दिवशी का तोडू नयेत याविषयीची आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो तुळशीची पानं ही रविवारच्या दिवशी अजिबात तोडायची नाहीत.

तर मित्रांनो रविवारच्या दिवशी तुळशीची पानं का तोडू नयेत त्यामागचे धार्मिक कारण नेमके काय आहे चला तर मग जाणून घेऊयात. तर मित्रांनो असे मानले जाते की रविवार हा श्री विष्णूंना खूपच प्रिय आहे. तसेच मित्रांनो तुळशी मातेलाही रविवार खूपच प्रिय आहे आणि त्यामुळे मित्रांनो रविवारी तुळशीची पाने आपण अजिबात तोडू नयेत.

असे मानले जाते की देवी तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि त्यांच्या हृदयातही तिचे विशेष असे स्थान आहे. देवी तुळशी ही हरि विष्णूचे एक रूप भगवान शालिग्रामची पत्नी आहे. कार्तिक महिन्यातील मोठ्या एकादशीला भगवान शाळीग्राम आणि माता तुळशीला लग्नाच्या बंधनात बांधले गेले.

माता तुळशीला हरि विष्णूचा आशीर्वाद आहे की, ती नसलेली पूजा ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळेच मित्रांनो पूजा आणि शुभकार्यात तुळशीमातेला विशेष स्थान दिले गेलेले आहे. जोपर्यंत प्रसादांमध्ये तुळशी माता नाही तोपर्यंत देव अन्न ग्रहण करत नाहीत.

रविवारी, तुळशी माता भगवान विष्णूच्या पूजेत तल्लीन असते. तसेच इतर दिवशी तिच्या भक्तांच्या कल्याणासाठी उपस्थित राहते.अशी ही एक मान्यता आहे. माता तुळशीच्या ध्यानात कोणतेही संकट येऊ नये, म्हणूनच ते रविवारी तोडत नाहीत. यासोबतच रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी घालण्याचाही विचार केला जातो.

तसेच मित्रांनो रविवारचा दिवस सोडून एकादशीच्या दिवशीही तुळशीची पाने तोडली जात नाहीत. एकादशी हा भगवान विष्णूंचा दिवस मानला गेलेला आहे आणि या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जल उपवास करत असते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणीही घालायचे नाही.त्यामुळे तिचा उपवास मोडतो. तसेच तुळशीची पानेही या दिवशी अजिबात तोडू नयेत.

मित्रांनो अशी ही तुळस आपल्या घरची लक्ष्मी असते. त्यामुळे मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे या दिवशी तुम्ही तुळशीची पाने अजिबात तोडायची नाहीत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *