नमस्कार मित्रांनो,
अगदी पंचतारांकित हॉटेलापासून ते धाबापर्यंत, सर्व ठिकाणी मिळणारी भाजी म्हणजे वांग किंवा बैंगन फ्राय. अनेक लोकांना हि भाजी आवडते चवीला सुद्धा खूप चांगली लागते. वांग हे गुणधर्माने मधु तीक्ष्ण वात कारक आहे, कफ कारक आहे. त्याच बरोबर वीर्यवर्धक सुद्धा आहे.
वांग हे आयुर्वेदिकच्या दृष्टीने आजारावर जरी वापरत जात असलं तरी अनेक आजारांमध्ये वांग हे वर्ज आहे. शरीरावर परिणाम करणार आहे म्हणूनच याला संस्कृत मध्ये किंवा आयुर्वेदामध्ये वृत्ताळ असे नाव आहे. कारण अनेक आजारांमध्ये वृत्त पाळले जात याला वर्ज असं सांगितलेला आहे.
जे बीज असलेलं कवळ वांग आहे ते विषाप्रमाणे आपल्या शरीराला बाधत. आणि म्हणून हे वांग आयुर्वेदामध्ये इतर आजारांसाठी व्रज सांगितलेला आहे वृत्त सांगितलेलं आहे.
असं जरी काही असल तरी वांग्याचे गुणधर्म सांगितले आहेत. जसे की हातापायाला जास्त घाम येत असेल तर वांग्याचा रस हातापायाला चोळला जातो.
हाता पायाला जास्तीचा घाम येणार आहे तो बंद होतो असं जरी असलं तरी अनेक आजारांमध्ये वांग हे शरीरावर अनिष्ट परिणाम करणारा किंवा वाईट परिणाम करणारा ठरत. म्हणून हे आजार तुम्हाला असतील तर वांग खाणे हे टाळलेलेच बरे. किंवा अगदी कमी प्रमाणामध्ये हे वांग आपण वापरला पाहिजे.
यामध्ये सर्वात पहिलं कोणी खाणं टाळावं सर्वात प्रथम ज्याना औषध उपचार चालू आहे. मग कुठल्याही प्रकारचा औषध उपचार चालू असेल, आयुर्वेदिक औषध चालू असेल कोणतेही औषध चालू असेल सर्वांग हे पूर्णपणे खान बंद करायचा आहे.
कारण वांग हे वाईतूळ आहे, वृत्ताळ आहे आणि औषधाचा जो चांगला परिणाम होणारा आहे तो हे वांग होऊ देत नाही. म्हणून औषधांचा आपल्याला काही फरक जाणवत नाही. म्हणून वांग खाण बंद करायचं आहे. दुसऱ्या प्रकारची लोक आहेत ज्यांना दमा आहे, अस्थमा आहे किंवा श्वास घेण्यास त्रास होतो, धाप लागतो अशा लोकांनी वांग खाण हे टाळावं.
आणि हा आजार आणखी बरा न होण्याची किंवा आणखी वाढण्याची शकता असते. त्यानंतर ज्या लोकांना कफविकार आहे सतत कफ होतो, खोकला येतो किंवा आलर्जी सारखा त्रास आहे. म्हणजे ज्या लोकांना आलर्जी आहे अशा लोकांना सुद्धा वांग हे कमी प्रमाणामध्ये खाल पाहिजे.
कारण हे कफ कारक आहे, आलर्जी कारक आहे. त्याचबरोबर ज्यांना खूप पित्ताचा त्रास होतो, कमी पित्ताचा त्रास असेल तर वांग खाल्ले तर हरकत नाही. पण ज्यांना खूप पित्ताचा त्रास आहे. आम्लपित्त आहे त्यांनी वांग हे कमी प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे.
वांग्याने पित्त वाढत त्याचबरोबर हे उष्ण असल्यामुळं पोटामध्ये याने खूप उष्णता जाणवते, जळजळ होते. ज्या लोकांना शुगर आहे, मधुमेह आहे अशा लोकांना वांग खाण हे टाळलं पाहिजे. वांग हे मधुमेह वाढवणारे आहे, शुगर वाढवणारे आहे.
पांढर वांग आहे ते कमी प्रमाणामध्ये मधुमेहाचे जे लोक आहेत खाऊ शकतात. अगदी कमी प्रमाणामध्ये परंतु वांग खाण हे टाळलेल बर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकांना मुतखडा झालेला आहे. किडणीस्टोन आहे अशा लोकांनी वांग खाण हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे.
वांग, टोमॅटो आणि पालक या ज्या गोष्टी आहेत त्या मुतखड्यासाठी थोड्याश्या त्रासदायक ठरतात. पोट दुखीचा त्रास होईल, प्रचंड वेदना होतील अशा प्रकारचा त्रास आपल्याला होतो. वांग जरी चवीला चविष्ट असलं तरी आयुर्वेदामध्ये ते वृत्ताळ आहे.
म्हणून तुम्हाला वृत्ताळ आजार असतील, त्याचे औषध उपचार चालू असतील तर वांग पूर्णपणे खाणे टाळा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.