मित्रांनो ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीला महत्त्व आहे. प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. या स्वामी ग्रहाचा व्यक्तीवर प्रभाव असतो आणि त्यानुसारच व्यक्तीचा स्वभाव ठरतो. तुम्ही अनेकवेळा पाहिलं असेल की, काही महिला या खूपच रागीट असतात. त्यांचा रागावर नियंत्रण राहत नाही. कोणत्याही व्यक्तीची रास आणि नाव हे त्याच्या जन्मवेळ, तारीख, ठिकाण आणि वेळ यावर अवलंबून असते. काही ग्रहांचा स्वभाव उग्र असतो.आम्ही तुम्हाला अशा काही राशी सांगणार ज्या राशीच्या महिलांचा रागावर नियंत्रण राहत नाही.
राशीनुसार माणसाचा स्वभाव ठरतो आणि त्यानुसार तीन राशींच्या स्त्रिया अर्थात तीन राशींच्या महिला तीन राशींच्या मुली या अगदी कडकलक्ष्मी असतात असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर त्या स्वभावाने अतिशय तापट असतात आणि जर का त्यांच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर समोरच्याच काही खरं नाही हे समजून जायचं. त्यांच्यापुढे घरातल्या कुणाचाही काहीही चालत नाही .घरातल्यांना यांच्यापुढे माघार ही घ्यावीच लागते आणि या राशीमध्ये सगळ्यात पहिली रास आहे.
मेष राशी – मेष राशीच्या स्त्रियांना कडकलक्ष्मी म्हणण्याचं कारण म्हणजे या स्वभावाने तापट महत्वकांक्षी तर असतातच पण त्याचबरोबर कर्तबगार आणि लढवय्या वृत्तीच्या सुद्धा असतात.या राशीच्या स्त्री खूप रागीट असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांचा पारा चढतो. असे व्यक्ती कधी भडकतील हे कोणीच सांगू शकत नाही. या राशीच्या मुली रागावल्या तर त्यांच्यापासून दूर राहणे कधीही चांगले. अन्यथा त्यांचा राग आणखी भडकू शकतो.
राग शांत झाल्यावर ते स्वतःहून बोलतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्वतंत्र विचार करणाऱ्या असतात त्यांना स्वतःची अशी मत असतात आणि त्या त्यांच्या मतांवर ठाम सुद्धा असतात ठामपणे स्वतःची मत मांडतात. सुद्धा या राशीच्या स्त्रियांचा एक वैशिष्ट्य म्हणजे या अन्याय सहन करत नाही आणि कुणावर अन्याय होऊ सुद्धा देत नाहीत जर यांच्यासमोर काही चुकीचे घडत असेल तर त्या आवाज उठवल्याशिवाय राहत नाही.
सिंह राशी – सिंह राशीच्या स्त्रिया या स्वभावाने कठोर असतात कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या असतात बोलायलाही अति स्पष्ट असतात सिंह राशीच्या स्त्रिया या स्वाभिमानी परंतु निश्चय असतात यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो समोरच्यावर अधिकार गाजवण्याची यांना सवय असते पण यांच्यावर कुणी अधिकार गाजवलेल्या मात्र यांना अजिबात सहन होत नाही.यांचा हेतू शुद्ध असतो पण पद्धत वृक्ष असते आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीला या जरा शिष्ट वाटू शकतात
या राशीच्या स्त्रियांकडे लपवाछपवी हा प्रकार नसतो जे आहे ते तोंडावर आणि म्हणूनच समोरच्याला यांची थोडीशी धडकी भरते कारण स्पष्ट वक्तेपणाच्या नादात या काय बोलून जातील सांगता येत नाही. या राशीच्या स्त्रीयांना राग एखाद्या ज्वालामुखीपेक्षा काही कमी नसतो.
ते रागाच्या भरात काहीही चांगलं किंवा वाईट बोलून जातात. या राशीच्या मुली जेव्हा रागावतात तेव्हा त्यांच्याशी बोलून काही फायदा होत नाही. कारण तुम्ही त्यांना जितका शांत करण्याचा प्रयत्न कराल तितके ते भडकत जातील.
वृश्चिक राशी – वृश्चिक राशीच्या स्त्रियांचा व्यक्तीमत्व अतिशय गुंतागुंतीच असतं या बोलायला फटकळ असतात आणि स्वभावाने हट्टी असतात त्यांना जे हव आहे ते मिळवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद सगळी हत्यार वापरतात तापट ही असतात. पण काहीशा भांडनात कुदळ सुद्धा असतात. हे सुद्धा त्यांना मान्य करावा लागेल.
कष्टाळू असल्या तरी त्यांच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर मात्र हाहाकार करून सोडतात. घरातल्या सगळ्यांनाच आपल्या ताब्यात ठेवण्याचा यांचा प्रयत्न असतो पण यांना मात्र कुणाच्याही ताब्यात राहायचं नसतं हे स्वतंत्र वृत्तीच्या असतात पण समोरच्याला तेवढा स्वातंत्र्य देण्याची मात्र यांची तयारी नसते
इतकच काय पण समोरच्याच्या भावनांचा या फारसा विचारही करत नाहीत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृश्चिक राशीच्या स्त्रियांकडे चुकीला माफी नाही हे आधीच लक्षात घ्यायचं आणि म्हणून तर कडकलक्ष्मीच्या या यादीत यांचाही नंबर लागतो.
या राशीच्या स्त्रियांना सहजासहजी राग येत नाही. पण एकदा राग आला की ती कोणालाच सोडत नाही. रागाच्या भरात जुन्या गोष्टीही समोर आणतात. त्यांचा राग शांत करणे जवळजवळ अशक्य आहे. त्यांच्या रागापुढे तिचा नवराही हार मानतो.
अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.