मित्रांनो आपल्या बरेचजण हे स्वामींचे सेवेकरी, भक्त आहेतच. स्वामींचा आशीर्वाद, कृपादृष्टी प्रत्येक व्यक्तीला मिळतच असते. तर मित्रांनो आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो हे प्रत्येकांच्या घरात असतेच असे नाही. पण ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल त्या व्यक्तीने लगेचच तो फोटो किंवा मूर्ती आणा.
कारण जर आपल्या देवघरात स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असेल तर देवघर सुद्धा छान वाटते. आनंदमय वाटू लागते. आपला दिवसही खूप छान जातो. घर आपले आनंदमय व प्रसन्नदायक वाटू लागते. कारण स्वामींची कोणतीही तुम्ही जर सेवा केला तर नक्कीच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या सेवेचा तुम्हाला हा नक्कीच अनुभव मिळत राहील.
तर मित्रांनो तुम्ही स्वामींची जपमाळ किंवा स्वामींचे पुस्तक वाचत असाल तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळत राहील. स्वामींची सेवा किंवा नित्यसेवा हे तुम्ही जर मनाने, श्रद्धेने, विश्वासाने ही सेवा केला तर तुमच्या घरात किंवा तुमच्या प्रत्येक व्यक्तीला त्याचे फळ मिळत राहील. स्वामींची सेवा केल्याने आपले मन सदृढ बनते व चिडचिड होत नाही.मन प्रसन्न राहते.
घरात जर अडी अडचणी येत असतील तर ते दूर होऊन जातील त्रासदायक घटना सुद्धा होणार नाहीत .कारण स्वामीचीअशी सेवा आहे की, ज्याने कडून तुम्हाला त्याचे किंवा तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला नक्कीच कोणता तरी चमत्कार हा अनुभव मिळेलच. तर मित्रांनो, या स्वामींच्या कोणत्या तीन सेवा आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला चमत्कार व अनुभव मिळणार आहे तर हे आपण पाहू.
तर मित्रांनो असे काही लोक असतात की, ज्यांच्या घरात भरपूर अडचणी असतात. देवधर्म सुद्धा करत असतात. पण त्यांना कोणत्याच गोष्टीचे फळ मिळत नाहीत. लाभ सुद्धा मिळत नाही. तसेच, तुम्ही सेवा सुद्धा करत असतात. पण तरीपण तुम्हाला त्यात यश मिळत नाही व कोणतेही काम पूर्ण होत नाही. तर आपण सेवा करत असताना कोणती ना कोणती चूक ही आपल्याकडून होत असते तर, तुम्ही खरंच जर स्वामींची सेवेकरी खरच असाल तर तुम्ही ह्या तीन गोष्टीनक्कीच करून पहा की, ज्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच चमत्कार व स्वामींचा अनुभव सुद्धा येईल ते आपण पुढे पाहू.
तर मित्रांनो, स्वामींची पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर जपमाळ किंवा फक्त सेवा करत असाल तर तुम्ही मनाने व मनात श्रद्धा ठेवून विश्वासाने ही जर सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ अवश्य मिळत राहील. तुम्हाला कोण सांगितले किंवा जबरदस्तीने तुम्ही करू नका. तुमचा खरंच स्वामींवर विश्वास असेल तरच तुम्ही स्वामींची नित्य सेवा करा.
कारण ही सेवा केल्याने तुम्हाला व तुमच्या कुटुंब परिवाराला आनंदित व स्वामींची कृपादृष्टी ही सतत मिळत राहील व कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही. तसेच तुम्हाला जमेल तसे एक माळ किंवा अकरा माळ असा जप केला तरीसुद्धा चालतो. पण मनापासून स्वामींची ही जपमाळ तुम्ही करा.
तर मित्रांनो असे काही लोक असतात की, त्यांचा कुणावर सुद्धा विश्वास नसतो. पण तरीपण ते सेवा करत असतात. पण जर मनातच तुमच्या किंवा मनापासून जर तुम्ही कोणतीही सेवा करत नसाल तर, तुम्हाला त्याचे लाभ मिळणार नाही. तर तुम्ही स्वामी समर्थांची सेवा विश्वास हा असेल तर तुम्ही एवढे विश्वासाने तुम्ही जर स्वामींची सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच पंधरा दिवसात किंवा महिन्यात कधी ना कधी तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळत राहील .
विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. कारण जर विश्वास असेल तर मनात कोणतीही तुम्ही जर सेवा केली किंवा तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती तुमची इच्छा ती पूर्ण लगेचच पूर्ण होईल व घरसुद्धा आनंदमय व प्रसन्नदायक वाटू लागेल.
आपल्याकडे भरपूर पैसा, श्रीमंती मोठमोठे बंगला ,गाडी आपल्याकडे असते. पण आपल्याकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामीचा आशीर्वाद आपल्यावर नसतो. कारण आपल्याकडे भरपूर पैसा, बंगले असल्यामुळे आपल्या मनात अहंकार हा शब्द असतो. स्वामी आपल्यावर प्रसन्न नसतात. तर मित्रांनो, अशी चूक तुम्ही करू नका.
कारण आपल्याकडे कितीही पैसा, गाडी, बंगला ऐश्वर्यात लोळत असले तरी सुद्धा तुम्ही कोणत्याच गोष्टीचा घमंड करू नका. कारण घमंड जर केला तर तुम्ही कितीही मनापासून श्रद्धेने विश्वासाने स्वामींची सेवा केली तरी ती यशस्वी ठरणार आहे. जर तीच तुम्ही सेवा मनात कोणत्याच गोष्टीचा विचार न करता किंवा घमंड सुद्धा मनात असू नये. तरच स्वामींची सेवा तुम्हाला यशस्वी ठरेल.
मित्रांनो, तुम्ही जर मनात श्रद्धा ठेवून व विश्वास ठेवून जर सेवा केला तरी सुद्धा तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही. स्वामींचा अनुभव तुम्हाला मिळणार नाही. कारण तुमच्या मनात अहंकार याविषयी घमंड आहे.तर तुम्ही अहंकार मनातून काढून गरिबांना मदत करा, माणुसकी जपा मनापासून तुम्ही स्वामींची सेवा करा. नक्कीच तुमच्यावर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींचा आशीर्वाद मिळेल व स्वामींचा चमत्कार व अनुभव सुद्धा मिळेल.
तर मित्रांनो तुम्ही स्वामींची सेवा, विश्वास आणि कोणत्याही प्रकारचा अहंकार मनी न बाळगता तुम्ही स्वामींची सेवा करायची आहे म्हणजे स्वामींचा मंत्रजप ही पहिली गोष्ट दुसरी म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवून कोणतीही सेवा करणे आणि कोणत्याही प्रकारचा अहंकार न बाळगता स्वामींची सेवा करणे या तीन गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. त्यामुळे स्वामींच्या कृपा दृष्टी तुम्हाला प्राप्त होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.