या 2 प्रकारचे लोक कधीच सुखी राहु शकत नाही..

अध्यात्मिक

व्यक्ती आपल्या जीवनात सुखी आणि आनंदी होण्याची आपल्या सगळ्यांची धडपड करत असतो. किंबहुना आनंद आणि मन:शांती मिळवण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते.पण माणसाला कायमस्वरूपी आनंदी राहता येतं नाही. कारण सुख आणि दुःख या जीवनातील खुप महत्वाच्या गोष्टी मानल्या जातात. पण यातूनच मार्ग काढून आपल्याला आपल्या जीवनातला प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे.
काही व्यक्ती आपल्या जीवनात सतत चिडचिड करत असतात,तसेच नेहमी दुसर्याचे वाईट चिंतत असतात. या व्यक्ती कसलाही विचार न करता इतरांना काहीही बोलतात. त्यांच्या या गोष्टीमुळे स्वतःचे बरोबरच इतरांचेही नुकसान करतात असतात. तसेच मनुष्याने आपल्या जीवनात कधीच लोभ करू नये.

काही व्यक्ती लोभी स्वभावाचं असतात. त्यांच्या स्वार्थापुढे आणि स्वतःचा फायदा करण्यासाठी ते प्रसंगी इतरांचे नुकसान करत असतात. याशिवाय आपल्या मनात कधीच सुडाची भावना ठेऊ नये. आपण सतत मनात एखाद्या गोष्टीचा प्रतिशोध घेणे, असा विचार किंवा भावना भरलेली असते. त्यामुळे आपल्याला कधीच समाधान मिळणार नाही.

माणसाने कधीच कोणाशी ईर्ष्या करू नये, असे आचार्य चाणक्यनी सांगितले आहे. आपण इतरांच्या विषयी मनात द्वेष, मत्सर करून स्वतःला मिळणाऱ्या सुखाकडे लक्ष देत नाही.।परंतु या अशा सवयीमुळे मनुष्य स्वतः स्वतःचे नुकसान करून घेत असतो. आपल्या लालची वृत्तीमुळे आपल्याकडे भलेही पैसे सोने-चांदी मालमत्ता भरपूर जमा होईल परंतु आपण कधीच आनंदी जीवन जगू शकणार नाही.

त्यामुळे आयुष्यात काही गोष्टी घडल्या तर सोडून दिल्या पाहिजे, नाहीतर आपल्यावर अधिक ताण-तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आती-विचार करणे, आपल्याला टाळले पाहिजे. जीवणात जे आपल्या नशिबात असते ते, आपल्याला मिळतच आहे. मग त्यांच्या नशीबातील असलेले सुख-सोई पाहून आपल्याला ईर्ष्या करण्याची काय आवश्यकता आहे.

त्यात आपल्याला फक्त दुःखच मिळते म्हणून मनातील क्रोध, लोभी, सूडाची भावना मिळते. म्हणून आपल्याला दुःख किंवा आनंद व समाधान जीवन यातील काय हवे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे.याशिवाय जीवनात कधीच तुलना करू नये. कारण साहजिक तुलनेतून स्पर्धा किंवा ईर्ष्या निर्माण होते. स्पर्धा असावी पण ती योग्य आणि खिलाडू वृत्तीची असायला हवी.

बरेचदा ईर्षा ही वाईट काम करण्यास अथवा काहीतरी चुकीचं घडवण्यासाठी जबाबदार ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे जे मिळत ते नशिबाने आणि कष्टाने आपल्याला किंवा इतरांना मिळत असते. तसेच आपल्याकडे जे काही आहे, त्याबद्दल देवाचे सतत आभार मानावे.
तसेच प्रामाणिकपणे कष्ट करत राहावे. देव कश्याची कमी पडू देणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *