या १० सकाळच्या सवयी स्वतःला लावून घ्या आयुष्यात यशस्वी व्हाल

आरोग्य माहिती

सकाळच्या काही चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घेतल्या तर दिवसभराची सर्व कामे व्यवस्थित पार पडतात. दिवसभर प्रसन्नता राहते. तसेच वेळेच्या वेळी काम पूर्ण झाल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. म्हणूनच स्वतःला चांगल्या सवय असणे हे खूप गरजेचे आहे. आपण सकाळी जी कामे करतो त्याचाच परिणाम पूर्ण दिवसावर होत असतो.

त्यामुळे सकाळी आळस न करता काही चांगल्या गोष्टी केल्या तर दिवस आपला नक्कीच चांगला जातो. तर अशा काही सकाळच्या चांगल्या दहा सवयी आज आपण जाणून घेणार आहोत.

पहिली सवय म्हणजे देवाचे स्मरण. निद्रेतून जागे झाल्यानंतर शांतपणे पाच मिनिटे आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करावे. चांगले विचार व इच्छा आठवाव्यात. जेणेकरून दिवसाची सुरुवात मंगलमय होऊन दिवस शुभ व चांगला जाईल. दुसरी चांगली सवय म्हणजे योगासने, प्राणायाम व व्यायाम. सकाळी उठल्याबरोबर स्मार्टफोन न हाताळता मोकळ्या हवेत फिरायला जावे. योगासने, प्राणायाम, व्यायाम करावा. त्यामुळे शरीर व मन बलवान बनते. दिवसभर ताजे दवाने व उत्साही वाटते.

तिसरी चांगली सवय म्हणजे सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिणे. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी लिंबू टाकून प्यावे. त्यामुळे रात्रभर पचनसंस्थेत तयार झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. सोबतच लिंबातील विटामिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, चयापचय व पचनक्रिया सुधारते.

चौथी चांगली सवय म्हणजे उठल्यावर देवाचे आभार माना. सकाळी उठल्यानंतर देवाचे आभार माना की त्याने अजून एक दिवस तुम्हाला दिला आहे. अनेक लोकांसाठी कालचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस होता. देवाने तुम्हाला जे जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.

पाचवी सवय म्हणजे विनाकारण ताण घेऊ नका. सकाळची नित्य कर्म जसे की आंघोळ, घराची साफसफाई, स्वयंपाक आणि इतर कामे आळस न करता मन लावून करा. त्यामुळे तुमच्या मनावर विनाकारण ताण येणार नाही.सहावी सवय म्हणजे सकस नाष्टा. सकाळचा नाश्ता पोष्टिक असावा. कडधान्याच्या उसळी, आंबवलेले इडली डोसा सारखे पदार्थ, दूध, फळे, पनीर असे प्रोटीन युक्त पदार्थ नाश्त्यात असावेत. बेकरीचे पदार्थ शक्यतो टाळावे.

सातवी चांगली सवय म्हणजेच कामाची यादी अर्थात to do list. दिवसभरातील कामांची प्राधान्य क्रमानुसार यादी बनवा. त्यामुळे कामांचे योग्य नियोजन होईल आणि गोंधळ न होता सर्व कामे पार पडतील. कामाचा ताण येणार नाही. आठवी चांगली सवय म्हणजे प्रेरणादायी विचार ऐकणे. सकाळ सकाळ प्रेरणादायी म्हणजेच मोटिवेशनल विचार ऐका किंवा वाचा म्हणजे दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होईल. त्यामुळे दिवसभर सकारात्मकता राहील.

नववी सवय म्हणजे ध्येय आठवा. सकाळच्या प्रसन्न वातावरणात काही मिनिटे आपली ध्येय आठवा आणि आज ही ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण काय करणार आहोत ते ठरवा.दहावी म्हणजे २१ दिवस महत्त्वाचे. कोणतीही सवय २१ दिवसात लागते असं म्हणतात. म्हणूनच सकाळच्या या दहा सवयींचे सलग २१ दिवस पालन करा. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्की होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *