आपण अनेक प्रकारची पूजा प्रार्थना पारायण व्रत करत असतो. पण त्याचे आपल्याला परिणाम मिळत नाहीत.म्हणजेच की आपण ते मनापासून करत असतो. पण त्याचे आपल्याला काहीच फळ मिळत नाही. म्हणजे आपण पारायण घरी करतो किंवा मंदिरामध्ये जाऊन देखील करत असतो.
पारायण करून देखील जर आपल्याला आपले काम होत नसेल तर आपण कुठेतरी चुकत आहोत. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे.आपण अनेक उपवास देखील करत असतो. अनेक प्रकारची उपवास आपण निरंकर देखील करत असतो. आपण काही न खाताआपण करत असतो.
पण ते उपवास आपण केल्यानंतर आपल्या मनामध्ये आपण कोणतीतरी लालच ठेवून ते करत असतो. असं न करता आपण फक्त मनामध्ये श्रद्धा ठेऊन उपवास केला तर ते आपला उपवास मान्य होणार आहे. तर मित्रांनो मी आज तुम्हाला या तीन गोष्टी सांगणार आहे या तीन गोष्टी जर तुम्ही पाळला तर तुम्हाला तुमचे काम व तुमचे जे काही आहे ते तुम्हाला मिळणार आहे.
त्याच्यामध्ये तुम्हाला सफल देखील होणार आहात. तर मित्रांनो आता जाणून घेऊया नेमक्या त्या तीन गोष्टी आहेत कोणत्या. तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे भक्ती भाव आपण कोणताही उपवास किंवा आपण कोणतेही काम करत असताना मनामध्ये भक्ती ठेवून ते काम करायचे भक्ती शिवाय केलेल्या व्रताचार एक यांत्रिक कर्म ठरतं.
आणि त्याचं फळ आपल्याला मिळत नाही तुम्हाला तुम्हाला जर कितीही वाटलं तर तुम्ही ते भक्ती भावाने करत आहात पण त्याच्या अगोदर आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे की आपण कोणतेही लालच मनामध्ये न ठेवता आपण भक्तीने पूजा प्रार्थना व उपवास करत आहोत.
आपल्याला कोणीतरी सांगितले म्हणून आपण ते व्रत किंवा पारायण करायचे नाहीत आपल्या मनाला जर वाटत असेल तर आपण ते मनापासून करायचे आहे. ज्या देवतेचे व्रत करतायेच्या देवतेची पूजा करताय किंवा ज्या देवतेचे पारायण करताय त्या देवतेबद्दल तुम्हाला आस्था आहे का प्रेम आहे का भक्ती त्या देवते विषयी तुम्हाला आहे का हे तुम्ही एकदा विचार करायचा आहे किंवा तुम्हाला ते जाणून घ्यायचा आहे.
आणि जर भक्ती भाव नसेल तर तो निर्माण करता येतो त्याच्यासाठी आपण त्या देवतेच्या चरित्र गुणांचं वर्णन ऐकायच आहे. त्या देवते विषयीची प्रवचनी ऐकायची आहेत. त्या देवतेची महती जाणून घ्यावी आणि मग आपल्या मनात आपोआपच भक्ती भाव निर्माण होतो म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कुठलेही व्रत पूजा पारायण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे भरती भाव तो असेल तर आपण पुढे जाऊ शकतो.
व्रतामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे संकल्प कोणत्याही व्रतवैकल्य पारायण आपल्या मनामध्ये संकल्प करायचा आहे संकल्प शिवाय व्रत पारायण पूजा पूर्ण होत त्याशिवाय आपण साधारण पूजा ही करु शकत नाही. कोणतीही पूजा किंवा पारायण असेल तर त्याआधी हातात पाणी घेऊन आपले नाव आपल्या पित्याचे नाव व गोत्र वगैरे घेऊन आपण ही पूजा करत असतो.
आपण ही पूजा नेमकी कशासाठी करत आहोत ते आपण म्हणायचं आहे किंवा बोलायचं आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला त्याचे फळ देखील मिळणार आहे. पण पूजा नेमकी कशासाठी करतआहोत. ते बोलावं आणि त्यानुसारच अपल्याला त्याचे फळ आपल्याला मिळणार आहे. तसाच संकल्प हे आपल्या इच्छा शक्तीला बळ देतात.
म्हणूनच प्रत्येक कार्यात संकल्प घेणे आवश्यक आहे आता त्यातही संकल्प दोन प्रकारचे असतात एक आहे नित्यसेवा संकल्प ज्यामध्ये आपण नित्यसेवेचा संकल्प घेऊन निस्वार्थ भावाने सेवा करून आपण समाधान प्राप्त करत असतोदुसरा जो संकल्प आहे तो म्हणजे विशेष संकल्प . ते आपण आपल्या समस्या सांगणार आहोत आपण साकने घालत असतो .
त्यांच्याजवळ प्रार्थना करत असतो की या संकटातून मला बाहेर काढ.दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आपण आपल्याला कशा प्रकारची पूजा सेवा करायची आहे त्यानुसार संकल्प करावा . आणि तिसरी गोष्ट म्हणजे काल महात्म्य गणपतीच्या शुद्ध आणि वैद्य चतुर्थी म्हणजे विनायकी आणि संकष्टी चतुर्थी या मंगळवारी आल्यास त्यांना अंगारकी म्हणतात.
एका अंगारकीने जसे आपल्याला फळ मिळते. वर्षभराच्या विनायकी किंवा संकष्टीने मिळते. असेच निर्जला एकादशीचा सुद्धा आहे . निर्जला एकादशीचे फळ हे 24 एकादशी चे फळा एवढेच असते. बहुतेक व्रत हे शुद्ध सप्तमी किंवा अष्टमी पर्यंत असतात कारण तेव्हापासून चंद्र जास्त वाढत जाताना दिसतो.
आपले व्रत सफल झाल्याचे आपल्याला समजते त्यामुळेच आपण काय महत्त्वाचा ठरतो आपण कोणत्या काळामध्ये व्रत करतो किंवा त्याचा मुहूर्त काय आहे त्याचं नक्षत्र काय आहे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणूनच आपल्या कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं कोणता व्रत आपल्याला कधी करायचे आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये दिलेला असतं.
त्याच दिवशी ते व्रत करणे खूप आवश्यक आहे . व आपल्या मनामध्ये आले तेव्हा आपण व्रत केले असे नाही ज्या कॅलेंडर प्रमाणे आहे त्या पद्धतीनेच आपण आपले व्रत करायचे आहेत तर मित्रांनो मी जे वरती तुम्हाला सांगितले आहे या गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर तुमचं व्रत पारायण सफल होणार आहे व त्याचे तुम्हाला फायदे देखील मिळणार आहेत व फळ देखील मिळणार आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.