मित्रांनो वृषभ ही राशिचक्रातील दुसरी रास असून चंद्र हा ह्या राशीचा स्वामी ग्रह आहे. या राशीचे बोधचिन्ह म्हणजे बैल. अत्यंत बलवान प्राणी शेतकऱ्याचा मित्र म्हणून या बैलाची ओळख आहे. अंगामध्ये प्रचंड ताकद आणि कामाची रंग असलेला हा प्राणी. आणि दिवसभर राब राब राबणारा आणि संध्याकाळी निवांत गोठ्यामध्ये रवंथ करत बसलेला. या बैलाच्या गुणधर्माप्रमाणे वागणारे असतात वृषभ राशीचे लोक. आयुष्यात भरभराट करून घेण्यासाठी वाट्टेल ते करण्याची यांची तयारी असते. परंतु डोक्यावर आणि खांद्यावर जबाबदाऱ्यांच ओझ आल्यानंतर यांची खऱ्या अर्थाने प्रगती व्हायला लागते.
त्याचबरोबर मित्रांनो बर्याचदा विश्रांती घेण्यामध्ये सुख मानणारी ही रास आहे. चला मग जाणून घेऊया नोव्हेंबर महिना वृषभ राशीसाठी कसा जाणार आहे. हा महिना तुमच्या कुटुंबासाठी आनंदाचा आणि शांतीचा असेल. सर्व सदस्यांनी मधील परस्पर सहकार्य वाढेल.
यादरम्यान घरामध्ये पूजेचा कार्यक्रम देखील केला जातो. ज्यामुळे सर्वांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. कौटुंबिक वातावरण धार्मिक राहण्याची शक्यता आहे. तुमचा कल आध्यात्माकडे वाढेल. कुटुंबात जमीन किंवा आणखी कोणता वाद चालू असेल तर तो मिटेल. घरातील सदस्यांचा परस्पर विश्वास निश्चित होईल. सर्वांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम देखील तुम्ही बनवाल.
धार्मिक क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. या काळात अध्यात्माची आवड सुद्धा तुमच्या मनात निर्माण होईल. कलाकार आणि साहित्यकार लोकांसाठी हा काळ फलदायी आहे. पत्रकारांसाठी तर आनंदाचे दिवस आहेत. उद्योग व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे आणि मित्रांनो नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर पती-पत्नीमध्ये आधी चालू असणारे वाद सुद्धा आता मिळणार आहेत. आणि मनोमिलन घडून येणार आहे.
मित्रांनो व्यवसायात तुम्हाला जे काही नुकसान होत आहे ते या महिन्यात भरून निघेल. या महिन्यात तुमच्यासाठी नवीन संधी येतील ज्यातून तुम्हाला नफा मिळू शकतो. काही गोष्टी बाजूला ठेवल्या तर लांबच लांब आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना तर हा महिना म्हणजे सुवर्णसंधी घेऊन आला आहे.
तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमची नोकरी बदलू सुद्धा शकता. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला मात्र नक्कीच घ्या. विवाहित लोक या महिन्यात आपल्या जोडीदाराला मोकळा वेळ देतील. ज्यामुळे दोघांमधील परस्पर संबंध घट्ट होतील.
तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आणि काही गोष्टींबाबत दोघांमध्येही मतभेद असतील. पण ते लवकरच दूर होतील. जर तुमचे कोणाशी प्रेम संबंध असतील आणि कोणाला याची माहिती नसेल तर या महिन्यात कोणीतरी याबद्दल जाणून घेण्याची शक्यता आहे आणि ते तुमच्या प्रेम संबंधांमध्ये दुरावा निर्माण करू शकतात. यावर थोडी सावधगिरी बाळगा.
काही चुकीचं करणं मात्र टाळा. जर तुमचं वय चाळीस वर्षाहून कमी असेल तर या महिन्यात तुमचे आरोग्य चांगले राहील. परंतु काही मानसिक तणावाची शक्यता आहे. काही चिंता तुम्हाला घेरतील.
हा काळ तुमच्यासाठी सर्व दृष्टीने लाभदायक आणि फलदायी ठरण्याची संकेत आहे. त्यामुळे या काळात मन लावून मेहनत करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वाईट कामांपासून किंवा चुकीच्या कामापासून दूर राहणे आवश्यक आहे. या काळात व्यसनांपासून दूर राहण्यात आवश्यक आहे.
हा काळ तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतो. पण आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा मोठ्या लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नोकरीमध्ये अधिकारीवर्ग तुमच्या कामावर प्रसन्न असतील. राजकीय दृष्ट्या काही घडामोडी तुमच्या जीवनात घडून येतील. राजकीय क्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक घडून येणार आहे.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.