मित्रांनो, आपण बरेच जण हे अनेक देवी देवतांचे व्रत, उपवास करीत असतात. आपल्या जीवनातील अडचणी या दूर होऊन आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदावी यासाठी विधिवत पूजा करीत असतो. प्रत्येकजण हे कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त असतात. ते अगदी मनोभावे व श्रद्धेने त्यांची पूजा करीत असतात.
आपल्यापैकी बरेच जण हे गणेशाचे भक्त आहेत. गणेशाची विधिवत पूजा करतात. तसेच मंदिरात जाऊन गणेशांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अनेक उपाय देखील करीत असतात. तर मित्रांनो तुम्हाला जर विघ्नहर्ता गणपती बाप्पांचा जर कृपाशीर्वाद हवा असेल तर मी तुम्हाला असे काही उपाय आज सांगणार आहे.
हे उपाय जर तुम्ही केले तर त्यांचा कृपाशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी राहील.बुधवार हा बुद्धीची देवता म्हणजेच गणपती बाप्पाला समर्पित वार आहे. याशिवाय हा वार मुळात बुधाचा आहे. बुध हा बुद्धिमत्ता, एकाग्रता, वाणी, त्वचा, सौंदर्य आणि सुगंध यांचाही कारक आहे.
गणपती बाप्पाला विघ्नहर्ता या नावानेही संबोधले जाते. मग तुमच्यावर काही विघ्नं आली असतील आणि तुम्हाला त्यापासून मुक्ती हवी असेल तर गणपती बाप्पांना या उपायांनी प्रसन्न केल्यास अनेक समस्या दुर होतील. बुधवार हा गणपतीचा दिवस मानला जातो. गणेश हा बुद्धी देणारा आहे असे म्हटले जाते. बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात.
जर तुम्ही प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण केल्या तर तुमच्या जीवनात कधीही अडचणी येणार नाहीत आणि विघ्नहर्त्यांचा आशीर्वाद कायम राहील. तसेच गणपती बाप्पाला उकडीचे मोदकही अर्पण करावे. कारण मोदक अतिशय प्रिय आहेत. जर एखाद्या व्यक्तीला बुध दोष असेल तर त्याने माता दुर्गेची पूजा करावी.
‘ओम ऐं हरी क्लीं चामुंडयै विचारे’ या मंत्राचा दररोज जप करावा. धार्मिक मान्यतेनुसार बुधवारी हिरव्या रंगाच्या वस्तू वापरणे शुभ असते. जर तुमचा बुध अशक्त असेल तर नेहमी हिरवा रुमाल सोबत ठेवा. तसेच बुधवारी गरजूंना हिरवी मूग डाळ दान करा. जर तुम्हाला बुध दोष दूर करायचा असेल तर सोन्याचे दागिने घालणे फायदेशीर मानले जाते.
बुध दोष दूर करण्यासाठी हाताच्या सर्वात लहान बोटात म्हणजे करंगळीमध्ये पन्ना धारण करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. मात्र यासाठी पंडित किंवा ज्योतिषाचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी गाईला गवत खाऊ घालावे. असे म्हटले जाते की, वर्षातून एकदा तरी बुधवारी आपल्या वजनाएवढे गवत खरेदी करून गोठ्यात दान करावे.
तर मित्रांनो तुम्हाला देखील तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी असतील तसेच जर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी हवी असेल, गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा असे जर वाटत असेल तर वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे उपाय अवश्य करून पहा. यामुळे गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला लाभेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.