विड्याचे पान शुभ कार्यात महत्वाचे का मानले जाते?

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आपल्या आसपासचे अनेक लोक हे जेवण झाल्यानंतर पान खात असतात. तसेच घरात कोणतेही जर शुभकार्य असेल तर पहिला उल्लेख हा विड्याच्या पानांचा केला जातो. म्हणजेच आपण अनेक सण उत्सवामध्ये विड्याच्या पानाचा वापर हा करत असतोच. मग घरात पूजा असो, लग्न असो, साखरपुडा असो, कोणतेही शुभ कार्य असेल तर जे भडजी असतात ते भडजी आपल्याला प्रश्न विचारतात की विड्याची पाने कुठे आहेत ?

तर अशा या विड्याच्या पानाला महाराष्ट्रातील लोकांमध्येच नव्हे तर इतर धर्मातील लोकांमध्ये देखील खूपच महत्त्व पाहायला मिळते. बंगाली लोकांमध्ये लग्नाला नवरीच्या तोंडासमोर विड्याचे घेऊन मंडपात आणले जाते तर तेलुगु, बिहारी, पंजाबी या सर्व धर्मां मध्ये विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभकार्याला सुरुवात करतात.

तर असे हे विड्याचे पान आपण प्रत्येक शुभकार्यात का वापरतो या मागचे कोणालाच कारण माहिती नाही. तर विड्याचे पान याचे शुभ कार्यात एवढे महत्त्व का आहे याविषयीची सविस्तर माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर या मागची एक पौराणिक कथा आज मी तुम्हाला सांगते यावरून तुम्हाला लक्षात येईल की शुभ कार्यामध्ये विड्याच्या पानांना एवढे महत्त्व का दिले जाते.

समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले. त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली.

हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला. त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले.भोजन झाल्यावर देव देवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. हे होते विड्याच्या पानाचा धार्मिक कथा.

आता पाहुयात  ड्याच्या पानाचे महत्व काय आहे आणि का आहे ते. तर विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा वास असतो तसेच विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो. विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो तसेच पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो.

या विड्याच्या पानाच्या लहान देठांमध्ये महाविष्णूचा वास असतो. तर या विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो.विडयाच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो. यामुळेच विड्याचे पाने हे खूपच महत्त्वाचे मानले गेलेले आहे.

तुम्ही जे आपल्या आसपास जे लोक विड्याचे पान खातात त्यावेळेस तुम्ही पाहिली असेल की त्या पानाचा मागचा भाग म्हणजेच पानाचे देठ काढले जातात. पण हा देठ का काढला जातो याचे कारण सहसा आपणास माहीत नसते. तर विड्याच्या पानाखाली मृत्यू देवतेचा वास असतो आणि यामुळेच विडा सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे.

विड्याच्या पानाच्या देठांमध्ये अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहते त्यामुळेच पान सेवन करताना देठ काढून टाकायचे असते. तर मित्रांनो वरील सर्व माहिती तुम्ही लक्षात घेऊन विड्याचे पान हे आपण शुभकार्यात का वापरतो यामागचे कारण लक्षात आले असेलच. त्यामुळे विड्याच्या पानांना खूपच महत्त्व प्राप्त झालेले आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *