वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाक घरात ‘या’ गाेष्टीचे वास्तव्य निर्माण करताे वास्तूदाेष!

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो, आपणाला प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण तसेच आपल्या घरामधील वातावरण हे सुखा समाधानाचे असावे असे वाटतच असते. मग आपण वास्तुशास्त्रानुसार अनेक गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे करीत असतो. तसेच एखादे नवीन घर बांधताना किंवा खरेदी करताना आपण वास्तुशास्त्राचा विचार करून बांधत असतो.

परंतु मित्रांनो वास्तुशास्त्रांमध्ये आपणाला अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता आणू शकतात व या गोष्टी आपण करणे टाळायचे आहे. आज मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार आपल्या स्वयंपाक घरामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी नसाव्यात जेणेकरून आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होईल याविषयीची माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो स्वयंपाक घराला आपल्या घरातील महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. आपल्या स्वयंपाक घरामध्ये अन्नपूर्णा वास करीत असते. त्यामुळे आपले स्वयंपाकघर हे कायमच स्वच्छ असावे आणि स्वयंपाक घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद नसावा. तसेच शांततेचे वातावरण देखील असावे. यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही.

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घर बरोबर असणे अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण कळत नकळत वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करीत असतो. तसेच धावपळीच्या या व्यस्त जीवनशैलीत आपण स्वयंपाक घराकडे विशेष असे लक्ष देत नाही व त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. परंतु हे आपल्या लक्षात येत नाही.

चला तर मग जाणून घेऊया किचनमध्ये कोणत्या वस्तू ठेवण्यास मनाई आहे : मित्रांनो वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाकघरात स्वच्छतेच्या वस्तू ठेवणे शुभ मानले जात नाही. म्हणूनच झाडूसह स्वच्छतेच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दूर ठेवाव्यात. परंतु स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वयंपाक घरातील स्वच्छता केल्यानंतर ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू आपणाला स्वयंपाक घरामध्ये ठेवायच्या नाहीत म्हणजेच झाडू हा आपल्याला स्वयंपाक घरामध्ये अजिबात ठेवायचा नाही.

कारण स्वयंपाकघरात झाडू ठेवल्याने घरात धनधान्याची कमतरता भासते. याचा वाईट परिणाम घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही होतो. यामुळे मित्रांनो झाडू स्वयंपाकघरापासून दूर ठेवावा.

आपल्यापैकी बरेच जण हे आपल्या स्वयंपाक घरामध्ये औषधांच्या बाटल्या ठेवीत असतात. परंतु मित्रांनो तुम्ही जर तुमच्या घरामध्ये स्वयंपाक खोलीत जर औषधांच्या बाटल्या किंवा औषधे ठेवल्यास घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते.

किचनमध्ये औषधे ठेवल्याने घरामधील सदस्य सतत आजारी पडू शकतात. यामुळे घरामध्ये चिडचिड होऊ शकते आणि आपल्या पैसा हा दवाखान्यात भरपूर प्रमाणात खर्च होऊ लागतो. त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये औषधे अजिबात ठेवायची नाहीत.

तसेच मित्रांनो आपल्या पैकी बऱ्याच जणांना स्वयंपाकघरात आरसा लावण्याची सवय असते. परंतु घरामध्ये स्वयंपाकघरात कधीही आरसा नसावा. त्यामुळे जीवनातील अडचणी वाढतात. असे म्हणतात की, स्वयंपाकघरातील आरशामुळे अग्नीचे प्रतिबिंब तयार होते. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा प्रसारित होते जी अत्यंत हानिकारक आहे.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे या गोष्टी तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरामध्ये अजिबात ठेवायचा नाहीत. जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *