वास्तु दोषामुळे घरात सतत भांडण, वाद होत असेल तर ‘हा’ उपाय करा ; घरात सुख, शांती, समाधान येईल!

वास्तूशास्त्र अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येकाच्या घरात काही ना काही वाद चालू असतोच. ज्या घरात काही अडचणी असतात. भाडणे होत असतील त्या घरात कधीच सुख, शांती, समाधान कधीच नांदत नाही.ते घर कधीच पैशाने भरलेले नसते. त्या घरामध्ये कधीच कुणाचे पटत नाही. सारखे वादविवाद, भांडणे, चिडचिड होत असते. सासु सुना मध्ये, भाऊ बहिणी, नवरा बायको यामध्ये सारखे सारखे भांडणे होत असतात.

घरातील कोणाचेही पटत नसते. जसे की, नवऱ्याचे बायकोला पटत नाही तर काही वेळा बायकोचे नवऱ्याला पटत नाही. घर हे कधीच सुखी नसते. त्या घरामध्ये कायमच चिडचिड होत असते. त्या घरामध्ये कधीच आनंदाचे वातावरण दिसत नाही. कायम त्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद विवाद हे होत असतात.

तसेच कोणतीच व्यक्ती कोणत्याच व्यक्तीसोबत चांगल्या प्रकारे बोलत नाहीत. घरातील कोणत्याच व्यक्तीला कामांमध्ये यश प्राप्त होत नाही. कायम अडीअडचणी येत असतात. कोणतेही काम जर पूर्ण करायला गेले तर ते काम अपूर्णच राहत असते. घरावर तसेच घरातील इतर व्यक्तींवर भरपूर संकट येण्यास चालू होत राहते.

मित्रांनो सारखे सारखे घरामध्ये भांडणे चांगले नाही. त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष होण्याची शक्यता असते. कारण ज्या घरात वास्तुदोष असेल त्या घरांमध्ये नक्कीच हे सर्व काही प्रॉब्लेम होत असतात. त्या घरातली व्यक्ती कधी सुखाने राहत नाही किंवा सुखाने जगू शकत नाही. कारण ज्या घरात वाद होत असतील त्या घरात कधीच पैसा सुद्धा टिकत नाही. लक्ष्मी माता सुद्धा राहत नाही. ते घर कधीच प्रसन्न सुद्धा वाटत नाही.

तर मित्रांनो जर तुमच्या घरात ईशान्य कोपऱ्यात काही नको त्या वस्तू जर तुम्ही ठेवल्या असतील तर त्या लगेचच बाहेर काढाव्यात. नाहीतर भंगारला त्या वस्तू द्यायचे आहेत. कारण ज्या ईशान्य कोपऱ्यात तुम्ही नको असलेल्या वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या घरातील सुख, शांती निघून जाते. सकारात्मक विचार येत नाही. कोणत्याच कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नाही. प्रत्येक कामांमध्ये अपयश येत असते.

त्याचप्रमाणे काहींच्या घरात ईशान्य कोपरा जर नसेल तर त्या घरांमध्ये सुख शांती लाभत नाही. कारण जर कमी जागा असेल व त्या जागेत कसेही घर बांधले, त्या घराला जर शेपच नसेल, ईशान्य कोपरासुद्धा नसेल तर घरांमध्ये वादविवाद होतच राहतील. तसेच मित्र आणि मुलांच्यामध्ये कायम भांडणे होण्याची शक्यता असते. एकाने जर माघार घेतली तर दुसरा माघार घेत नाही. उलटे भांडण जास्तच वाढत जाते.

तसेच ईशान्य कोपऱ्यात जर गर्मी वापराचे वस्तू ठेवली असेल तर ते ठेवणे चुकीची आहे. जसे की गॅस, ओव्हन, गिझर अशा प्रकारच्या वस्तू ईशान्य कोपऱ्यात ठेवायच्या नाहीत. तसेच ईशान्य कोपऱ्यात गार थंड वस्तू सुद्धा ठेवू नये. म्हणजेच फ्रीज, कुलर, फॅन या काही वस्तू ईशान्य कोपऱ्यात ठेवणे चुकीचे आहे.

ही उपकरणे ईशान्य कोपऱ्यात असले तर घरातले जे पुत्र आहेत म्हणजेच पुत्र हा आज्ञाधारी नसतो. तसेच पित्र व पुत्र मध्ये खटके उडण्यास चालू होते. एकमेकांवर कधीच विश्वास नसतो.

तसेच तुम्ही ज्या जागी प्लॉट घेतला आहे किंवा त्या प्लॉटवर तुमचे घर बांधले गेले आहे त्या जागी सूर्य बिधिन असावा. सूर्य बिधीन म्हणजेच जी इमारत किंवा घर बांधलेले असते पूर्व पश्चिम जास्त अंतर व दक्षिण उत्तर ही कमी असलेली इमारत असते ते म्हणजे सूर्यबिधिण आहे. असा सुद्धा प्लॉट असेल किंवा घर असेल तर त्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, अशांतता निर्माण होत असते. कधीच एकमेकांचे पटत नाही.उनेदूने बोलले जात असते.

जर तुम्ही ईशान्य कोपऱ्यात कचरा टाकण्यासाठी जागा केली असेल म्हणजेच त्या ईशान्य कोपऱ्यात जर कचराकुंडी ठेवला असेल तर ते तात्काळ बंद करण्यात यावी. ईशान्य कोपरा हा संपूर्णपणे स्वच्छ असावा. त्या ईशान्य कोपऱ्यात कोणतीच घाण नसावी. म्हणजेच कचराकुंडी ठेवल्याने घरामध्ये स्त्रियांमध्ये एकमेकांबद्दल तुजाभाव निर्माण होत असतात. एकमेकांबद्दल ईर्षा चालू होण्याची शक्यता असते. तसेच एकमेकांबद्दल, दोन व्यक्तींमध्ये प्रेम हे निर्माण होत नाही. एकमेकांचा तिरस्कार करत असतात.

तर मित्रांनो, जर तुमच्या घरात सुख शांती हवी असेल तर नक्की तुम्ही हे सांगितलेले उपाय करा म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात कोणतीच नको असलेली वस्तू ठेवायची नाही. तसेच कचराकुंडी म्हणजेच ईशान्य कोपरा हा कचरा करण्याची जागा असेल तर ते अयोग्य आहे.

हे सर्व तुम्ही उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला किंवा तुमच्या घरात सुख, शांती, समाधान मिळत राहील. प्रत्येक कामामध्ये यश सुद्धा येईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *