वारंवार लागत असेल दृष्ट तर अवश्य करा हे उपाय!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, प्रत्येक जण हा मेहनत घेतच असतो कारण आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आपणाला पैसा आवश्यक असतो. परंतु बऱ्याच वेळा आपण खूप सारी मेहनत करून देखील आपणाला चांगले परिणाम मिळत नाहीत. तसेच आपल्या घरातील जी लहान मुले आहेत त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात.

घरामध्ये शांतता राहत नाही. तसेच घरातील व्यक्ती सतत आजारी पडणे हे सर्व दृष्ट लागल्याने देखील होऊ शकते. वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी, तसेच वाईट लोकांपासून दृष्ट दूर करण्यासाठी अनेक मार्गाने आपण प्रयत्न करीत असतो. परंतु आज मी तुम्हाला दृष्ट जर वारंवार लागत असेल तर यावर नेमके कोणते उपाय करायचे जेणेकरून दृष्ट लागण्यापासून आपला बचाव होऊ शकतो चला तर जाणून घेऊयात हे उपाय.

तर तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुले घ्यायची आहेत आणि वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून 11 वेळा काढून टाका. त्यानंतर ते पाणी झाडाखाली टाकून द्या. यामुळे तुमची वाईट दृष्टीपासून नक्कीच बचाव होऊ शकतो.
तसेच खडे मीठ घेऊन ते तुम्ही सात वेळा दृष्ट लागणाऱ्या व्यक्तीच्या डोक्याच्या वरच्या बाजू पासून ते पायापर्यंत असे सात वेळा करायचे आहे आणि नंतर ते तुम्ही मीठ एका ग्लासात टाकायचे आहे.

त्यानंतर ते फेकून द्यायचे आहे. यामुळे देखील तुम्हाला दृष्ट लागणार नाही. जर तुमची जेवणावरून वासना उडाली असेल तर चिंचेच्या 3 बिया घ्या आणि 7 वेळा डोक्यावरून काढा. यानंतर ते जाळून टाका. तसेच कोरड्या लाल मिरच्या डोक्यावरून सात वेळा काढा, नंतर जाळून टाका. हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने देखील वाईट नजरेपासून मुक्ती मिळते.

वाईट नजर टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजींचे लॉकेट घाला. आपल्या घरातील लहान मुलांना देखील दृष्ट लागत असेल म्हणजेच मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडत असतो. जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मुल रडू लागते. दृष्ट लागल्यानंतर मुलांमध्ये विविध बदल दिसून येतात. म्हणजेच एखाद्या मुलाला दृष्ट लागली तर ते मुल खूपच रडू लागते.

तसेच त्याला ताप देखील येतो चिडचिड होते. तर या गोष्टीवरून दृष्ट लागली आहे हे आपणाला कळते. वारंवार जर मुलांना दृष्ट लागत असेल तर यासाठी आपण मंगळवारी एका चांदीच्या तावीजमध्ये हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदूर भरून घ्यावा. हे तावीज काळ्या दोऱ्यात बांधून मुलाच्या गळ्यात घालावे.

तसेच मुलांना अंधाराची तसेच एकटे कुठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुक्ल पक्षातील एखाद्या मंगळवारी हनुमान चालीसाचे पुस्तक हनुमान मंदिरात अर्पण करा. त्यानंतर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदुराने मुलाला टिळा लावून लाल आसनावर बसून हनुमान चालीसाचे 11 पाठ करावेत. या उपायाने मुलांची भीती दूर होईल.

तर मित्रांनो वरील हे उपाय तुम्ही केले तरी यामुळे दृष्ट अजिबात लागणार नाही. दृष्ट लागल्यानंतर होणाऱ्या समस्यांपासून आपली सुटका नक्कीच होईल. तर तुमच्याही मुलांना जर वारंवार दृष्ट लागत असेल तर हे उपाय अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *