नमस्कार मित्रांनो,
घरात बनवरा बायकोचे सतत मतभेद होतात का? तुम्हाला नोकरी विषयक काही अडचणी आहेत का? व्यवसायात यश मिळत नाही? मित्रांनो यावर सगळ्यावर एक सोपा उपाय आम्ही आज आपण पाहणार आहोत. काय आहे तो उपाय चला जाणून घेऊया.
मन कितीही अशांतता असो जेव्हा बासरी वादन कानावर पडते तेव्हा मनाला अपार शांतता मिळते. म्हणूनच तर भगवान श्रीकृष्ण जेव्हा जेव्हा बासरी वादन करत तेव्हा समस्त सृष्टीची समाधी लागते असे. बासरीला भगवान श्रीकृष्णांनी ओटी लावले तेव्हापासून या वाद्याला अतिशय महत्त्वाचे आहे.
बासरीचे अस्तित्व हे श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची खूण मानली जाते म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घरात बासरी लावावी. तसेच बासरी वादन ऐकावं असं सुचवलं जाते. त्यामागची कारणे सविस्तर जाणून घेऊया. बासरीला अतिशय पवित्र आणि पूजनीय मानले जाते.
बासरीचे सूर सकारात्मकता वातावरणामध्ये निर्माण करतात आणि वातावरणात विशिष्ट प्रकारची प्रसन्नता व्यापून राहते. इतकच नाही तर बासरीचे सूर हे मानवी स्वरांची आणि तसेच पशू पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहुब मेळ खातात, म्हणूनही अनेक संगीत प्रकारांमध्ये बासरीची धून समाविष्ट केली असते.
बांबूचे झाड जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्व बांबूपासून बनलेल्या बासरीला देखील आहे. ज्यांना नोकरीच्या किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी असतील त्यांनी घरात बासरी नक्की लावावे. ज्यांना अपार कष्ट करूनही नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल अशा लोकांनी आपल्या कार्यस्थळी धातु मिश्रित बासरी लावावी. याने नक्कीच फायदा होतो.
नवीन व्यवसाय सुरु करताना तिथल्या वास्तूच्या कोणत्याही एका भिंतीवर बासरीची एक जोडी लावावी. त्यामुळे कार्यात अडचणी येत नाही. ज्या घरात बासरी असते तिथे प्रेमाला कमतरता नसते म्हणूनच वैवाहिक जीवनातील अडचणींवर उपाय म्हणून देखील घरात बासरीचा समावेश करा असं सांगितले जाते.
त्यामुळे पती-पत्नींचा आपापसातील प्रेम नक्की वाढते. त्याचबरोबर घरामध्ये कलह होत नाही. शांतता आणि सुख समृद्धी टिकून राहते. चांदीची बासरी आपल्या घरात असेल तर पैशांची अडचण भासत नाही.
सोन्याची बासरी घरात असेल तर घरात सदैव माता लक्ष्मीचा वास राहतो. बांबूच्या झाडापासून तयार केलेली बासरी तात्काळ उन्नती दायक असा प्रभाव दाखवते. ज्या लोकांना आयुष्यात यश प्राप्त होत नाही किंवा शिक्षण नोकरी व्यवसाय इत्यादीमध्ये नेहमी अडचणी येतात,
त्या लोकांनी आराम खोलीच्या दरवाज्यावर दोन बासरी लावाव्यात. घरात वास्तुदोष असेल तर दोन दरवाजे सरळ एका रेषेत असतील तर घरातील मुख्य दरवाजावर 2 वाजता लावणे फायद्याचे ठरते.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.