लग्न हा विषय असा आहे की पूर्वीसारखे काहीच राहिलं नाही, आधी लग्न घरचे म्हणतील तेव्हा, म्हणतील त्या मुलाशी केलं जायचं. ते ठरवतील तसंच व्हायचं. त्यामुळे आधी नापसंत करण्याला मुलाला, मुलीला संधी फारसे मत नव्हते, त्यामुळे जीवनातील आनंद , जगणं थोडं वेगळंच होतं, तेव्हा मुली देखील जास्त शिकलेल्या नव्हत्या, तसेच कुटुंब व प्रेम,संसार या गोष्टी त्यांच्यासाठी आद्य होत्या.
पण आधुनिक काळात सर्वच गोष्टी बदलल्या आहेत, मुली लग्न करताना बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घेतात, वेगवेगळ्या गोष्टींचं समर्थन झाल्याशिवाय त्या लग्नास होकार देत नाहीत, मुलांना नापसंत करण्याची अनेक कारणे निदर्शनास आली आहेत जी विचारात घेणं भाग पाडते.
1.स्वातंत्र्य : कारण आजच्या पिढीला त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल फारच प्रेम असतं. त्यांच्यावर कोणतही विनाकारणचं बंधन असू नये, त्यांचे निर्णय घेण्याचं त्यांना स्वातंत्र्य असायला हवं असतं. पण लग्नानंतर त्यांच्या याच स्वातंत्र्यावर गदा येणार असते असा त्या विचार करतात. त्यामुळे लग्नापासून दूर जाण्यासाठी त्या मुलांना रिजेक्ट करतात. स्वातंत्र्य आणि जबाबदारी या गोष्टींचा ताळमेळ घालण्यास त्या लवकर तयार होत नाहीत.
2.करिअरला प्राधान्य : तसेच दुसरे कारण म्हणजे आजकाल मुली आपल्या करिअरला फारच महत्त्व देऊ लागल्या आहेत. त्यांना त्यांची स्वत:ती वेगळी निर्माण करायची असते. स्वत:च्या पायावर त्यांना उभं रहायचं असतं. त्यामुळे अशात लग्न केल्यामुळे त्यांचं करिअरचं हे स्वप्न धुळीला मिळू शकतं असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्या मुलांना रिजेक्ट करतात.
3.मुलाची फॅमिली: याचबरोबर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, काही मुली असा विचार करतात की, लग्नानंतर मुलाच्या परिवाराकडून त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या जातील. अशात घर आणि नोकरी कशी सांभाळायची हा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होतो. निर्णय घेण्याआधी सर्वांचं मत घ्यावं लागेल हाही विचार त्या करत असतात त्यामुळेही त्या मुलांना रिजेक्ट करता असं निरीक्षण आहे.
4.प्रेम संबंध : याचबरोबर, काही मुलींचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम असतं पण हे सगळं तिच्या घरी चालणारं नसतं. त्यामुळे त्या ही गोष्ट घरी सांगू शकत नाही. त्या स्वतःच्या खासगी गोष्टी घरी सांगू इच्छित नसतात, यावेळी त्यांची अवस्था कात्रीत सापडते म्हणून अशावेळी त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याने त्या मुली मुलांना रिजेक्ट करतात.
5.आजूबाजूच्या घटना: तसेच सतत आजूबाजूला वैवाहिक समस्या त्यांना बघायला मिळतात. छोट्य़ा छोट्या कारणांमुळे मोडलेले संसारही त्यांनी बघितले असतात. अनेक आधी चांगली वागणारी आणि नंतर वाईट झालेल्या मुलांची उदाहरणे त्यांनी वाचलेली, ऐकलेली असतात. अशात लग्न करायची इच्छा असूनही एक भीती त्यांच्या मनात तयार झालेली असते.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.