श्री स्वामी समर्थ, तर तुमच्या आयुष्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर तुम्ही हा एक स्वामींचा उपाय नक्कीच केला पाहिजे ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि संकटे दूर होण्यास सुरुवात होईल. तर प्रसिद्ध ग्रंथ गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक मानले जाते, ते 15 व्या- 16 व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहील्याची इतिहासात नोंद आहे.
ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत.
या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात जर आपल्या जीवनात खुप संकटे किंवा अडचणी असल्यास,रोज या गुरूचरित्र मधील एका अध्यायाचे वाचन करा,त्यामुळे आपल्यावरील सर्व प्रकारची संकटे दूर होतील. कारण स्वामींची कोणतीही सेवा वाया जात नाही, याशिवाय स्वामींचे नामस्मरण सुद्धा कधीच वाया जात नाही, मात्र या कधीकधी गोष्टींना थोडा उशीर होतो, कारण त्यावेळी स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात.
त्यांच्या भक्ताला कधी काय द्यायचे आहे,हे ते स्वतः ठरवीत असतात.म्हणून सर्व काही स्वामींच्या मनासारखे होत असते,त्यामुळे आपण सगळं काही स्वामींवर सोडून द्यावे. त्यामुळे तुमच्यावरील सर्व संकटे दूर करण्यासाठी,एक असा अशी गोष्ट सांगणार आहे, जी तुमच्या जीवनात हे सगळे संकट किंवा अडचणी दूर करते.
तुमच्यावर किंवा तुमच्या परिवारावर आलेले सगळ्या अडचणी, समस्या दूर करते.यासाठी तुम्हाला फक्त रोज एक छोटीसे वाचन करायचे आहे. तुमच्या जीवनात खूप समस्या किंवा त्यातील अडचणी येत असतील तर, तुम्हाला गुरुचरित्र मधील चौदावा अध्याय वाचायचा आहे. यासाठी हा 14 वा अध्याय आपल्याला ऑनलाईन उपलब्ध होऊ शकतो किंवा तुमच्याकडे गुरुचरित्र असेल, तर तुम्ही 14 वा अध्याय बघा आणि त्याचे वाचन रोज करावे.
एवढं उपाय रोज केल्यास,तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही,तसेच कोणत्याही प्रकारची संकल्प करण्याची आणि कोणताही मंत्र जपाची आवश्यकता नाही.पण यासाठी तुम्ही फक्त गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय रोज वाचायला हवा.जर तुम्ही व्यापारी असाल किंवा नोकरी करीत असाल ,तुम्ही घरात राहात असाल,तरी हा उपाय केल्यास आपल्याला फलप्राप्ती होत असते.
याशिवाय हा उपाय म्हणजे,गुरुचरित्र 14 वा अध्यायाचे वाचन कोणीही म्हणजे, महिला, शाळेत जाणारी लहान मुले असतील किंवा कॉलेजला जाणारी मुले असतील तरी, गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय तुमच्यासाठी खुप गुणकारी असू शकतो आणि हाच उपाय तुम्हाला सगळ्या संकटांपासून मुक्त करू शकतो. तुमच्या अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा व्यवसाय चालत नाही,तरी हा 14 वा अध्याय वाचावा.
याशिवाय घराचा सतत काहीतरी अडचणी येत असल्यास, 14 वा अध्याय वाचला पाहिजे. तसेच आपले कुठेतरी पैसे अडकले असल्यास, आपल्याला हा 14 वा अध्याय वाचला पाहिजे. त्यामुळे आपल्या घरातील सर्व प्रकारच्या समस्यांसाठी,गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय वाचला पाहिजे. मात्र हा अध्याय वाचण्याची एक योग्य वेळ तुम्ही ठरवली पाहिजे,आणि रोज याचा वेळी हा अध्याय वाचन केले पाहिजे.
त्यामुळे शक्य असल्यास,या अध्याय वाचन सकाळीच केले पाहिजे, कारण सकाळी उठून आंघोळ करून संपूर्ण शुद्ध अवस्थेत, देवपूजा करून तुम्ही हा 14 वा अध्यायाचे वाचन करू शकता. असे शक्य नसल्यास, तुम्ही तुम्हाला जसं जमेल,आणि कोणती तरी एक वेळ ठरवून की, या वेळेला मला हा अध्याय वाचायचे आहे,मात्र ही वेळ रोज एकच असणे आवश्यक आहे. त्यामुळे रोज एक उत्तम वेळ ठरवून व त्या वेळेनुसार आपल्याला हा गुरुचरित्रचा 14 वा अध्याय वाचायचा आहे. रोज वेळांमध्ये बदल केल्यास,आपल्याला यांची काहीच उपयोग होणार नाही.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा