तुमचा वाढदिवस जर एप्रिल महिन्यात असेल तर ज्योतिष शास्त्र सांगत की, या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती या दिसायला मोहक, आकर्षक, मेहनती, रसिक आणि हसतमुख असतात. कलांचा आस्वाद घेण्याची कला त्यांना चांगल्या प्रकारे अवगत असते. साहसी खेळात त्यांना विशेष रस असतो. स्वभाव थोडा अतरंगी सुद्धा असतो. तुम्ही कसेही वागले तरी, त्यांनी तुमच्याशी छानच वागावं अशी मात्र तुमची अपेक्षा असते.
परंतु एक मात्र खरं की, एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती रंगात आल्या की, सभेचा आकर्षण बिंदू ठरतात. याचा कारण हजरजबाबीपणा आणि अलौकिक बुद्धिमत्ता. तसेच या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींनी ज्योतिष शास्त्रकडून रसिक अशी बिरूदावली मिरवली आहे, यावरून त्या लोकांचे प्रणय जीवन किती रंगीत असेल याची कल्पनाच केलेली बरी. सोळाव्या वर्षाचा टप्पा पूर्ण होतात त्यांचे प्रेमसंबंध सुरू होतात.
एका वेळेस 4-4 जणांवर भुरळ घालण्याचे कौशल्य यांच्याकडे असतात आणि प्रत्येक प्रकरण ते लीलयास सांभाळतात. चोरी पकडली गेली तर त्यांच्या भोळ्या चेहऱ्यामुळे त्यांना 100 गुन्हे माफ केले जातात. त्यांचे वैशिष्ट्य असं की, प्रत्येक प्रकारच्या नैतिक, अनैतिक गोष्टी करूनही लग्नानंतर वैवाहिक जीवनात ते साळसूदपणाचा एवढा आव आणतात की भूतकाळात त्यांच्याकडून काही प्रकार घडले आहेत.
यावर जोडीदाराचा ही विश्वास बसत नाही. तसेच क्रीडा प्रसारमाध्यमं, जाहिराती, राजकारण या क्षेत्रात यांना विशेष गती असते. त्यामुळे आपल्याला जे हवं ते हट्टाने मिळवतात. यश हेच त्यांचे सोबती असल्यामुळे ते ज्या क्षेत्रात जातील त्यामध्ये यश संपादन करतात. खर्चाच्या बाबतीत मात्र त्यांचा हात सढळ असतो.
कोणी त्यांना खर्चावर नियंत्रण करण्याचा सल्ला दिला तर त्या व्यक्तीचा त्यांच्या शत्रू यादीत समावेश होतो. त्यांचा राग न परवडणारा असतो. लोक त्यांना जरा वचकून असतात, परंतु त्यांच्या गोड हसण्याकडे पाहता त्यांच्या रागाची कल्पनाही येणे ही कठीण जातं. त्यामुळे या व्यक्तींनी बोलण्यावर आणि रागावर ताबा मिळवला तर त्यांची खूप प्रगती होऊ शकते. आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा अपयशाची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजे.
आपल्या रंग रूपाबद्दल अभिमान न ठेवता, दुसऱ्यांच्या भावनांचा आदर या व्यक्तीने केला पाहिजे. या महिन्यात अनेक व्यक्तींनी प्रसिद्धीचे शिखरे गाठलेली आहेत. जसं की, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर, पंडित रविशंकर, आलू अर्जुन, कपिल शर्मा, राम गोपाल वर्मा, मनोज वाजपेयी, जया बच्चन, अर्जित सिंग, प्रभुदेवा आणि अजय देवगन इत्यादी होय. याचा शुभ रंग नारंगी आणि सोनेरी असुन शुभवार रविवार, बुधवार, शुक्रवार आणि यांच्यासाठी शुभरत्न माणिक तर शुभ अंक 1, 4, 5 आणि 8 होय..
मित्रांनो वरील माहिती विविध शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाला आपण भेट देऊ शकता. तसेच अशाच प्रकारच्या विविध राशी व उपाय यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.