आजच तुळशी जवळ ठेवा या तीन वस्तू सर्व मार्गांनी पैसा येऊ लागेल, माता लक्ष्मी येईल धावत…

अध्यात्मिक

नमस्कार मंडळी,

।।श्री स्वामी समर्थ।।

माता तुळशी जवळ ठेवा या तीन वस्तू सर्व मार्गांनी पैसा येऊ लागेल. तुळस म्हणजे आपल्या अंगणाचि शोभा प्रत्येक हिंदू धर्मियांच्या अंगणात तुळस असतेच असते आणि जर नसेल तर ती असावी. कारण तुळस माता लक्ष्मीचे स्वरूप आहे. तुळस ही विष्णू प्रिय आहे. तुळस ही शुभ समजले जाते. आपल्या घराकडे येणारी नकारात्मक शक्ती ती दूर ठेवते. आपल्या घराचं नकारात्मक शक्ती पासून दोषपासून ती संरक्षण करते.

वातावरण पवित्र ठेवणारी वातावरण शुद्ध ठेवणारी तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर असायलाच हवी. तुळशीचं मोठ धार्मिक महत्व सांगितलेले आहे. तुळशीची जर नियमित पूजा केली तर आपल्या घरात सुख, शांती, वैभव या सर्व गोष्टी नक्की येतात. माता तुळशी जवळ काही विशिष्ट वस्तू ठेवल्या तर कित्येक पटीने सकारात्मक प्रभाव वाढतो.

सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू आहे स्वस्तिक. स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभ आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. असं म्हणतात ज्या ठिकाणी स्वस्तिक चिन्ह असते त्या ठिकाणी सर्व देवी देवतांचा वास असतो. सकारात्मक ऊर्जा ला आपल्या जवळ खेचून आणण्याची क्षमता असते. बऱ्याच जणांच्या घरात तुळस सुकते. मित्रानो जेव्हा आपल्या घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त वाढतो.

सकारात्मक शक्ती कमी होतात. त्यावेळी सर्वात प्रथम आपल्या अंगणात तुळस सुकते. जेव्हा जेव्हा तुळस सुकते तेव्हा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कोणतातरी मोठ संकट नक्की येणार आहे. किंवा आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे. माणसा प्रमाणेच घराला नजर लागतं असते. अशी नजर लागलेली असेल तर तुळस सुकते. अशा वेळी आपण तुळशी जवळ स्वस्तिक चिन्ह नक्की रेखाटा.

तुलसी वृंदावन आहे त्यावर सुध्दा हे स्वस्तिक चिन्ह रेखाटू शकता. ज्या ठिकाणी स्वस्तिक हे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती कधीच राहत नाही. हे स्वस्तिक काढताना कुंकुचा वापर करा. हे स्वस्तिक काढताना ओम नमो भगवते वासू देवाय हा श्री हरी विष्णूंना प्रिय असणारा जप नक्की करा. हा जप करत करत हे स्वस्तिक चिन्ह काढले तर माता तुळशीचा प्रभाव कित्येक पटीने वाढतो.

घरावरचा नजर दोष दूर होतो. पैसा सर्वच काही नाही. बऱ्याच जणांना संतान प्राप्ती होत नाही. मूल बाळ होत नाही. ज्यांना संतान प्राप्ती ची इच्छा आहे. ज्यांना तेजस्वी ओजस्वी, सदाचारी आणि नम्र अशी बालके हवी आहेत. त्यांनी तुळशी जवळ बसून जी गर्भवती स्त्री आहे ज्यांना संतान प्राप्ती ची इच्छा आहे. अशा स्त्रीने तुळशी जवळ बसून भगवत गीता चा पाठ अवश्य करा.

जी स्त्री तुळशी जवळ बसून भगवत गीते चा पाठ करते. संतान प्राप्ती ची इच्छा व्यक्त करते. त्या स्त्रीला तेजस्वी आणि ओजस्वी संतान प्राप्ती नक्की होते. काहीजण म्हणतात की तुळस जगत नाही व्यवस्थित उगवत नाही ती काही दिवसातच जळून जाते. असे असेल तर आपण एक चूक करत आहात. हे पहा आपण कुठूनही तुळशीचं रोपट आणून ते तुळशी वृंदावन मध्ये लावणं योग्य नाही.

जेव्हा तुम्ही तुळशीचं रोपट आणाल तेव्हा मनोभावे त्या तुळशीला हात जोडून प्रार्थना करा हे माता तुळशी आम्ही तुम्हाला आमच्या घरी आमंत्रित करत आहोत. या आमंत्रण चा स्वीकार करावा. आणि ओम नमो भगवते वासू देवाय या मंत्राचा जप करत करत आपण माता तुळशी ची स्थापना तुळशी वृंदावन मध्ये करावी. गुरुवारचा दिवस माता तुळशी ची स्थापना करण्यासाठी अत्यंत महत्वाचा समजला जातो. गुरुवार, बुधवार, शुक्रवार हे तिन्ही दिवस अत्यंत शुभ तुळशीचं रोपट लावण्यासाठी आहेत.

दुसरी वस्तू आहे शालिग्राम. शालिग्राम आणि शिवलिंग यतील फरक लोकांना कळत नाही. अनेक लोकांच्या तुळशीत शिवलिंगाची स्थापना केलेली असते. असे केल्याने आपल्या कुटुंबावर अनेक प्रकारचे संकट येतात. माता तुळशी त्यामुळे नाराज होते. लक्षात घ्या दुसरी वस्तू आहे शालिग्राम हा काळया रंगाचा दगड असतो. अत्यंत पवित्र दगड समजला जातो. आणि शालिग्राम म्हणजे हिंदू धर्म शास्त्रानुसार तुळशीचे पती होय.

म्हणून आपण शालिग्राम ची स्थापना अगदी विधिवत तुळशी वृंदावन मध्ये नक्की करा. आणि हो दिवाळी नंतर जो तुलसी विवाह येतो त्यावेळी हा दगड तुळशी जवळ अवश्य ठेवावा. आणि तुलसी विवाह संपन्न करावा. ज्या तुळशीचा विवाह संपन्न झालेला नाही अशा तुळशी जवळ आपण चुकूनही शालिग्राम ची स्थापना करू नका. केवळ विवाह झालेल्या तुळशी जवळ शालिग्राम स्थापन करावा.

त्यामुळे तुळशीची शोभा वाढतेच आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंद या सर्व गोष्टी सुद्धा आपोआपच येतात. काही जणांना वाईट स्वप्न पडतात. रात्रीची झोप लागत नाही. अनिद्रेचा त्रास आहे. आजकालची जी जीवन शैली आहे ती ताण तणाव ची आहे. झोप लागण्यासाठी, मनावरील ताण हलका करण्यासाठी आपण माता तुळशी ची नित्य नियमाने पुजा करत चला. झोपताना एका ग्लास मध्ये पाणी घेऊन त्यात तुळशीची पाच पाने टाका.

रात्रीच्या वेळी तुळशीची पानं तोडू नये. दिवसा तोडावी स्वच्छ करावी आणि ग्लास मध्ये पाणी घेऊन पाच पाने टाकून तो ग्लास झाकून उशाशी ठेवावा. असे केल्याने आपल्याला चांगली झोप लागते. मनावरील ताण कमी होतो. सकाळी उठल्यावर हे जे पाणी आहे ते पिण्यास विसरू नका. दात वैगरे स्वच्छ करून आपण हे पाणी प्यावे. तुळशीची पाच पाने आहेत ती सुद्धा चावून चावून खावी. मित्रानो ताण तणाव तर हलका होईलच मात्र आपल आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे.

तिसरी आणि शेवटची वस्तू जर माता तुळशी जवळ ठेवली तर तुळशीचा प्रभाव कित्येक पटीने वाढणार आहे. सकाळच्या पूजेत किंवा सायंकाळच्या पूजेत तुळशी जवळ तुपाचा दिवा अवश्य लावा. देशी गाईचे असेल तर अत्यंत चांगले आहे. नसेल तर कोणत्याही गायीचे चालेल. तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा. असे म्हणतात की तुपाचा दिवा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी सर्व देवी देवता आमंत्रित होतात.

सर्व देवी देवतांना प्रसन्न करणारा असा हा उपाय आहे. माता तुळशी जवळ तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी ची कृपा बरसते. श्री विष्णू सुद्धा प्रसन्न होतात. हा दिवा लावताना ओम नमो भगवते वासू देवाय हा मंत्र म्हणावा. सर्व प्रकारच्या कामात यश प्राप्त करून देणाऱ्या या तीन वस्तू आहेत. नोकरी व्यवसाय कोणताही कार्य असू द्या त्यात सफलता प्राप्त होते. शुभ समाचार ऐकायला मिळतात. आलेल्या संकटातून मार्ग काढण्याचे काम माता तुळशी करते.

आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज डॅशिंग मराठी हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *