तुळशी मंजिरीचे अद्भुत उपयोग लगेचच जाणून घ्या

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

घराबाहेर अंगण, अंगणात तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावना भोवती रंगीत रांगोळी हे सर्व दृश्य पाहताच मन कसा प्रसन्न होतं. रोज सकाळी तुळशीला पाणी घालून पूजन करायचं आणि प्रदक्षिणा घालायची ही पद्धत प्राचीन काळापासूनच चालत आली. म्हणून अंगणात तुळस हवीच.

तिन्ही सांजा तुळशी वृंदावनासमोर दीपप्रज्वलित करून तुळशीचे संस्कृत स्तोत्र म्हणून प्रार्थना केली जाते. महिला तुळशीला सर्वश्रेष्ठ देवता म्हणतात. तिला वत्सल्यमयी माता मानतात. महिला तुळशीपुढे आपलं मन मोकळे करतात, कौटुंबिक कल्याणासाठी तिची आळवणी करतात, तुळशीला जीवाभावाची मैत्रीण समजून तिच्याशी संवाद साधतात, सांज सकाळ तुळशीचे दर्शन घेऊन प्रार्थना करतात.

मात्र याच तुळशीला मंजिरी आली की तुळशीला दुःख होतं असं म्हटलं जातं. आणि म्हणून तुळशीची मंजिरी काढत राहावी असं सांगण्यात येत. मात्र याच तुळशी मंजिरीचा अवलंब केल्यास संपत्ती आणि समृद्धी मिळवली जाऊ शकते असं सुद्धा म्हटलं जातं. तुळशीला येणाऱ्या मंजिरी ही आपल्यासाठी फायदेशीर ठरतात हे फार कमी लोकांना माहिती आहे.

आनंदी जीवन जगण्यासाठी तुळशीच्या मंजिरी कशा वापराव्यात याविषयी सविस्तर जाणून घेऊया.वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते. हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप शुभ मानल जात. तुळशीच्या रोपांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याचे म्हटले जाते.

शिवाय वास्तुशास्त्रानुसार घरातील अंगणातील तुळशीला मंजिरी येण सुद्धा शुभ असत. तुळशी भगवान विष्णूला प्रिय आहे. अशी धार्मिक मान्यता आहे. तुळशीचा उपयोग विशेषता भगवान विष्णूच्या पूजेमध्ये केला जातो. विष्णू पूजेत तुळशीची पाने तसेच तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्यास अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते असं सांगण्यात येत.

याशिवाय उत्पन्नातही वाढ होते असं सुद्धा मानलं जातं. या तुळशीच्या मंजिरी भगवान शिवाला सुद्धा अर्पण केल्या जाऊ शकतात. होय हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये असं सांगण्यात आले की भगवान शिव आणि त्यांचे पुत्र गणेश यांना तुळशीची पाने अर्पण करणार निषिद्ध मानले गेले आहे.

परंतु तुम्ही जर भगवान शंकराला मंचिरी अर्पण केल्या तर तुम्हाला कौटुंबिक सुखाचा लाभ मिळतो असं सांगण्यात येत.
एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रेमाची कमतरता असेल किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींने दुधात मंजुरी मिसळून शिवाला अभिषेक करावा असं सांगण्यात येत. याशिवाय गंगेच्या पाण्यात मंजिरी टाकून ठेऊ शकता.

तुळशी मंजिरी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यात फायदेशीर आहे असं सांगण्यात येत. म्हणूनच कोणत्याही शुभ दिवशी गांगेच्या पाण्यात मंजिरी मिसळावी आणि आठवड्यातून दोनदा तरी घरात हे पाणी शिंपडावं. असं केल्यास आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असं सांगण्यात येत.

शिवाय तुळशी मंजिरीचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे एका लाल कपड्यात तुळशी मंजिरी बांधून घराच्या त्या ठिकाणी ठेवाव्यात जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता. कॅश बॉक्स किंवा तिजोरी मध्ये तुम्ही तुळशी मंजिरी लाल कपड्यांमध्ये बांधून ठेवावी असं सांगण्यात येत. हे केल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो.

आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही असं सांगण्यात येत.याशिवाय शुक्रवारी आई लक्ष्मीला मंजिरी अर्पण करावी. जर तुम्ही दर शुक्रवारी आई लक्ष्मीच्या चरणी तुळशीची मंजिरी अर्पण केली तर आई लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना लवकरच पूर्ण करते असं सांगण्यात येत.तर तुळशी मंजिरी चे असे हे फायदेशीर उपाय तुम्ही करून पाहिले तर नक्कीच त्याचा लाभ तुम्हाला मिळेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *