राशीभविष्य: चंद्राचा गुरूशी षडाष्टक योग; 6 राशीना बनवणार राजा शनी महाराजांची कृपा बरसणार

राशिभविष्य

नमस्कार मंडळी

आज दिनांक 30 नोव्हेंबर 2021.वर मंगळवार  कार्तिक कृष्ण एकादशी. चंद्र कन्या राशीतून भ्रमण करणार असून गुरूशी षडाष्टक तर शुक्राशी  केंद्र योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज चंद्र  कन्या राशीतून  भ्रमण करणार असून सूर्य वृश्चिक राशीत आहे. आज दिवस जरा आळसा मध्ये जाईल. काम काज करण्याची इच्छा नसेल. शरीर शिथिल, मन अशांत.  दिवस घरात, आरामात घालवणे योग्य.

वृषभ

आजचा दिवस शुभ संकेत देतो आहे. मुले, मुली तुमची  प्राथमिकता  राहील. वाचन लिखाण, छोटे प्रवास संभवतात. दिवस  उत्तम जाईल. आर्थिक घडामोडी घडतील. जपून व्यवहार करा. दिवस शुभ.

कर्क

प्रवास, भेटीगाठी असा हा दिवस  आहे.  भाऊ बहिणी  संपर्क करतील.  मंगळ आईशी मतभेद दर्शवत आहे  खर्च बेताने. कामे वाढतील. पण काळजी नको.  जोडीदाराला वेळ  द्या. उपासना करा.

सिंह

आज पैसा  मिळण्याची शक्यता आहे. पण येण्या आधीच  खर्च  होईल.  कुटुंबासाठी  त्याग करावा लागेल. प्रकृती  सांभाळून दगदग करा. दशमातील राहू  कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देईल. कायदा पाळा. दिवस चांगला.

कन्या

आज राशीतून होणारे  चंद्र भ्रमण शुभ आहे  दोन दिवसा पासून वाटणारी अस्वस्थता कमी होईल .सूर्य अणि शुक्र कार्य क्षेत्रात यश मिळवून देणार हे नक्की. गुरु जप करा. दिवस चांगला आहे  .

तुला

आज घाई गडबड ना करता  शांततेत काम करा. व्यय  होऊ शकतो  पैसा , वेळ अथवा आरोग्य  जपुन असा. कामाच्या ठिकाणी नवीन अडचणी आल्या तरी  घाबरू नका. निवारण होतील. संतती सहकार्य करेल. दिवस मध्यम .

वृश्चिक

उत्तम लाभ ,प्रवास, मित्रमैत्रिणी जमवून  छोटी  पिकनिक असा दिवस आहे. पण सध्या थोडी सावधगिरी बाळगावी लागेल.  मंगळ सध्या व्ययस्थानात आहे .प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू राहतील. काळजी घ्या .

धनु

आज भरपूर काम करावे लागेल. लागोपाठ  मीटिंग्स, फोन, भेटी यामुळे  थकून जाल. दिवसाची नीट प्लॅनिंग  करा. कामानिमित्त प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तू सांभाळा. दिवस चांगला आहे.

मकर

दोन दिवसापासून वाटणारा तणाव आज नक्की  कमी  होईल. अडचण आली असली तरी मार्ग सापडेल. जोडीदाराची साथ लाभेल. पण वाद नको. संतती चिंता आता जरा कमी होईल. दिवस  अनुकूल .

कुंभ

अष्टमात चंद्र, राशी च्या व्यय स्थानात शनी ही ग्रहस्थिती फारशी बरी नाही. जपुन चालावे. सांधे व हाडाची दुखणी डोक वर काढतील . घरातली काही आवश्यक कामे  करावी लागतील. शनी जप करावा.

मीन

आज काही खरेदी असेल तर  जोडीने करून घ्यावी. अष्टमात मंगळ ,बारावा गुरू हा आरोग्यचिंता  निर्माण करेल .गुरूची  उपासना, जप  व दान  करीत असावे. हिम्मत  वाढेल. दिवस  शुभ आहे.

शुभम भवतु!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *