मित्रांनो, तुम्ही स्वामींचे सेवेकरी असाल किंवा आता नवीनच स्वामींचे सेवेकरी झाले असाल, जुन्या सेवेकऱ्यांना तर माहीतच आहे की, स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची आहे? आजच्या या लेखांमध्ये आपण कोणती ही सेवा आहे आणि ही सेवा कशा पद्धतीने करायचे आहे ? याबद्दल माहिती घेणार आहोत. कारण ही सेवा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि आपल्याला जे काय हवे आहे ते सर्व मिळणार आहे.
ही सेवा सुरू करण्याआधी आपल्याला एक संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडून झाल्यानंतरच आपण ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. तुम्ही ही सेवा कोणत्याही दिवसापासून करू शकता. परंतु स्वामी समर्थ महाराजांचा आवडता वार गुरुवार आहे. जर आपण गुरुवारपासून ही सेवा केली तर ते तुमच्यासाठी खूप शुभ असू शकते.
महिन्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही एका गुरुवारपासून ही सेवा आपल्याला सुरू करायचे आहे. पुढे सलग तीन महिने सेवा करायची आहे. आपण जी सेवा करणार आहोत. या सेवेचा लाभ आपल्याला तीन महिन्याच्या आतच किंवा तीन महिन्यानंतर लगेचच होणार आहे. तुमची जी काही इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण होईल. ही सेवा महिला, पुरुष कुणीही करू शकतात.
स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा करत असताना आपल्याला यामध्ये तीन गोष्टी करायचे आहेत. या तीन गोष्टी करण्यात आपल्याला संकल्प सोडावा लागणार आहे. संकल्प सोडून झाल्यानंतरच आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. आपण संकल्प देवघरासमोर बसूनच सोडायचा आहे. संकल्प सोडण्यासाठी ताम्हण आणि पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे.
देवघरा समोरच बसून आपल्याला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडण्याआधी देवघरासमोर बसायचे आहे आणि दिवा, अगरबत्ती लावायची आहे. दिवा अगरबत्ती लावून ताम्हणामधे पाणी सोडून झाल्यानंतर संकल्प सोडायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे. त्यानंतर आपल्या हातावर ते पाणी सोडायचे आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे.
आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा सांगून माझी ही इच्छा पूर्ण करा. असे सांगून दोन्ही हात जोडून आपली जी काही सेवा आहे. ती सेवा सुरू करायची आहे. या सेवेमध्ये सर्वात प्रथम आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्याकडे जर माळ नसेल तर घड्याळ लावून घड्याळाचे 15 मिनिटे आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे.
म्हणजे आपली 11 माळ जप पूर्ण होतो. अकरा माळी जप करून झाल्यानंतर एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर एक वेळेस ‘राम रक्षा स्त्रोत्र’ म्हणायचं आहे. आपण जी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणार आहोत. त्या सेवेमध्ये या तीन गोष्टी करायची आहेत. सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही एक वेळ ठरवून तुम्ही ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू शकता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण संकल्प सोडला आहे. तो संकल्प फक्त एक वेळेसच सोडायचा आहे. ज्या दिवशी आपण ही सेवा सुरू करणार आहोत. त्या दिवशीच आपल्याला संकल्प सोडायचा आहे. इतर कोणत्याही दिवशी संकल्प सोडायचा नाही. आपण संकल्प सोडत असताना जे काही पाणी ताम्हणा मध्ये ठेवलेले आहे. ते पाणी तुळशीमध्ये वतू शकता.
वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर संकल्प सोडून स्वामी समर्थ महाराजांची ही तीन महिन्याची सेवा जर केली तर याची अनुभव तुम्हाला नक्की येतील. आणि आपली जी काही इच्छा आहेत ती इच्छा पूर्ण होईल. तुमच्या मनामध्ये जे आहे ते सर्व मिळेल तुमची इच्छा पूर्ण होईल. श्री सेवा खूप प्रभावशालीच आणि चमत्कारी सेवा आहे. त्यामुळे याचा लाभ देखील लगेचच होतात.
मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.