मित्रांनो, आपल्या घरातील स्वयंपाक घर हे एक महत्त्वाचे आहे. माणसाला स्वयंपाक घरामध्ये एक प्रकारचे समाधान मिळते. म्हणजेच आपले स्वयंपाक घरामध्ये अन्नपूर्णा मातेचे वास्तव्य असते. त्यामुळे स्वयंपाक घर हे कधीही स्वच्छ, नीटनेटके तसेच शांततेचे असावे.
तर मित्रांनो स्वयंपाक घरामध्ये देखील वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत या गोष्टी जर आपण पाळल्या तर यामुळे आपल्या घरामध्ये कधीच रोग येत नाहीत. म्हणजेच अनेक घरांमध्ये कोणत्या ना कोणत्या आजारांचा सामना करावा लागतो. मग त्या आजारांवर खूप सारा पैसा खर्च होत असतो. त्यामुळे मग घरामध्ये पैशासंबंधीत अडचणी निर्माण व्हायला लागते.
तर मित्रांनो स्वयंपाक घरामध्ये दररोज वापरली जाणारी वस्तू म्हणजे तवा. आपण चपाती किंवा भाकरी करताना तव्याचा वापर करीत असतो. तर मित्रांनो तव्यावर ज्यावेळेस तुम्ही भाकरी किंवा चपाती भाजता ती भाजण्यापूर्वी त्या तव्यावर तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे. जेणेकरून तुमच्या घरातील जी काही रोगराही आहे ती रोगराई संपून जाईल.
मित्रांनो जो काही आपल्या घरातील गरम तवा असतो त्या तव्यावर तुम्ही कधीही लगेच पाणी टाकायचे नाही. अनेक जणांना सवय असते की भाकरी किंवा चपाती झाली की, त्या खरकट्या तव्यावर लगेचच पाणी सोडतात. परंतु असे करणे खूपच अशुभ मानले गेलेले आहे.
मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही गरम तव्यावर पाणी शिंपडता त्यावेळेस आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती पसरली जाते. तसेच मित्रांनो जेव्हा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्या व्यक्तीच्या तेरावीला देखील आपण गरम तव्यावर पाणी शिंपडत असतो आणि ही प्रथा खूप वर्षापासून चालत आलेली आहे.
म्हणून मित्रांनो गरम तव्यावर पाणी शिंपडणे यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आणि हे अशुभ देखील मानले गेलेले आहे. मित्रांनो ज्योतिषशास्त्रात तव्याचा संबंध हा राहुशी जोडलेला आहे. म्हणूनच ह्या तव्याची दररोज स्वच्छता करणे खूपच महत्वाचे आहे. मित्रांनो साबण लावून आपला तवा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे.
तवा कधीही खरखटा स्वयंपाक घरामध्ये ठेवायचा नाही आणि तवा हा योग्य जागी देखील ठेवणे गरजेचे आहे. कारण बाहेरील लोकांची नजर कधीही तव्यावर पडू नये अशा जागी तवा आपणाला आपल्या स्वयंपाक खोलीमध्ये ठेवायचा आहे.
आपल्यापैकी बरेच जण हे तवा उभा किंवा लटकवून ठेवतात. परंतु मित्रांनो ही पद्धत अत्यंत चुकीची मानली गेलेली आहे. कारण तवा हा नेहमी पालथा घालून ठेवावा. कारण यामुळे आपल्या घरामध्ये शांती राहते. जर तुम्ही तवा उभा किंवा लटकवून ठेवला तर यामुळे आपल्या घरामध्ये अशांती पसरते.
तसेच अनेक प्रकारचे वादविवाद देखील होऊ शकतात. तसेच तवा कधीच गॅसवरती रिकामा ठेवता कामा नये. म्हणजेच चपाती करून झाल्यावर तो तसाच त्यावर ठेवू नये. तो लगेच काम झालं कि काढून दुसऱ्या जागी ठेवावा.
तर मित्रांनो तव्यावर ज्यावेळेस तुम्ही भाकरी किंवा चपाती करता ती करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटेसे काम करायचे आहे. तुम्हाला चपाती किंवा भाकरी भाजण्यापूर्वी चिमूटभर अगदी थोडेसे मीठ तुम्हाला त्या तव्यावर टाकायचे आहे. मीठ टाकल्यानंतर तडतड असा आवाज येऊ लागेल आणि असा आवाज आल्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतील त्या सर्व निघून जातील.
आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहील. तसेच आपल्या घरात जे काही रोगराही असेल ती सर्व निघून जाईल. वैज्ञानिक तथ्य असे आहे कि जेव्हा आपण तव्यावर असे मीठ टाकतो व त्यातून जो आवाज निघतो व त्या मिठाचे रूपांतर एक वायूत होते. त्यातून त्या तव्याची स्वछता होते. तव्यावर असणारे जीवजंतू मरण पावतात व अश्या तव्यावर चपाती भाकरी केल्याने व खाल्याने त्या घरातील व्यक्ती आजारी पडत नाहीत.
तर मित्रांनो तुम्ही देखील आपल्या घरामध्ये ज्यावेळेस भाकरी किंवा चपाती तव्यावर करणार असाल त्यापूर्वी तुम्ही चिमूटभर मीठ तुमच्या तव्यावर नक्की टाका आणि तडतड असा आवाज देखील येऊ द्या. ज्यामुळे तुमच्या घरातील आजारपण दूर होईल. धनधान्यांमध्ये बरकत राहील आणि ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील त्या सर्व आपल्या घरामधून निघून जातील. तर असा हा साधा सोपा उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.