मित्रांनो, आयुष्यात अनेक वेळा खूप कष्ट करूनही पूर्ण फळ मिळू शकत नाही आणि नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता भासते. ज्योतिष शास्त्रानुसार जीवनातील सर्व सुखे मिळवण्यासाठी नशिबाची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. कधी कधी काही कारणाने आपले नशीब साथ देत नाही. अशा वेळी तांदळाचे काही छोटे उपाय करून तुम्ही तुमचे नशीब मजबूत बनवू शकता.
तांदूळ हिंदू धर्मातील अनेक धार्मिक कार्यात वापरले जातो. अनेक धार्मिक विधी करण्यासाठी तांदळाचा वापर केला जातो. कोणतीही पूजा असो किंवा लग्न समारंभ असो अक्षता म्हणून तांदूळ वापरले जातात. याशिवाय पूजा मांडताना राशीसाठी किंवा कळस ठेवण्यासाठी तांदळाचा वापर केला जातो. त्यामुळे तांदूळ अनेक कारणांसाठी शुभ मानले जाते. म्हणूनच आजच्या या लेखात आपण तांदळाचे असे काही उपाय जाणून घेणार आहोत की, जे तुमचे नशीब बदलू शकतात.
एखादी व्यक्ती आर्थिक संकटातून जात असेल आणि अथक परिश्रम करूनही मेहनतीचे पुरेसे फळ मिळत नसेल त्या व्यक्तीने कोणत्याही सोमवारपासून हा उपाय केला तरी चालू शकतो. या उपायासाठी आपल्याला 21 तांदळाचे अखंड दाणे घ्यायचे आहेत आणि ते दाणे घेऊन आपल्याला अनवाणी पायाने शिव शंकराच्या मंदिरामध्ये जायचे आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम आपल्याला शिवशंकरांच्या पिंडीला नमस्कार करायचा आहे.
आणि हा 21 तांदळाचा दाणा एक एक या प्रमाणामध्ये शिव पिंडीवर घालत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. सगळे दाणे एकदम टाकायचे नाहीत. एक एक या पद्धतीनेच दाणे टाकत आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे. असा हा उपाय केल्याने आपल्या सर्व समस्या दूर होतील.
हा उपाय तुम्ही कोणत्याही सोमवारपासून केला तरी चालू शकतो किंवा श्रावण महिन्यातील सोमवारपासून या उपायाचा आरंभ केला तरी चालू शकतो.
हा उपाय जोपर्यंत आपल्याला प्रचिती येत नाही तोपर्यंत दररोज करत राहायचं आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा झालेला दिसून येईल. त्याचबरोबर आपल्याला हा उपाय एखाद्या व्रताप्रमाणे करायचा आहे. म्हणजेच उपाय करत असताना आपल्याला कोणताही प्रकारचे मध्य सेवन करायचे नाही, त्याचबरोबर कोणालाही खोटे बोलू नये, कोणाशीही भांडू नये, कोणालाही वाईट बोलू नये या प्रकारचे काही नियम आपल्याला पाळायचे आहेत. दानधर्म करत रहावा.
त्याचबरोबर आपले जे काही पैसे कमावण्याचा संबंधीचे जे काही प्रयत्न चालू आहेत ते प्रयत्न चालूच ठेवायचे आहेत. कारण ज्या ठिकाणी प्रयत्न आहेत त्याच ठिकाणी देव आपल्याला प्रसाद देत असतात. म्हणूनच आपण आपले प्रयत्न कधीही थांबू नयेत. ज्योतिष शास्त्रानुसार अक्षत हे चंद्राचे रूप मानले जाते. त्यामुळेच पूजेच्या वेळी परमेश्वराला अखंड स्वरूपात तांदूळ अर्पण केला जातो.
हिंदू धर्मात तांदूळ खूप शुभ मानले जाते. त्यामुळे तांदळाचा वापर सर्व प्रकारच्या पूजेसाठी केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षत हे चंद्राचे रूप मानले जाते. त्यामुळेच पूजेच्या वेळी परमेश्वराला अखंड स्वरूपात तांदूळ अर्पण केला जातो.
अशाप्रकारे हा 21 अखंड तांदळाचा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील.