स्वामींची आपल्यावर कृपादृष्टी असल्याचे काही महत्वाचे संकेत!

अध्यात्मिक

मित्रांनो, स्वामींची कृपा असल्याचे काही महत्वाचे संकेत आज मी तुम्हाला सांगणार आहे. अशी बरीच लोक आहेत त्यांना स्वामी मदत करत असतात. आता प्रश्न फक्त असा आहे की, सामान्य माणसाला कसं ओळखता येईल की स्वामी आपल्यावर कृपा ठेवत आहेत आणि तुम्ही करत असलेकी पूजा तुम्हाला पावत आहे. चला तर मग ते कोणते संकेत आहेत जाणून घेऊया.

उत्तम चरित्र शास्त्रामध्ये म्हटले आहे की, स्वामीशक्ती त्यांनाच सहाय्य करते जे इतरांचे दुःख समजून घेतात. वाईटापासून लांब राहतात. नकारात्मक विचारा पासून लांब राहतात. जे नियमाने आवडी व इच्छेनुसार पुण्य. कामामध्ये व्यस्त असतात.

विद्वान म्हणतात की, जर तुमचे डोळे पहाटे तीन ते पाच दरम्यान डोळे उघडत असतील तर समजावं की स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. कारण या वेळेत स्वामी जागृत होतात. आपण आपल्या लहान वयापासून तारुण्य पर्यंत या वेळेत जागे होत असाल तर स्वामी आपल्या माध्यमातून काही ना काही साध्य करत आहेत आणि ती व्यक्ती एक आपला चांगला आत्मा म्हणून दर्शवत आहेत की, हे जीवन झोपण्यासाठी नाही.

स्वामीनी आपल्यावर विशेष कृपा करावी यासाठी आपण वेगवेगळ्या पूजा करत असतो आणि आपल्याला आपल्या नशिबामध्ये काहीतरी वेगळा चमत्कार व्हावा यासाठी आपण स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण करतो. त्यावेळी आपल्याला आपल्या मनामध्ये अनेक इच्छा स्वामी समर्थांना आपण सांगतो. आपल्या आर्थिक परिस्थिती बदलावी किंवा नोकरीमध्ये ही यश प्राप्त व्हावे या गोष्टी आपण देवाकडे मागतो. तर आपल्याला देव केव्हा प्रसन्न होतात या गोष्टीकडे आपण जास्त बघत असतो. तर पाहूया या महत्वाची संकेत कोणते आहेत.

तो संकेत म्हणजे स्वप्नात स्वामींचे दर्शन. आपल्याला पुन्हा पुन्हा स्वामी दिसत असतील आणि तुम्ही स्वामी बरोबर बोलत आहात असे दिसत असेल तर समजा स्वामींची तुम्हाला कृपादृष्टी आहे.

अंतर ज्ञान हा एक संकेत महत्त्वाचा आहे. जर आपणास आगाऊ घटनेची घटना तुम्हाला माहीत असल्यास आणि जर तुम्हाला त्यांचा अंदाज येऊ लागल्यास तर समजावं स्वामीनी तुमच्यावर कृपादृष्टी ठेवली आहे. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही घटना घडणार आहे याविषयीचा अंदाज आपल्याला येणे म्हणजे स्वामी आपल्यावर प्रसन्न झाल्यासारखे आहे.

पुढचा संकेत म्हणजे कौटुंबिक प्रेम. आपली पत्नी, मुलगा, मुलगी, आपले सर्व नातेवाईक आज्ञा पाळत असल्यास ते आपल्यावर प्रेम करत असतील आणि आपण पण प्रेम करत असाल तर असं समजा की स्वामी शक्ती आपल्यावर प्रसन्न आहे.

तर मित्रांनो असे काही संकेत होते ज्यामुळे आपणाला समजेल की स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत की नाही. तुम्हाला देखील हे संकेत मिळाले तर तुम्ही समजून जा की, स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर आहे.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *