स्वामी समर्थांचा फोटो घरामध्ये कोणत्या दिवशी आणावा? कुठे ठेवावा? वाचा सविस्तर

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. अगदी मनोभावे व श्रद्धेने ते स्वामी समर्थांची पूजा, अर्चना सेवा करीत असतात. मित्रांनो स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक कामांमध्ये आपल्या पाठीशी राहतात आणि आपल्याला सर्व अडचणीतून बाहेर देखील काढतात. असा विश्वास प्रत्येक भक्ताला असतो. त्यामुळे ते स्वामी समर्थांची सेवा अगदी नित्यनेमाने करीत असतात.

तर मित्रांनो तुम्ही देखील जर स्वामी समर्थांचे भक्त असाल आणि ज्या वेळेस तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो जर तुमच्या घरामध्ये आणणार असाल तर तो नेमक्या कोणत्या दिवशी आणावा आणि तसेच तो फोटो कुठे ठेवावा? याविषयीची सविस्तर माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे.

प्रत्येकाला स्वामी समर्थांची सेवा करण्याची आवड असते. अनेकांना इच्छा असते की आपण एखादा स्वामी समर्थांचा फोटो विकत घ्यावा आणि तो आपल्या घरामध्ये किंवा देवघरांमध्ये ठेवावा. परंतु मित्रांनो हा नेमका फोटो कोणत्या दिवशी आणायचा आहे आणि तो घरामध्ये कसा ठेवायचा आहे जेणेकरून त्याचा आपल्याला लाभ होईल चला तर मग जाणून घेऊया.

स्वामी समर्थांचा फोटो कसा असावा तसेच फोटो कोणत्या दिशेला लावावा असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत राहतात. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो घ्यायला जाल त्यावेळेस तो फोटो रेखीव असला पाहिजे आणि तो फोटो तुमच्याशी बोलणारा असला पाहिजे. तसेच तो फोटो दिव्य दर्शन देणारा असावा.

तर ज्या वेळेस तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो घ्यायला जाल त्यावेळेस तो फोटो तुम्ही निरखून पहा आणि त्या फोटोमधून तुम्हाला स्वामींचे दर्शन झाल्यासारखे वाटते का ते पाहावे.जर तुम्हाला तो फोटो तुमच्याशी बोलतो आहे असे जेव्हा वाटेल त्यावेळेस तुम्ही तो फोटो खरेदी करायचा आहे.

तर तुम्हाला असा स्वामी समर्थांचा फोटो गुरुवारी घ्यायचा आहे आणि त्या फोटोमध्ये स्वामी समर्थ महाराज हे बसलेले असायला हवेत आणि ज्या फोटोमध्ये स्वामी समर्थ महाराज हे उभे आहेत असा फोटो तुम्ही अजिबात खरेदी करायचा नाही.

तसेच मित्रांनो जर त्या फोटोमध्ये कोणत्याही प्रकारचा प्राणी असेल किंवा जर स्वामी समर्थ महाराज हे कोणत्याही प्राण्याबरोबर बसलेले असतील तर तो फोटो सुद्धा तुम्ही अजिबात खरेदी करायचा नाही. अगदी साधा सरळ स्वामी समर्थांचा फोटो घ्यायचा आहे. म्हणजेच स्वामी समर्थ बसलेले असावेत असाच फोटो तुम्हाला विकत घ्यायचा आहे.

असा फोटो तुम्ही गुरुवारी खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे. तर मित्रांनो असा हा स्वामी समर्थांचा फोटो तुम्ही खरेदी केल्यानंतर तो नेमका आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला लावायचा आहे अशी शंका देखील तुम्हाला आली असेल. तर मित्रांनो स्वामी समर्थांचा फोटो हा कोणत्या दिशेला लावायचा आता याविषयी जाणून घेऊ.

तर मित्रांनो स्वामी समर्थांचा फोटो तुम्ही खरेदी केल्यानंतर तो आपल्या घरामध्ये कोणत्याही रूममध्ये लावण्यास हरकत नाही. परंतु मित्रांनो तो फोटो पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुम्ही लावायचा आहे. मित्रांनो एका पाटावर शुभ्र धुतलेले वस्त्र अंथरून त्यावर फोटो तुम्ही ठेवू शकता.

परंतु मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो हा भिंतीवर लटकवायचा नाही. आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचा फोटो भिंतीवर लावतात. पण हे एकदम चुकीचे आहे.

तुम्ही कधीही स्वामींचा फोटो भिंतीवर लावायचा नाही. जर तुम्हाला फोटो हा भिंतीवर लावायचा असेल तर त्याआधी भिंतीवर एखादी खिळा ठोका व फोटो खाली काच लावा आणि मित्रांनो जेव्हा एखाद्या लाकडाची फळी तुम्ही भिंतीवर ठोकता. त्यावेळेस तुम्ही हा फोटो लावू शकता. म्हणजेच तुम्हाला भिंतीवर फोटो लावायचा असेल तर फळी, काच किंवा पाठ ठेवूनच त्यावर स्वामींचा फोटो ठेवायचा आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे साधा सरळ बसलेले स्वामी समर्थांचा फोटो खरेदी करून आणायचा आहे आणि तुम्हाला योग्य दिशेला वरील सांगितल्याप्रमाणे लावायचा आहे आणि स्वामी समर्थांची सेवा अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करायचे आहे. जेणेकरून स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *