नमस्कार मंडळी
श्री स्वामी समर्थ
नमस्कार मंडळी
आपण आता पाहत आहात आपले लाडके , गमतीशीर , आध्यात्मिक आणि विविध आजारावरील उपाय सांगणारे news poetal डॅशिंग मराठी तर मंडळी आपण सर्वांचं डॅशिंग मराठीच्या वतीने स्वागत आहे
खूप लोक श्री स्वामींचे भक्त आहेत पण त्यांना अजून श्री स्वामी समर्थ या शब्दाचा अर्थ माहीत नाही तर आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत आज आम्ही शी स्वामी भक्तासाठी खास ही माहिती दिली आहे .
श्री स्वामी समर्थ चा अर्थ खलील प्रमाणे
षडाक्षरी स्वामी नाम ‘श्री स्वामी समर्थ’ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रम्हाण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे.
ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुचरित्र हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याच प्रमाणे समानार्थी ‘श्री स्वामी समर्थ’ हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे.
ह्या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे अंतरीक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातुन सहजच होते. असा आमचा अनुभव आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ व्यवस्थित समजुन घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यययोग सर्व साधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व आधिक प्रभावकारक होत असतो.
श्री स्वामीं समर्थ या सद्गुरु ब्रम्हवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा मतीतार्थ खालीलप्रमाणे आहे.
श्री
स्वयं श्रीपदाविराजीत सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज…!
स्वामी – स्वाः + मी
स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईच्छ्या…! अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा.
समर्थ
समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा…!
त्यायोगे ‘श्री स्वामी समर्थ’ म्हणजे श्रीपदविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करुन स्वयंभु शिव तत्व सद्गुरुकृपे अंकित करा.
श्री स्वामी समर्थ महाराजांची अशीच खास माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपले डॅशिंग मराठी हे पेज लाईक करा
धन्यवाद