स्वामी समर्थांचा फोटो घरामध्ये कोणत्या दिवशी आणावा? कुठे ठेवावा? वाचा सविस्तर

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि आपल्या सर्वांनाच त्यांची सेवा करण्याची त्याची भक्ती करण्याची खूप आवड आहे आणि आपल्या पैकी प्रत्येक जण आपापल्या परीने आणि जमेल तसे स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. अजूनही बरेच स्वामीभक्त स्वामींची सेवा करू इच्छितात, आणि त्यांची अशी इच्छा असते की आपण एखादा असा छानसा फोटो स्वामींचा विकत घ्यावा आणि आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये लावावा. परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांना म्हणजेच स्वामीभक्तांना नेहमी प्रश्न पडतो तो म्हणजे की घरात ठेवण्यासाठी स्वामींचा कोणता फोटो विकत घ्यावा.

फोटो कसा असावा?फोटो कोणत्या दिशेला लावावा? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही फोटो घ्यायला जाल, तेव्हा एक असा स्वामींचा फोटो जो रेखीव असला पाहिजे तो फोटो तुमच्याशी बोलणार असला पाहिजे आणि त्याचबरोबर तो फोटो तुम्हाला दिव्य दर्शन देणारा असला पाहिजे. स्वामीभक्तहो जेव्हा तुम्ही फोटो घेणार असाल, जेव्हा फोटो तुम्ही निवडणार असाल, तेव्हा तुम्ही सगळे फोटो एकदा निरखून पहा आणि कोणत्या फोटोमधून तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन झाल्यासारखे वाटते ते बघा. कोणता फोटो तुम्हाला काहीतरी बोलतोय अस वाटतय तो फोटो बघा.

मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की तुम्ही स्वामींचा कोणताही फोटो घ्या. पण त्या फोटोमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले असायला पाहिजेत आणि मित्रांनो ज्या फोटोमध्ये स्वामी उभे आहेत. असा फोटो तुम्हाला घ्यायचाच नाही.

त्याच बरोबर जर का त्या फोटोमध्ये कोणता प्राणी असेल. किंवा स्वामी समर्थ महाराज कोणत्या प्राण्या बरोबर बसलेली असतील तर तो फोटो सुद्धा तुम्हाला घ्यायचा नाही. अगदी साधा सरळ फोटो ज्यामध्ये स्वामी बसलेले आहेत. फक्त असाच फोटो विकत घ्यावा.

मित्रांनो सर्का स्वामींचा फोटो आपल्याकडे आधीपासून असेल. तर तो कोणत्या दिशेला लावावा याबद्दल आपल्या मनात शंका येतात. स्वामी भक्त हो तुम्ही स्वामीचा फोटो कोणत्याही रूममध्ये लावा काही हरकत नाही. पण तो फोटो पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावावा. मित्रांनो तुम्ही एका पाटावर सुद्धा, शुभ्र धुतलेल वस्त्र मांडून त्यावर फोटो ठेवू शकता, परंतु मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ची स्वामींचा फोटो कधी भिंतीवर लटकवू नका. आपल्यापैकी बरेच लोक भिंतीवर खेळा मारून फोटो लटकवतात.

परंतु हे अत्यंत चुकीचे आहे. म्हणून कधीही स्वामींचा फोटो भिंतीवर अटक करू नये. परंतु तुम्हाला फोटो भिंतीवर लटकवायचं असेल. तर त्याआधी भिंतीवर एखादी पाटी ठोका, व फोटोखाली काच लावा आणि मित्रांनो जेव्हा एखादा लाकडाची फळी ठोका, त्यावर फोटो लावा. म्हणून मित्रांनो, कधी पण भिंतीवर फोटो लावायचा असेल तर फळी, काच किंवा पाट ठेवूनच त्यावर स्वामींचा फोटो ठेवा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *