सुखी संसारासाठी काही सोपे घरगुती उपाय

अध्यात्मिक माहिती

मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा. मुख्य दरवाजाजवळ कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये. फक्त शुभचिन्ह लावावे. घराचा उंबरा हा लाकडाचा असावा नसेल तर मार्बलचा चालेल. मधोमध लक्ष्मीचे पाऊले लावून तिची दररोज आतून पूजा करावी. तसेच घरात स्वच्छता ठेवावी.

मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा. दरवाजा मागे दिनदर्शिका लावू नये. तसेच कोणताही अडथळा ठेवू नये.
स्त्रियांनी सकाळी उठून लवकर आंघोळ करून हळद-कुंकू वाहून उंबरठ्याची पूजा करावी. दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद-कुंकू वहावे आणि नंतर स्वयंपाक घरात जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी.

सकाळ संध्याकाळ उंबाऱ्याच्या बाजूला तुपाचा दिवा लावावा. याने घरात सुख शांती समाधान नांदेल. स्त्रियांनी सोवळे पाळावे. स्वयंपाक हा मनापासून करावा. सर्व सण मनापासून पारंपारिक रित्या साजरे करावे.किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीच्या पाण्याची भांडी ठेवून त्यातील पाणी प्यावे. किचनच्या बेसिनमध्ये रात्रीची खरकटी भांडी तशीच ठेवू नये.

पुरुषांनी आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी. मंदिरात कुलदैवत, कुलदेवी, घंटी, गणेश मूर्ती, शंकराची पिंड, बाळकृष्ण, शंख, आराध्य दैवत असावे. देवी किंवा देवतांचे दोन फोटो किंवा दोन मूर्ती असू नये. मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा दोन अगरबत्ती लावाव्यात.

आठवड्यातून एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावे. याने देवी देवतांचे कृपा दृष्टी लाभते.घरामध्ये देवघर सोडून इतर ठिकाणी देवांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नये. देवघर नेहमी पूर्व ईशान्य, उत्तर दिशेला असावे.पूर्व ईशान्य व उत्तरेला फुलझाडे लावावे. घरात सुकलेले झाड ठेवू नये. पूर्व उत्तर किंवा ईशान्येला तुळस लावून तिची पूजा करावी. घरात कोणतेही काम करताना पूर्व, उत्तर, ईशान्य दिशेलाच तोंड करावे.

घड्याळ कॅलेंडर पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे.बाहेरून आल्यावर लगेच चपला घरात घेऊ नये. फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चपला आत घ्यावा.घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये. पती-पत्नीने घरात भांडण करू नये. मुलांबद्दल चांगला विचार करावा.

घरात जुन्या वस्तूचा साठा करू नये. फाटलेले जुने कपडे, भंगार, रद्दी इत्यादी गोष्टी जमा करू नये. जुने कपडे पायपुसणे म्हणून वापरू नये. बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू विकून टाकावे. विजेचे बटन बंद असू नये. रखडलेली कामे मार्गी लागतील. वास्तू तज्ञांचा सल्ला घ्यावा. त्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *