सुकामेवाच कशाला, शेंगदाणे खा. शेंगदाणे खाण्याचे 7 घसघशीत फायदे, कमवा तब्येत

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

ठळक मुद्दे : 1) अक्रोड, बदाम हे पौ ष्टि क नटस म्हणून ओळखले जातात. पण शेंगदाणेही त्यांच्याच बरोबरीनं पौ ष्टि क असतात. 2) शेंगदाणे खाल्ल्याने हदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. 3) शेंगदाण्यात फॅटस आणि कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. तरीसुध्दा हेच घ ट क वजन कमी करण्यास आणि स्थूलतेचा धोका टाळण्यास महत्त्वाचे ठरतात.

शेंगदाणे हे सध्या महाग झाले आहेत हे बरोबर आहे. पण आरोग्यासाठी सुकामेवा महत्त्वाचा असतो. हा सुकामेवा तर शेंगदाण्यांच्या तुलनेत खूप महाग असतो. पण आरोग्यावर परिणाम, आरोग्यासाठी फायदे यांच्याबाबत बोलायचं झाल्यास कोणत्याही सुका मेव्या इतके प्रभावी असतात शेंगदाणे.

शा स्त्री य दृष्ट्या शेंगदाणे हे शें ग व र्गी य आहे. एरवी घरात इतर कोणता सुकामेवा नसेल पण शेंगदाणे मात्र असतातच. या शेंगदाणांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. शेंगदाण्याचा उपयोग गोड पदार्थांपासून ते मसालेदार, चमचमीत पदार्थांमध्येही करता येतो. साधे पोहे ते पीनट बटर असा शेंगदाण्यांचा व्यापक उपयोग आहे.

शेंगदाणे केवळ चवीसाठी नाहीतर त्यांच्यातील गुणधर्मांमुळे प्रामुख्याने ओळखले जातात. शेंगदाण्यांमधे प्रथिनं, आरोग्यदायी फॅटस आणि इतर आरोग्यदायी पोषक घटक असतात. शेंगदाण्यातील हे गुणधर्म मधुमेह, हदयाशी निगडित आजर , कर्करोग या सारख्या आजारांचा धोका कमी करतात. तसेच शेंगदाणे हे वजन कमी करण्यासाठीही उ प यु क्त आहेत असा त्यावरचा अभ्यास सांगतो. या शेंग वर्गीय शेंगदाण्याला अराचिस हा य पो गि आ हे शास्त्रीय नाव आहे.

शेंगदाण्यावर आरोग्याच्या दृष्टीनं झालेलं संशोधन सांगतं की गोड पदार्थ, केक, मिठाया, सॉसेस यामध्ये शेंगदाण्याचा उपयोग केल्यास त्याचा फायदा वजन कमी होण्यासाठी तर होतो पण शेंगदाण्यामुळे हदयाच्या आजारांचा धोकाही कमी होतो. शेंगदाण्याचा आरोग्यास कसा फायदा होतो याबाबत विस्तृतपणे बघूया.

आहारात शेंगदाणे असावेत कारण. 1) अ क्रो ड, बदाम हे पौ ष्टि क नटस म्हणून ओळखले जातात. पण शेंगदाणेही त्यांच्याच बरोबरीनं पौ ष्टि क असतात. शेंगदाणे खाल्ल्यानं कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन हदयाचं सं लरक्षण होतं. तसेच शेंगदाण्यामुळे रक्तात बारीक गाठी होत नाही. त्यामुळे हदयविकार, मेंदूला येणारे झटके याचा धोका खूप कमी होतो.

2) संशोधनात असं आढळून आलं आहे की, शेंगदाण्यात फॅटस आणि कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. तरीसुध्दा हेच घटक वजन कमी करण्यास आणि स्थूलतेचा धोका टाळण्यास महत्त्वाचे ठरतात.
3) शेंगदाणे खाल्यामुळे पि त्ता श या त खडे होण्याचा धोका टळतो असं अभ्यास सांगतो. हा फायदा महिला पुरुष दोघांनाही होतो.

4) शेंगदाण्यांमधे केवळ प्रथिनं आणि आरोग्यदायी फॅ ट स असतात असं नाही तर जै व स क्रि य घटकांचा खजिना शेंगदाण्यात असतो. शेंगदाण्यात आयसोफ्लेवोनिससारखे अँण्टिऑक्सिडण्ट असतात. तसेच त्यात रि झ र्व्ह ट्रो ल आणि फायटिक अँ सि ड असतात. शेंगदाण्यात असलेल्या इ जीवनसत्त्वं आणि बायोटीन, लोह, नियासिन, फोलेट, मॅग्निज, फॉ स्फ र स, मॅ ग्ने शि अ य म, थियामिन हे महत्त्वाचे घ ट क असतात. यातील लोह, फोलेटसारखे घटक तर गरोदरपणातही फार महत्त्वाचे असतात.

5) शेंगदाणे खाल्ल्यावर रक्तातील साखर वाढत नाही हे आढळून आलं आहे. शेंगदाण्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो असं म्हणतात. तसेच शेंगदाण्यांचा सेवनानं महिलांच्याबाबतीत टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी झालेला अभ्यासात आढळून आला.

6) शेंगदाण्यांमधे मोठ्या प्रमाणात फायबर असतं. म्हणूनच शेंगदाणे खाल्ल्यास, शेंगदाण्याचे पदार्थ खाल्ल्यास समाधान मिळतं. शेंगदाण्यातील फायबरमुळे पचनसंस्थेस सूज, दाह यासारख्या विकारांचा धोका कमी होतो.

7) ज्येष्ठ वयाच्या लोकांनी पीनट बटर खाल्ल्यास पोटाचे वि शि ष्ट प्रकारचे कर्करोग होण्याचा तसेच महिलांच्या बाबतीत स्तनांचा कर्करोग होण्याचा आजार धोका कमी होतो.शेंगदाणे हे चविष्ट असतात, पौ ष्टि क असतात हे अगदी बरोबर. पण प्रत्येक गोष्टीला जशी चांगली वाईट बाजू असते तशी ती शेंगदाण्यालासुध्दा आहे.

काहींना मूळातून शेंगदाण्याची अँलर्जी असते. शेंगदाण्याबद्दलची ही अँलर्जी खूप जणांमधे आढळते. त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्यावर मळमळ होत असल्यास, चेहर्‍यावर सूज दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अँलर्जी असतानही शेंगदाणे खाणं हे आरोग्यासाठी घोक्यचं समजलं जातं.

8) पण ज्यांना शेंगदाण्याची अँलर्जी नाही त्यांनी अ व श्य शेंगदाणे खावेत. शेंगदाणे कच्चे, भाजून, मीठ घालून पाण्यात उकळून, तळून, कुकरमधे उकडवून खाता येतात. कुठल्याही पध्दतीने शेंगदाणे खाल्ले तर त्याचा फायदा शरीराला मिळतो.

आहारात शेंगदाण्याचा समावेश करताना. 1) घरगुती बिस्कीटं करताना त्यात शेंगदाण्यांचा वापर करावा. 2) सलाडमधे उकडलेले शेंगदाणे घालता येतात. 3) पीनट बटर, पिकलेलं केळ एकत्र वाटून ते मि श्र ण ब्रेडल लावून त्याचं आगळं वेगळं सॅण्डविच तयार करता येतं.

4) रश्याच्या किंवा कोरड्या भाज्यांना दाण्याचा कूट टाकल्यास भाज्या खमंग आणि पौ ष्टि क होतात. 5) शेंगदाण्याचे लाडू, बर्फी, सुकी, ओली चटणी, शेंगदाण्याच्या पोळ्या अशा स्वरुपात आपल्याला आहारात शेंगदाण्याचा समावेश करता येतो.

टीप : ही माहिती केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणत्याही प्रकारे वैद्यकीय अभिप्रायासाठी हा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *