सोन्याचे दागिने चोरी होणे, हरवणे, मिळणे अशुभ का मानले जाते?

माहिती अध्यात्मिक

मित्रांनो आपल्या सर्वांच्या कडेच सोने-चांदी किंवा अनेक प्रकारचे आपल्याकडे दागिने असतात. व ते दागिने आपण परिधान सुद्धा करत असतो. कोणाकडे चांदीची अंगठी किंवा चांदीचे चैन असेल तर काही जणांची सोन्याची अंगठी किंवा चैन असू शकते .तर ते आपल्याकडून पडले किंवा आपल्याला ते कुठेतरी सापडले.तर ते अशुभ असते.

आपली वस्तू हरवल्यानंतर ना त्याला अशुभ का मानले जाते चला तर आता आपण जाणून घेऊया. आपण सोन्याची कोणती वस्तू किंवा दागिने खरेदी करत असताना हे नेहमी नेहमी शुभ मुहूर्तावर खरेदी करावे. शुभ मुहूर्तावर सोन खरेदी केल्यानंतर ते घरात कायमस्वरूपी टिकून राहते. अशुभमुहूर्तावर सोने खरेदी केले तर ते घरात राहत नाही. व आपल्याला ती समृद्धी मिळत नाही .

त्याचबरोबर सोनं हरवलं किंवा चोरीला गेल्यावर इतरत्र आपल्याला सापडलं तर ते शुभ मानलं जात नाही. तर त्याच्या मागचे कारण कोणते आहे. चला तर आता आपण जाणून घेऊया . ज्योतिष शास्त्रानुसार सोन्याच्या धातु जर हरवला तर तो शुभ मानला जात नाही. कारण सोन्याच्या धातूचा रंग हा पिवळा असतो.

देवगुरू बृहस्पतीशी संबंधित असल्याचे ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले आहे. बृहस्पतीशी ग्रह विवाहित जीवन संपत्ती व पती यांचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे सोन हरवणे हे अशुभ मानले गेले आहे. चोरीला जरी गेलं तरी ते अशुभ मानलं गेले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु हा ग्रह कुटुंबाचा कारक गुरु आहे असा मानले गेलेला आहे.

त्यामुळे सोन हरवणं किंवा चोरी करणं गुरु ब्रहस्पतिषी नाराजी मुळे अशी परिस्थिती निर्माण होते. अशी परिस्थिती विवाहित जीवनात किंवा कौटुंबिक कलह त्याग सुरु करू शकते. आपण जर रस्त्यावरून चालत असलो तर आपल्याला त्या जागी जर सोनं मिळालं तर ज्योतिष शास्त्रानुसार असं सांगितले गेले आहे की आपल्याला मिळालेले सोनं हे अशुभ मानलं आहे. मिळालेल सोन आपण घरामध्ये ठेवणं हे देखील अशुभ मानले गेलेला आहे.

आपल्याला जे मिळालेले सोनं आपण घरामध्ये ठेवलं तर ते गुरु ग्रहाचा अशुभ प्रभाव आपल्यावर होतो. व आपल्या घरावर देखील होतो. जीवनामध्ये अनेक समस्या आणि अडचणी निर्माण होत असतात. आपण एखाद्याचे सोने जर आपल्याला सापडलं आपण तसेच घरामध्ये ठेवलं तर ते अशुभ मानले गेलेला आहे. आपण चालत असताना एखाद्या ठिकाणी सोन जर आपल्याला सापडले. तर ते आपल्याला घरी नेऊ नये.

ते विकून आपल्याला जे पैसे मिळणार आहे त्या पैशाचे आपण एका मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तींना दान करायचे आहेत. असं केल्यामुळे तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुख-समृद्धी मिळते. व त्या व्यक्तीचा आदर आपल्याला वाटत असतो . तर मित्रांनो जी माहिती मी तुम्हाला वरती सांगितलेली आहे ती तुम्हाला काटेकोरपणे पाळायची आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *