मित्रांनो स्वामींची इच्छापूर्ती करून देणारे सोमवारची हे विशेष सेवा नक्की करा म्हणजे स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यामध्ये अशक्य ही शक्य सर्व घडवून आणतील. मित्रांनो आपण सर्वजण स्वामींची रोज सेवा करत असतो. रविवार सोडून सोमवार ते शनिवार स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करतो. आजच्या लेखांमध्ये सोमवारची सेवा कशी करायची आहे. याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत. सोमवारची ही सेवा हे महिला पुरुष कोणीही केले तरी चालते.
ही सेवा आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एक वेळेस करायचे आहे. आपल्या देवघरा समोर बसून देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावायची आहे. आणि आपल्यालाही सेवा करायची आहे. आपण ही सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा आपल्याला मनोभावे, विश्वासाने आणि मनापासून व श्रद्धेने जर आपण ही सेवा केली तर आपली इच्छा पूर्ण होईल. इच्छा पूर्ण करून देणारी सोमवारची ही एक विशेष सेवा आहे.
या सेवेमध्ये आपल्याला तीन गोष्टी करायची आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे स्वामींच्या अष्टनामावली मधील एक मंत्र याचा जप आपल्याला 108 वेळा म्हणजेच पूर्ण एक माळ करायचे आहे तो मंत्र असा आहे ‘ओम दिगंबराय नमः’ या मंत्राचा जप आपल्याला पूर्ण एक माळ करायचे आहे त्यानंतर ‘श्री स्वामी समर्थ’ हा स्वामींच्या नामाचा जप देखील आपल्याला एक माळ जप करायचा आहे त्यानंतर एक वेळेस आपल्याला ‘पुरुष सूक्त’ म्हणायचे आहे पुरुष सूक्त हे स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या पुस्तकांमध्ये दिलेला आहे.
आपण दररोज दोन झोप करतो एक तर स्वामींच्या नामाचा जप आणि स्वामी समर्थ महाराजांच्या अष्ट नामावली मधला एक जप, त्यानंतर नित्यसेवा या पुस्तकातील दिवसानुसार एखादा मंत्र असतो. किंवा ज्या पासून आपली इच्छा पूर्ण होणार आहे. असा एखादा मंत्र सूक्त किंवा स्तोत्र आपण वाचत असतो, तर दररोज आपण जर अष्ट नामावली मधील ‘दिगंबर आय नमः’ या नामाची एक माळ जप त्यानंतर ‘श्री स्वामी समर्थ’ नामाची एक माळ आणि त्यानंतर पुरुष सूक्त एक वेळेस वाचन करायचे आहे. ही एक विशेष सेवा आपल्याला सोमवारच्या दिवशी करायचे आहे.
सोमवारच्या दिवशी आपण वरील सांगितल्याप्रमाणे हीच सेवा मनापासून विश्वासाने श्रद्धेने जर केले तर आपली इच्छा पूर्ण होईल. आणि स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी अशक्य आहेत. ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की आपल्याकडून पूर्ण होणार नाहीत. अशा अशक्य असणाऱ्या सर्वच गोष्टी स्वामी समर्थ महाराज आपल्या साठी शक्य करून देतील. आणि आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी दूर करतील हा उपाय बराच जणांनी करून याचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता.
मित्रांनी माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.