स्कंद पुराणानुसार मृत्यु येण्यापुर्वी दिसू लागतात ही लक्षणे

अध्यात्मिक माहिती

स्कंद पुरानामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे हे कसं ओळखावं असा अगस्त्य मुनींनी स्वामी कार्तिकेय यांना विचारला. तेव्हा स्वामी कार्तिकेय म्हणाले जर श्वास नाकावाटे न वाहता मुखाने चालला असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू दोन दिवसात होणार आहे हे ओळखावं. याचा अर्थ समजून घ्या जर एखाद्या व्यक्तीचा श्वास हा नाकाने न चालता तोंडाने चालू असेल तर अशी व्यक्ती दोन दिवसात मरण पावते.

व्यक्तीची नखे, डोळ्यांचे कोपरे निळ्या अथवा काळ्या रंगाचे झाल्यास सहा महिने उरलेत हे ओळखावे. म्हणजे काय तर ज्या व्यक्तीची नखे निळ्या किंवा काळ्या रंगाची बनतात ज्या व्यक्तीच्या डोळ्यांचे कोपरे निळ्या किंवा काळ्या रंगाचे बनतात ती व्यक्ती सहा महिन्यात मरते.

मलमूत्र व शिंक एकाच वेळी बाहेर पडत असेल तर आयुष्य केवळ एक वर्ष शिल्लक आहे असं समजावं. मित्रांनो याचा अर्थ समजून घ्या जर एखाद्या व्यक्तीला मलमूत्र विसर्जन करत असताना शिंका येत असेल तर अशी व्यक्ती केवळ एक वर्ष जगते.
जर एखाद्याला काळा पिवळा पुरुष किंवा स्त्री आपल्या शरीरातून बाहेर पडून अदृश्य होत आहे असे भासले तर मृत्यू दोन वर्षांवर येऊन ठेपला आहे हे ओळखावं.

मृत्यू जवळ आला आहे अशा व्यक्तीला ध्रुवतारा दिसत नाही. मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आकाशामध्ये उत्तर दिशेला सूर्य मावळल्या बरोबर ध्रुवतारा दिसून येतो. हा ध्रुवतारा ज्याला दिसणार नाही त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आलेला असतो.
हाताने कान बंद केले असता कसलाही आवाज ऐकू न येणे हे सुद्धा आयुष्य एक महिना उरल्याची खूण आहे.

सोबतच आपलाच देह आपल्याला दुर्बल झालेला दिसणे. दुर्बल म्हणजे अशक्त अशा व्यक्तीच आयुष्य केवळ एक महिना उरते.
आपले प्रतिबिंब पाण्यात तेलात किंवा आरशात दिसत नसेल तर एकच महिना आयुष्य उरले असे म्हणावे. तुम्ही आरशात, पाण्यात किंवा तेलात पाहिल्यानंतर जर तुम्हाला तुमचा चेहरा दिसला नाही तर तुमच आयुष्य एक महिना उरलेला आहे.

आकाशामध्ये दोन चंद्र दिसणे, दोन सूर्य दिसणे किंवा रात्रीच्या वेळी इंद्रधनुष्य दिसणे ही लक्षणे बुद्धी भ्रष्ट झाल्याची आहेत. ज्या व्यक्तीची वाणी स्पष्ट उमटत नाही ती व्यक्ती आधी व्यवस्थित बोलत होती मात्र अचानक तिची वाणी अस्पष्ट होऊ लागली आहे त्या व्यक्तीचा मृत्यू महिनाभरावर पोचला आहे असं समजावं.

आकाशात चमकणाऱ्या निळ्या मण्यांचे नाग दिसू लागले तर आयुर्मर्यादा सहा महिने उरली आहे हे ओळखावं. ज्या व्यक्तीला आकाशामध्ये निळ्या मण्यांचे नाग दिसतात ती व्यक्ती सहा महिनेच जगते.स्वप्नामध्ये भूत, प्रेत, पिशाच, राक्षस, कावळे, कुत्रे, गिधाडे, कोल्हे, गाढव आपल्याला ओढून नेत आहेत आणि आपल्याला खात आहेत असं दिसलं तर त्याचा मृत्यू वर्षभरात होतो.

ज्याला आपल्या देहावर फुले, गंध, लाल वस्त्र घातलेली दिसतील त्या व्यक्तीचा मृत्यू आठ महिन्यात होईल.मातीचा ढगावर, वारुळावर किंवा लाकडी खांबावर आपण चढत आहोत असं स्वप्नात दिसले तर सहा महिनेच आयुष्य उरले आहे असे समजावे. अंगावर तेल लावून गाढवावर बसून दक्षिणेला गमन करणे हेही मृत्यूचे लक्षण आहे.

आयुष्य सहा महिनेच शिल्लक आहे हे जाणावे. जर तुम्हाला असं स्वप्न पडलं की तुम्ही गाढवावर बसलेले आहात, तुमच्या अंगाला तेल लावलेल आहे आणि हे गाढव दक्षिण दिशेकडे जात आहे तर मृत्यू सहा महिन्यात होतो.स्वप्नात आपल्याच मस्तकी वाळलेल्या लाकडांची मोळी पाहणे हेही सहा महिन्यात मृत्यू दर्शविते.

म्हणजे आपण आपल्या डोक्यावर वाळलेल्या लाकडांची मोळी घेऊन जात आहोत हे स्वप्न मृत्यू दर्शक स्वप्न आहे.
ज्याला स्वप्नात यमदूत काळे वस्त्र ल्यायलेले, लोखंडी दंड हाती घेतलेले दिसतील त्याच आयुष्य तीन महिनेच उरल आहे असं समजावं. स्वप्ना मध्ये यमदूत आल्यास यम दूताची ओळख काय?

तो काळ्या रंगाची वस्त्र परिधान करतो आणि त्याच्या हाती लोखंडी दंड असतो.स्वप्नात वानरांच्या गाडीत बसून पूर्वेकडे जाणारा पाचच दिवस जगतो. जो स्वप्नामध्ये वानरांच्या गाडीमध्ये बसतो आणि पूर्वेकडे जातो त्याचे आयुष्य केवळ पाच दिवस उरलेले असते.तर ही होती मृत्यू येण्यापूर्वीची मृत्यू दर्शक लक्षणे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *