शुक्रवारी देवी लक्ष्मीला करा प्रसन्न

अध्यात्मिक

मंडळी शुक्रवारचा दिवस शुक्र ग्रहाशी संबंधित मानला जातो आणि शुक्रवारी माता लक्ष्मी प्रसन्न होते. तर या दिवशी माता लक्ष्मीला कसं प्रसन्न करावं याचे काही उपाय आपण जाणून घेऊयात. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी लक्ष्मी कोष्टाचा दिवस असतो. शुक्रवारी माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि तिची कृपा आपल्यावर असावी असं प्रत्येकाला वाटत असतं.

या दिवशी लक्ष्मीची पूजा विधिपूर्वक केल्यास त्याचे फळ नक्की मिळतं असं म्हणतात. कारण मात्र लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि ज्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. एकीकडे माता लक्ष्मीच्या कृपेने संपत्ती कीर्ती आणि वैभव प्राप्त होते तर दुसरीकडे शुक्रवारचा दिवस शुक्र ग्रहाशी संबंधित मानला जातो.

जर तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल आणि तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर घरात स्वच्छता असायलाच पाहिजे. आपल्या सभोवतालचे वातावरणही शुद्ध करावे. कारण माता लक्ष्मी आणि शुक्रदेव कधीच अस्वच्छ घरात राहत नाही असं म्हणतात.

माता लक्ष्मी आणि शुक्रदेव यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शुक्रवारी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करूनच पूजा करावी. पांढरा रंग शुक्राशी संबंधित आहे. त्यामुळे या दिवशी हा रंग जास्तीत जास्त वापरावा. तसेच भगवान विष्णू शिवाय लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते.

त्यामुळे शुक्रवारी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची एकत्र पूजा केल्यामुळे धनधान्य आणि वैभव प्राप्त होतं असं म्हणतात.
धन प्राप्तीसाठी शुक्रवारी माता लक्ष्मीचे व्रत ठेवावे. नियमानुसार पाठ पूजा करावी. यासोबतच या दिवशी देवांच्या विशेष मंत्राचा जप करावा. 108 वेळा हा जप करायला हवा.

प्रत्येक शुक्रवारी हा उपाय तुमच्या आयुष्यात भरभराट आणेल आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरात सदैव सुख समृद्धी नांदेल. मंत्र पुढील प्रमाणे- ‘ओम शुम शुम कृताय नमः’ किंवा ‘ओम हिमकुंडमृणालाभम दैत्यनाम परम गुरुं सर्वशास्त्र प्रवर्तकं भार्गवम प्रणामम’.

शुक्रवारी उपवास करण्यासोबतच शुक्राशी संबंधित वस्तूंच दान करण्याचे हे सांगितलं जातं. विशेषता तांदूळ, दूध, दही, मैदा आणि साखरेचे दान करावं. याशिवाय शुक्रवारी मुंग्या आणि गायींना पीठ खाऊ घातल्याने शुक्र देवाची विशेष कृपा प्राप्त होते असं म्हणतात.तर मंडळी अशा प्रकारे शुक्रवारी व्रत वैकल्य करून जर पूजा केली तर तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमच्यावर धनवर्षाव नक्की होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *