मित्रांनो, आपल्या घरामध्ये आपण अनेक प्रकारच्या वस्तू वापरून घर सजवत असतो. घर आकर्षक दिसावे यासाठी आपण कायमच लक्ष देत राहतो. आजकाल अनेकांच्या घरांमध्ये आपणाला मोरपीस पाहायला मिळते. तर श्रीकृष्णाच्या मुकुटात विराजमान असलेले हे मोरपीस घरामध्ये ठेवावे की ठेवू नये? याविषयीची आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे.
विना मोरपंख भगवान कृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते. त्याशिवाय, भगवान शिवचे पुत्र कार्तिकेय, देवी सरस्वती आणि इंद्रदेव यांचं वाहनही मोर आहे.आपल्या ऋषी मुनींनी अनेक ग्रंथ मोर पंखाने लिहिले आहेत.वास्तू शास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात मोरपंखाच्या महत्त्वाबाबत माहिती सांगण्यात आली आहे.
वास्तुशास्त्रानुसार जर आपण घरामध्ये मोरपंख ठेवले तर यामुळे घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होते. आपण बऱ्याच वेळा असे ऐकतो की मोराचे पंख जर पुस्तकात ठेवले तर हे आपल्यासाठी खूपच चांगले, शुभ मानले जाते.वास्तू शास्त्रानुसार ज्या मुलांचं लक्ष अभ्यासात नसते त्यांनी आपल्या पुस्तकात मोराचा पंख ठेवावा. असे केल्याने मुलांची एकग्रता वाढते.
मोरपंख घरात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा राहते.जर पती-पत्नीच्या नात्यात तणाव असेल तर घराच्या बेडरुममध्ये मोर पंख ठेवावे. यामुळे पती-पत्नीमध्ये नातेसंबंध अधिक दृढ बनते. त्यांच्यामध्ये प्रेम वाढीस लागते.साक्षात श्रीहरीचा अलंकार बनून त्याच्या मस्तकी विराजमान असलेले मोरपंख अवश्य घरात ठेवावे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.