नामजप किती माळा केल्या तर आपल्याला लाभ होईल. मग ती 1 असेल, 11 असेल, 21 असेल , 51 असेल, 108 असेल. तर किती माळा जप स्वामी भक्ताने, स्वामी सेवेकऱ्याने करायला पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती जाणून घेऊया.मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असला तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की स्वामींचा जो जप आहे, “श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ” हा किती माळा केल्या पाहिजे? किती वेळेस हा जप केला पाहिजे?
तर मित्रांनो तुमच्याकडे माळ असेल किंवा माळ नसेल तरी तुम्ही हा जप करू शकता हे लक्षात ठेवा. आता तुमच्याकडे माळ असेल तर तुम्ही किती माळा जप करावा? तर असे कुठेही लिहिलेलं नाही की हा जप एवढ्या माळा केल्या पाहिजे. हे तुमच्यावर आहे. स्वामी अकरा माळ केल्याने सुद्धा प्रसन्न होतील आणि एक माळ केल्याने सुद्धा प्रसन्न होतील आणि कोणी कोणी तर 108 माळा केल्या तरी प्रसन्न नाही होणार. हे तुमच्यावर आहे की तुम्ही किती भक्तिभावाने, श्रद्धेने तो जप करत आहात.
एक माळ करा पण भक्ती भावाने, श्रद्धेने आणि विश्वासाने करा. स्वामींना सुद्धा वाटायला पाहिजे की हा एक माळ करतोय पण भक्तिभावाने श्रध्देने करतोय, याच्या मनात कोणतेही दुसरे विचार नाही याच्या मनात फक्त मी आणि मीच आहे आणि मुखात माझे नामस्मरण आहे. तर त्याच्यावर स्वामी समर्थ महाराज नक्की प्रसन्न होतात.
तर मित्रांनो तुम्हीही 1 माळ करा, 11 करा, 21 करा, 51 किंवा 108 करा. परंतु श्रद्धेने, विश्वासाने, भक्ती भावाने करा.जर तुमच्याकडे माळ नसेल तर हा जप कसा करायचा? तर माळ नसेल तर तुम्ही स्वामींसमोर बसा, हात जोडा आणि डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करत राहा.
जेवढा वेळ बसता येईल, जेवढा वेळ करता येईल, जोपर्यंत तुम्ही थकत नाही तोवर करत रहा. टाइमर वगैरे काही लावू नका. घड्याळ बघू नका. करत रहा. तुम्हाला असे वाटेल की बास करू आता माझ्या कडून होत नाहीये तेव्हा थांबा. सरळ आहे सोप आहे. नक्की करा. मंत्र जप मोजू नका. माळ असेल तर मोजू शकतो. जर माळ नसेल आणि हात जोडून करत असाल तर अजिबात मोजू नका, करत राहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका